വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

പേജ് നമ്പർ:close

external-link copy
67 : 40

هُوَ الَّذِیْ خَلَقَكُمْ مِّنْ تُرَابٍ ثُمَّ مِنْ نُّطْفَةٍ ثُمَّ مِنْ عَلَقَةٍ ثُمَّ یُخْرِجُكُمْ طِفْلًا ثُمَّ لِتَبْلُغُوْۤا اَشُدَّكُمْ ثُمَّ لِتَكُوْنُوْا شُیُوْخًا ۚ— وَمِنْكُمْ مَّنْ یُّتَوَفّٰی مِنْ قَبْلُ وَلِتَبْلُغُوْۤا اَجَلًا مُّسَمًّی وَّلَعَلَّكُمْ تَعْقِلُوْنَ ۟

६७. तोच होय, ज्याने तुम्हाला मातीपासून, मग वीर्यापासून, मग रक्ताच्या (जमलेल्या) गोळ्यापासून निर्माण केले, मग तुम्हाला अर्भकाच्या स्वरूपात बाहेर काढले, मग तो तुम्हाला वाढीस लावतो की तुम्ही आपल्या पूर्ण शक्ती - सामर्थ्यास पोहोचावे, मग म्हातारे व्हावे आणि तुमच्यापैकी काहींचा याच्या आधीच मृत्यु होतो (आणि तो तुम्हाला सोडून देतो यासाठी की तुम्ही निर्धारित आयुपर्यर्ंत पोहोचावे आणि यासाठी की तुम्ही विचार - चिंतन करावे. info
التفاسير:

external-link copy
68 : 40

هُوَ الَّذِیْ یُحْیٖ وَیُمِیْتُ ۚ— فَاِذَا قَضٰۤی اَمْرًا فَاِنَّمَا یَقُوْلُ لَهٗ كُنْ فَیَكُوْنُ ۟۠

६८. तोच होय, जो जीवन आणि मृत्यु देतो, मग जेव्हा तो एखादे कार्य करण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्यास फक्त एवढेच म्हणतो ‘घडून ये’ आणि ते घडून येते. info
التفاسير:

external-link copy
69 : 40

اَلَمْ تَرَ اِلَی الَّذِیْنَ یُجَادِلُوْنَ فِیْۤ اٰیٰتِ اللّٰهِ ؕ— اَنّٰی یُصْرَفُوْنَ ۟ۙۛ

६९. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले, जे अल्लाहच्या आयतींसदर्भात वाद घालतात. त्यांना कोठे परतविले जात आहे? info
التفاسير:

external-link copy
70 : 40

الَّذِیْنَ كَذَّبُوْا بِالْكِتٰبِ وَبِمَاۤ اَرْسَلْنَا بِهٖ رُسُلَنَا ۛ۫— فَسَوْفَ یَعْلَمُوْنَ ۟ۙ

७०. ज्या लोकांनी ग्रंथाला खोटे ठरविले आणि त्यालाही जो आम्ही आपल्या पैगंबरांसोबत पाठविला, त्यांना फार लवकर वस्तुस्थितीचे ज्ञान होईल. info
التفاسير:

external-link copy
71 : 40

اِذِ الْاَغْلٰلُ فِیْۤ اَعْنَاقِهِمْ وَالسَّلٰسِلُ ؕ— یُسْحَبُوْنَ ۟ۙ

७१. जेव्हा त्यांच्या गळ्यांमध्ये जोखड (तौक) असतील आणि शंखला असतील, फरफटत ओढून नेले जातील. info
التفاسير:

external-link copy
72 : 40

فِی الْحَمِیْمِ ۙ۬— ثُمَّ فِی النَّارِ یُسْجَرُوْنَ ۟ۚ

७२. उकळत्या पाण्यात आणि मग जहन्नमच्या आगीत जाळले जातील. info
التفاسير:

external-link copy
73 : 40

ثُمَّ قِیْلَ لَهُمْ اَیْنَ مَا كُنْتُمْ تُشْرِكُوْنَ ۟ۙ

७३. मग त्यांना विचारले जाईल की ज्यांना तुम्ही (अल्लाहचे) सहभागी ठरवित होते, ते आहेत कोठे? info
التفاسير:

external-link copy
74 : 40

مِنْ دُوْنِ اللّٰهِ ؕ— قَالُوْا ضَلُّوْا عَنَّا بَلْ لَّمْ نَكُنْ نَّدْعُوْا مِنْ قَبْلُ شَیْـًٔا ؕ— كَذٰلِكَ یُضِلُّ اللّٰهُ الْكٰفِرِیْنَ ۟

७४. जे अल्लाहखेरीज होते, ते म्हणतील की ते आमच्याकडून हरवलेत किंबहुना आम्ही तर यापूर्वी कोणालाही पुकारत नव्हतो. अल्लाह काफिर (इन्कारी) लोकांना अशाच प्रकारे मार्गभ्रष्ट करतो. info
التفاسير:

external-link copy
75 : 40

ذٰلِكُمْ بِمَا كُنْتُمْ تَفْرَحُوْنَ فِی الْاَرْضِ بِغَیْرِ الْحَقِّ وَبِمَا كُنْتُمْ تَمْرَحُوْنَ ۟ۚ

७५. हे अशासाठी की तुम्ही जमिनीवर नाहक तोरा मिरवित होते, आणि (व्यर्थ) डौल दाखवित फिरत होते. info
التفاسير:

external-link copy
76 : 40

اُدْخُلُوْۤا اَبْوَابَ جَهَنَّمَ خٰلِدِیْنَ فِیْهَا ۚ— فَبِئْسَ مَثْوَی الْمُتَكَبِّرِیْنَ ۟

७६. (आता या) जहन्नमध्ये नेहमी नेहमी राहण्याकरिता (त्याच्या) दरवाज्यांमध्ये दाखल व्हा, केवढे वाईट ठिकाण आहे अहंकार करणाऱ्यांकरिता. info
التفاسير:

external-link copy
77 : 40

فَاصْبِرْ اِنَّ وَعْدَ اللّٰهِ حَقٌّ ۚ— فَاِمَّا نُرِیَنَّكَ بَعْضَ الَّذِیْ نَعِدُهُمْ اَوْ نَتَوَفَّیَنَّكَ فَاِلَیْنَا یُرْجَعُوْنَ ۟

७७. तेव्हा तुम्ही धीर - संयम राखा, अल्लाहचा वायदा पूर्णतः सच्चा आहे. आम्ही त्यांना जो वायदा देऊन ठेवला आहे, त्यापैकी काही आम्ही तुम्हाला दाखवून द्यावे किंवा त्या आधी तुम्हाला मृत्यु द्यावा, त्यांचे परतविले जाणे तर आमच्याचकडे आहे. info
التفاسير: