വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

പേജ് നമ്പർ:close

external-link copy
50 : 40

قَالُوْۤا اَوَلَمْ تَكُ تَاْتِیْكُمْ رُسُلُكُمْ بِالْبَیِّنٰتِ ؕ— قَالُوْا بَلٰی ؕ— قَالُوْا فَادْعُوْا ۚ— وَمَا دُعٰٓؤُا الْكٰفِرِیْنَ اِلَّا فِیْ ضَلٰلٍ ۟۠

५०. ते उत्तर देतील की काय तुमच्याजवळ तुमचे पैगंबर चमत्कार (मोजिजे) घेऊन आले नव्हते. ते म्हणतील, का नाही? त्यावर ते म्हणतील, मग तुम्हीच दुआ - प्रार्थना करा आणि काफिर लोकांची दुआ (प्रार्थना) अगदी (निष्प्रभ आणि) व्यर्थ आहे! info
التفاسير:

external-link copy
51 : 40

اِنَّا لَنَنْصُرُ رُسُلَنَا وَالَّذِیْنَ اٰمَنُوْا فِی الْحَیٰوةِ الدُّنْیَا وَیَوْمَ یَقُوْمُ الْاَشْهَادُ ۟ۙ

५१. निःसंशय, आम्ही आपल्या पैगंबरांची आणि ईमान राखणाऱ्यांची या जगाच्या जीवनातही मदत करू आणि त्या दिवशीही, जेव्हा साक्ष देणारे उभे राहतील. info
التفاسير:

external-link copy
52 : 40

یَوْمَ لَا یَنْفَعُ الظّٰلِمِیْنَ مَعْذِرَتُهُمْ وَلَهُمُ اللَّعْنَةُ وَلَهُمْ سُوْٓءُ الدَّارِ ۟

५२. ज्या दिवशी अत्याचारी लोकांची लाचारी काहीच फायदा देणार नाही आणि त्यांच्यासाठी धिःक्कार असेल आणि त्यांच्यासाठी वाईट घर असेल. info
التفاسير:

external-link copy
53 : 40

وَلَقَدْ اٰتَیْنَا مُوْسَی الْهُدٰی وَاَوْرَثْنَا بَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ الْكِتٰبَ ۟ۙ

५३. आणि आम्ही मूसाला मार्गदर्शन प्रदान केले आणि इस्राईलच्या संततीला या ग्रंथाचा उत्तराधिकारी बनविले. info
التفاسير:

external-link copy
54 : 40

هُدًی وَّذِكْرٰی لِاُولِی الْاَلْبَابِ ۟

५४. की बुद्धिमानांकरिता तो, मार्गदर्शन आणि बोध होता. info
التفاسير:

external-link copy
55 : 40

فَاصْبِرْ اِنَّ وَعْدَ اللّٰهِ حَقٌّ وَّاسْتَغْفِرْ لِذَنْۢبِكَ وَسَبِّحْ بِحَمْدِ رَبِّكَ بِالْعَشِیِّ وَالْاِبْكَارِ ۟

५५. तेव्हा (हे पैगंबर!) तुम्ही धीर - संयम राखा, अल्लाहचा वायदा अगदी सच्चा आहे, तुम्ही आपल्या अपराधांची क्षमा मागत राहा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या पालनकर्त्याच्या पावित्र्याचे गुणगान व स्तुती - प्रशंसा करीत राहा. info
التفاسير:

external-link copy
56 : 40

اِنَّ الَّذِیْنَ یُجَادِلُوْنَ فِیْۤ اٰیٰتِ اللّٰهِ بِغَیْرِ سُلْطٰنٍ اَتٰىهُمْ ۙ— اِنْ فِیْ صُدُوْرِهِمْ اِلَّا كِبْرٌ مَّا هُمْ بِبَالِغِیْهِ ۚ— فَاسْتَعِذْ بِاللّٰهِ ؕ— اِنَّهٗ هُوَ السَّمِیْعُ الْبَصِیْرُ ۟

५६. निःसंशय, जे लोक आपल्याजवळ कोणतेही प्रमाण नसतानाही अल्लाहच्या आयतींबाबत वाद घालतात, त्यांच्या मनात अहंकाराशिवाय दुसरे काही नाही, जे या मोठेपणापर्यंत पोहचवणार नाहीत तेव्हा तुम्ही अल्लाहचे शरण मागत राहा. निःसंशय, तो पूर्णपणे ऐकणारा आणि सर्वाधिक पाहणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
57 : 40

لَخَلْقُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ اَكْبَرُ مِنْ خَلْقِ النَّاسِ وَلٰكِنَّ اَكْثَرَ النَّاسِ لَا یَعْلَمُوْنَ ۟

५७. आकाशांची आणि धरतीची निर्मिती निश्चितच मानवांच्या निर्मितीपेक्षा फार मोठे काम आहे, परंतु (ही गोष्ट वेगळी की) बहुतेक लोक हे जाणत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
58 : 40

وَمَا یَسْتَوِی الْاَعْمٰی وَالْبَصِیْرُ ۙ۬— وَالَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ وَلَا الْمُسِیْٓءُ ؕ— قَلِیْلًا مَّا تَتَذَكَّرُوْنَ ۟

५८. आणि आंधळा व डोळस दोघे समान नाही, ना ते लोक, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले, दुष्कर्म करणाऱ्यांच्या (समान आहेत) तुम्ही (फारच) कमी बोध ग्रहण करीत आहात. info
التفاسير: