വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

പേജ് നമ്പർ:close

external-link copy
63 : 11

قَالَ یٰقَوْمِ اَرَءَیْتُمْ اِنْ كُنْتُ عَلٰی بَیِّنَةٍ مِّنْ رَّبِّیْ وَاٰتٰىنِیْ مِنْهُ رَحْمَةً فَمَنْ یَّنْصُرُنِیْ مِنَ اللّٰهِ اِنْ عَصَیْتُهٗ ۫— فَمَا تَزِیْدُوْنَنِیْ غَیْرَ تَخْسِیْرٍ ۟

६३. सालेह म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! बरे हे सांगा, जर मी आपल्या पालनकर्त्यातर्फे एखाद्या खास प्रमाणावर असेल आणि त्याने मला आपल्या जवळून दया-कृपा प्रदान केली असेल, मग मी जर त्याची अवज्ञा केली तर असा कोण आहे, जो त्याच्यासमोर माझी मदत करेल? तुम्ही तर माझ्या नुकसानातच भर टाकत आहात. info
التفاسير:

external-link copy
64 : 11

وَیٰقَوْمِ هٰذِهٖ نَاقَةُ اللّٰهِ لَكُمْ اٰیَةً فَذَرُوْهَا تَاْكُلْ فِیْۤ اَرْضِ اللّٰهِ وَلَا تَمَسُّوْهَا بِسُوْٓءٍ فَیَاْخُذَكُمْ عَذَابٌ قَرِیْبٌ ۟

६४. आणि हे माझ्या जातीबांधवांनो! ही अल्लाहने पाठविलेली सांडणी आहे, जी तुमच्याकरिता अल्लाहचा एक चमत्कार आहे. आता तुम्ही तिला अल्लाहच्या धरतीवर चरण्यासाठी मोकळे सोडा आणि तिला कशाही प्रकारचा त्रास पोहचवू नका, अन्यथा लवकरच तुम्हाला अज़ाब येऊन धरेल. info
التفاسير:

external-link copy
65 : 11

فَعَقَرُوْهَا فَقَالَ تَمَتَّعُوْا فِیْ دَارِكُمْ ثَلٰثَةَ اَیَّامٍ ؕ— ذٰلِكَ وَعْدٌ غَیْرُ مَكْذُوْبٍ ۟

६५. तरीही त्या लोकांनी त्या सांडणीचे पाय कापून (मारून टाकले). यावर सॉलेह म्हणाले, ठीक तर तुम्ही आपल्या घरांमध्ये तीन दिवस पर्यंत वास्तव्य करून घ्या, हा वायदा खोटा नाही. info
التفاسير:

external-link copy
66 : 11

فَلَمَّا جَآءَ اَمْرُنَا نَجَّیْنَا صٰلِحًا وَّالَّذِیْنَ اٰمَنُوْا مَعَهٗ بِرَحْمَةٍ مِّنَّا وَمِنْ خِزْیِ یَوْمِىِٕذٍ ؕ— اِنَّ رَبَّكَ هُوَ الْقَوِیُّ الْعَزِیْزُ ۟

६६. मग जेव्हा आमचा आदेश येऊन पोहोचला, आम्ही सॉलेह आणि त्यांच्यावर ईमान राखणाऱ्यांना आपल्या दया-कृपेने त्या (शिक्षे) पासूनही वाचविले आणि त्या दिवसाच्या अपमानापासूनही. निःसंशय तुमचा पालनकर्ता शक्तिशाली आणि जबरदस्त आहे. info
التفاسير:

external-link copy
67 : 11

وَاَخَذَ الَّذِیْنَ ظَلَمُوا الصَّیْحَةُ فَاَصْبَحُوْا فِیْ دِیَارِهِمْ جٰثِمِیْنَ ۟ۙ

६७. आणि अत्याचारी लोकांना मोठा भयंकर आवाजाने येऊन धरले, मग ते आपल्या घरांमध्ये तोंडघशी मरून पडलेले राहिले. info
التفاسير:

external-link copy
68 : 11

كَاَنْ لَّمْ یَغْنَوْا فِیْهَا ؕ— اَلَاۤ اِنَّ ثَمُوْدَاۡ كَفَرُوْا رَبَّهُمْ ؕ— اَلَا بُعْدًا لِّثَمُوْدَ ۟۠

६८. अशा प्रकारे जणू ते त्या ठिकाणी कधी राहिलेच नव्हते. सावधान! समूदच्या जनसमूहाने आपल्या पालनकर्त्याचा इन्कार केला. ऐका! त्या समूदच्या लोकांवर धिःक्कार आहे. info
التفاسير:

external-link copy
69 : 11

وَلَقَدْ جَآءَتْ رُسُلُنَاۤ اِبْرٰهِیْمَ بِالْبُشْرٰی قَالُوْا سَلٰمًا ؕ— قَالَ سَلٰمٌ فَمَا لَبِثَ اَنْ جَآءَ بِعِجْلٍ حَنِیْذٍ ۟

६९. आणि आम्ही पाठिवलेले दूत इब्राहीमजवळ शुभ समाचार घेऊन पोहोचले आणि सलाम म्हणाले. त्यांनीदेखील सलामचे प्रत्युत्तर दिले आणि विनाविलंब भाजलेले वासरु घेऊन आले. info
التفاسير:

external-link copy
70 : 11

فَلَمَّا رَاٰۤ اَیْدِیَهُمْ لَا تَصِلُ اِلَیْهِ نَكِرَهُمْ وَاَوْجَسَ مِنْهُمْ خِیْفَةً ؕ— قَالُوْا لَا تَخَفْ اِنَّاۤ اُرْسِلْنَاۤ اِلٰی قَوْمِ لُوْطٍ ۟ؕ

७०. आणि जेव्हा पाहिले की त्यांचे हातदेखील त्या (खाद्या) कडे पोहचत नाही, तर त्यांना अनोळखी जाणून मनातल्या मनात भयभीत होऊ लागले. दूत म्हणाले, भिऊ नका. आम्हाला तर लूतच्या जनसमूहाकडे पाठविले गेले आहे. info
التفاسير:

external-link copy
71 : 11

وَامْرَاَتُهٗ قَآىِٕمَةٌ فَضَحِكَتْ فَبَشَّرْنٰهَا بِاِسْحٰقَ ۙ— وَمِنْ وَّرَآءِ اِسْحٰقَ یَعْقُوْبَ ۟

७१. आणि त्यांची पत्नी, जी उभी होती, ती हसली, तेव्हा आम्ही तिला इसहाकचा आणि त्याच्यानंतर याकूबचा शुभ समाचार दिला. info
التفاسير: