വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

പേജ് നമ്പർ:close

external-link copy
6 : 11

وَمَا مِنْ دَآبَّةٍ فِی الْاَرْضِ اِلَّا عَلَی اللّٰهِ رِزْقُهَا وَیَعْلَمُ مُسْتَقَرَّهَا وَمُسْتَوْدَعَهَا ؕ— كُلٌّ فِیْ كِتٰبٍ مُّبِیْنٍ ۟

६. आणि जमिनीवर चालण्या-फिरणाऱ्या प्रत्येक सजीवाच्या अन्नसामुग्रीची जबाबदारी अल्लाहवर आहे. तोच त्यांच्या निवासाचे ठिकाणही जाणतो आणि त्यांना सोपविले जाण्याचे ठिकाणही. सर्व काही स्पष्ट ग्रंथात आहे. info
التفاسير:

external-link copy
7 : 11

وَهُوَ الَّذِیْ خَلَقَ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضَ فِیْ سِتَّةِ اَیَّامٍ وَّكَانَ عَرْشُهٗ عَلَی الْمَآءِ لِیَبْلُوَكُمْ اَیُّكُمْ اَحْسَنُ عَمَلًا ؕ— وَلَىِٕنْ قُلْتَ اِنَّكُمْ مَّبْعُوْثُوْنَ مِنْ بَعْدِ الْمَوْتِ لَیَقُوْلَنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْۤا اِنْ هٰذَاۤ اِلَّا سِحْرٌ مُّبِیْنٌ ۟

७. आणि तो (अल्लाहच) होय, ज्याने सहा दिवसांत आकाशांना आणि जमिनीला निर्माण केले आणि त्याचे सिंहासन (अर्श) पाण्यावर होते१ यासाठी की त्याने तुमची कसोटी घ्यावी की तुमच्यात सदाचारी कोण आहे? जर तुम्ही त्यांना सांगाल की तुम्हाला मेल्यानंतर पुन्हा जिवंत केले जाईल, तर इन्कारी लोक उत्तर देतील की ही केवळ उघड जादू आहे. info

(१) हीच गोष्ट सहीह हदीसद्वारेही सिद्ध होते. यास्तव एका हदीस वचनात उल्लेखित आहे की सर्वश्रेष्ठ अल्लाहने आकाश व जमिनीची निर्मिती करण्याच्या पन्नास हजार वर्षे आधी सृष्टी निर्मितीचे भाग्य लिहिले त्या वेळी त्याचे अर्श अर्थात सिंहासन पाण्यावर होते. (सहीह मुस्लिम, किताबुल कदर आणि पाहा सहीह बुखारी, बदउलखल्क)

التفاسير:

external-link copy
8 : 11

وَلَىِٕنْ اَخَّرْنَا عَنْهُمُ الْعَذَابَ اِلٰۤی اُمَّةٍ مَّعْدُوْدَةٍ لَّیَقُوْلُنَّ مَا یَحْبِسُهٗ ؕ— اَلَا یَوْمَ یَاْتِیْهِمْ لَیْسَ مَصْرُوْفًا عَنْهُمْ وَحَاقَ بِهِمْ مَّا كَانُوْا بِهٖ یَسْتَهْزِءُوْنَ ۟۠

८. आणि जर आम्ही काही मुदतीपर्यंत त्यांच्यावरील शिक्षा- यातना स्थगित केली तर हे निश्चित उद्‌गारतील की अज़ाबला कोणत्या गोष्टीने रोखले आहे, ऐका! ज्या दिवशी अज़ाब त्यांच्या जवळ येऊन पोहोचेल, मग तो त्यांच्यावरून टळणार नाही, मग तर ज्याची ते थट्टा उडवित होते, तोच त्यांच्यावर उलटून पडेल. info
التفاسير:

external-link copy
9 : 11

وَلَىِٕنْ اَذَقْنَا الْاِنْسَانَ مِنَّا رَحْمَةً ثُمَّ نَزَعْنٰهَا مِنْهُ ۚ— اِنَّهٗ لَیَـُٔوْسٌ كَفُوْرٌ ۟

९. आणि जर आम्ही माणसाला एखाद्या सुखाची गोडी चाखवून, मग ते त्याच्याकडून हिरावून घेतो, तेव्हा तो फार उदास आणि मोठा कृतघ्न बनतो. info
التفاسير:

external-link copy
10 : 11

وَلَىِٕنْ اَذَقْنٰهُ نَعْمَآءَ بَعْدَ ضَرَّآءَ مَسَّتْهُ لَیَقُوْلَنَّ ذَهَبَ السَّیِّاٰتُ عَنِّیْ ؕ— اِنَّهٗ لَفَرِحٌ فَخُوْرٌ ۟ۙ

१०. आणि जर आम्ही त्याला एखादे सुख पोहचवितो, त्या दुःखानंतर जे त्याला पोहोचले होते, तेव्हा तो म्हणू लागतो की आता माझ्या कष्ट-यातना दूर झाल्या १ निश्चितच तो खूप आनंदित होऊन घमेंड करू लागतो. info

(१) अर्थात तो असे समजतो की कष्ट- यातनांचा क्रम आता संपला, यापुढे कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागणार नाही.

التفاسير:

external-link copy
11 : 11

اِلَّا الَّذِیْنَ صَبَرُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ ؕ— اُولٰٓىِٕكَ لَهُمْ مَّغْفِرَةٌ وَّاَجْرٌ كَبِیْرٌ ۟

११. त्यांच्याखेरीज, जे धीर-संयम राखतात आणि सत्कर्म करीत राहतात अशाच लोकांसाठी क्षमाही आहे आणि फार मोठा मोबदलाही. info
التفاسير:

external-link copy
12 : 11

فَلَعَلَّكَ تَارِكٌ بَعْضَ مَا یُوْحٰۤی اِلَیْكَ وَضَآىِٕقٌ بِهٖ صَدْرُكَ اَنْ یَّقُوْلُوْا لَوْلَاۤ اُنْزِلَ عَلَیْهِ كَنْزٌ اَوْ جَآءَ مَعَهٗ مَلَكٌ ؕ— اِنَّمَاۤ اَنْتَ نَذِیْرٌ ؕ— وَاللّٰهُ عَلٰی كُلِّ شَیْءٍ وَّكِیْلٌ ۟ؕ

१२. तर कदाचित तुम्ही त्या वहयी (ईश-संदेशा) चा एखादा भाग सोडून देणार आहात, जो तुमच्याकडे अवतरीत केला जातो आणि त्यामुळे तुमच्या मनात संकोच आहे केवळ त्यांच्या या बोलण्यावर की याच्यावर एखादा खजिना का नाही उतरविला गेला? किंवा याच्यासोबत एखादा फरिश्ता तरी आला असता. ऐका! तुम्ही तर केवळ भय दाखविणारेच आहात आणि प्रत्येक चीजवस्तूची देखरेख करणारा केवळ अल्लाह आहे. info
التفاسير: