Kilniojo Korano reikšmių vertimas - Vertimas į maratų k. - Muchamed Šafi Ansari

Puslapio numeris:close

external-link copy
35 : 13

مَثَلُ الْجَنَّةِ الَّتِیْ وُعِدَ الْمُتَّقُوْنَ ؕ— تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ ؕ— اُكُلُهَا دَآىِٕمٌ وَّظِلُّهَا ؕ— تِلْكَ عُقْبَی الَّذِیْنَ اتَّقَوْا ۖۗ— وَّعُقْبَی الْكٰفِرِیْنَ النَّارُ ۟

३५. त्या जन्नतचे उदाहरण, ज्याचा वायदा अल्लाहचे भय राखणाऱ्यांशी केला गेला आहे, असे आहे की तिच्याखाली प्रवाह वाहत असतील, तिची फळे नेहमी राहणारी आहेत आणि तिची सावलीदेखील. हा आहे मोबदला अल्लाहचे भय राखणाऱ्यांचा आणि काफिर लोकांचा शेवट जहन्नम आहे. info
التفاسير:

external-link copy
36 : 13

وَالَّذِیْنَ اٰتَیْنٰهُمُ الْكِتٰبَ یَفْرَحُوْنَ بِمَاۤ اُنْزِلَ اِلَیْكَ وَمِنَ الْاَحْزَابِ مَنْ یُّنْكِرُ بَعْضَهٗ ؕ— قُلْ اِنَّمَاۤ اُمِرْتُ اَنْ اَعْبُدَ اللّٰهَ وَلَاۤ اُشْرِكَ بِهٖ ؕ— اِلَیْهِ اَدْعُوْا وَاِلَیْهِ مَاٰبِ ۟

३६. आणि ज्यांना आम्ही ग्रंथ प्रदान केला आहे, ते तर त्याद्वारे खूप आनंदित होतात, जे काही तुमच्यावर अवतरित केले जाते आणि इतर संप्रदाय, त्यातल्या काही गोष्टींना मान्य करीत नाही. तुम्ही त्यांना सांगून टाका की मला तर केवळ हाच आदेश दिला गेला आहे की मी अल्लाहची उपासना करावी आणि त्याच्यासोबत कोणाला भागीदार न बनवावे, मी त्याच्याचकडे बोलवित आहे आणि त्याच्याचकडे मला परतून जायचे आहे. info
التفاسير:

external-link copy
37 : 13

وَكَذٰلِكَ اَنْزَلْنٰهُ حُكْمًا عَرَبِیًّا ؕ— وَلَىِٕنِ اتَّبَعْتَ اَهْوَآءَهُمْ بَعْدَ مَا جَآءَكَ مِنَ الْعِلْمِ ۙ— مَا لَكَ مِنَ اللّٰهِ مِنْ وَّلِیٍّ وَّلَا وَاقٍ ۟۠

३७. आणि अशा प्रकारे आम्ही हा कुरआन, अरबी भाषेतील फर्मान अवतरित केले आहे, आणि जर तुम्ही यांच्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण केले, याच्यानंतरही की तुमच्याजवळ ज्ञान येऊन पोहोचले आहे, तर अल्लाहच्या विरोधात तुम्हाला ना कोणी समर्थन देणारा भेटेल आणि ना रक्षण करणारा. info
التفاسير:

external-link copy
38 : 13

وَلَقَدْ اَرْسَلْنَا رُسُلًا مِّنْ قَبْلِكَ وَجَعَلْنَا لَهُمْ اَزْوَاجًا وَّذُرِّیَّةً ؕ— وَمَا كَانَ لِرَسُوْلٍ اَنْ یَّاْتِیَ بِاٰیَةٍ اِلَّا بِاِذْنِ اللّٰهِ ؕ— لِكُلِّ اَجَلٍ كِتَابٌ ۟

३८. आणि आम्ही तुमच्या पूर्वीही अनेक रसूल (पैगंबर) पाठविले आहेत, आणि आम्ही त्या सर्वांना पत्नी आणि संतान राखणारा बनविले होते. अल्लाहच्या हुकुमाविना एखादी निशाणी आणून दाखविणे कोणत्याही पैगंबराच्या अखत्यारातील (अवाख्यातील) गोष्ट नाही. प्रत्येक निर्धारीत वायद्याचा एक ग्रंथ आहे. info
التفاسير:

external-link copy
39 : 13

یَمْحُوا اللّٰهُ مَا یَشَآءُ وَیُثْبِتُ ۖۚ— وَعِنْدَهٗۤ اُمُّ الْكِتٰبِ ۟

३९. अल्लाह जे इच्छिल मिटवून टाकील आणि जे इच्छिल सुरक्षित ठेवील. सुरक्षित ग्रंथ (लौहे महफूज) त्याच्याचजवळ आहे. info
التفاسير:

external-link copy
40 : 13

وَاِنْ مَّا نُرِیَنَّكَ بَعْضَ الَّذِیْ نَعِدُهُمْ اَوْ نَتَوَفَّیَنَّكَ فَاِنَّمَا عَلَیْكَ الْبَلٰغُ وَعَلَیْنَا الْحِسَابُ ۟

४०. आणि त्यांच्याशी केलेल्या वायद्यांपैकी जर एखादा आम्ही तुम्हाला दाखवून द्यावा किंवा तुम्हाला आम्ही मृत्यु द्यावा तर तुमच्यावर केवळ पोहचविण्याचीच जबाबदारी आहे, हिशोब घ्यायचे काम तर आमचे आहे. info
التفاسير:

external-link copy
41 : 13

اَوَلَمْ یَرَوْا اَنَّا نَاْتِی الْاَرْضَ نَنْقُصُهَا مِنْ اَطْرَافِهَا ؕ— وَاللّٰهُ یَحْكُمُ لَا مُعَقِّبَ لِحُكْمِهٖ ؕ— وَهُوَ سَرِیْعُ الْحِسَابِ ۟

४१. काय ते नाही पाहत की आम्ही धरतीला तिच्या किनाऱ्यांकडून घटवित आलो आहोत. अल्लाह आदेश देतो आणि कोणीही त्याच्या आदेशाला पाठीमागे टाकणारा नाही. तो लवकरच हिशोब घेणार आहे. info
التفاسير:

external-link copy
42 : 13

وَقَدْ مَكَرَ الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ فَلِلّٰهِ الْمَكْرُ جَمِیْعًا ؕ— یَعْلَمُ مَا تَكْسِبُ كُلُّ نَفْسٍ ؕ— وَسَیَعْلَمُ الْكُفّٰرُ لِمَنْ عُقْبَی الدَّارِ ۟

४२. आणि त्यांच्या पूर्वीच्या लोकांनीही कपट-कारस्थान करण्यात काही कसर सोडली नव्हती, परंतु समस्त उपाययोजना अल्लाहचीच आहे. मनुष्य जे काही करीत आहे, अल्लाह ते जाणतो. ईमान न राखणाऱ्यांना लवकरच माहीत पडेल की आखिरतचा मोबदला कोणासाठी आहे. info
التفاسير: