وه‌رگێڕانی ماناكانی قورئانی پیرۆز - وەرگێڕاوی ماراتی - محمد شەفیع ئەنساڕی

external-link copy
33 : 6

قَدْ نَعْلَمُ اِنَّهٗ لَیَحْزُنُكَ الَّذِیْ یَقُوْلُوْنَ فَاِنَّهُمْ لَا یُكَذِّبُوْنَكَ وَلٰكِنَّ الظّٰلِمِیْنَ بِاٰیٰتِ اللّٰهِ یَجْحَدُوْنَ ۟

३३. आम्ही हे चांगल्या प्रकारे जाणतो की, त्यांच्या कथनांनी तुम्ही दुःखी कष्टी होता, तर हे लोक तुम्हाला खोटे म्हणत नाहीत, तर हे अत्याचारी अल्लाहच्या आयतींचा इन्कार करतात.१ info

(१) पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना इन्कारी लोकांतर्फे खोटे ठरविले जाण्यावर जे दुःख होत असे, त्याच्या निराकरणासाठी व पैगंबरांना सांत्वना देण्यासाठी हे सांगितले जात आहे की हे तुम्हाला खोटे ठरवित नाही. किंबहुना हे अल्लाहच्या आयतींना खोटे ठरवित आहेत. अर्थात ते अत्याचार करीत आहेत आजदेखील जे लोक पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आदर्श चारित्र्य, न्यायदान, ईमानदारी व सत्यतेविषयी खूप जोरदार भाषणे देतात, परंतु पैगंबरांचे अनुसरण करण्यात त्यांना कठीणता वाटते. पैगंबरांच्या तुलनेत ते विचार चिंतन आणि आपल्या नेत्यांच्या कथनाला जास्त महत्त्व देतात. त्यांन स्वतःलाच विचारावे की हे कोणाचे चारित्र्य आहे जे त्यांनी अंगिकारले आहे?

التفاسير: