وه‌رگێڕانی ماناكانی قورئانی پیرۆز - وەرگێڕاوی ماراتی - محمد شەفیع ئەنساڕی

الحجرات

external-link copy
1 : 49

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا لَا تُقَدِّمُوْا بَیْنَ یَدَیِ اللّٰهِ وَرَسُوْلِهٖ وَاتَّقُوا اللّٰهَ ؕ— اِنَّ اللّٰهَ سَمِیْعٌ عَلِیْمٌ ۟

१. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या पुढे जाऊ नका१ आणि अल्लाहचे भय बाळगत राहा. निःसंशय अल्लाह ऐकणारा, जाणणारा आहे. info

(१) अर्थात धर्माच्या संदर्भात स्वतःच एखादा निर्णय घेत जाऊ नका, ना स्वतःच्या आकलन व विचाराला प्राधान्य द्या, किंबहुना अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशआचे पालन करा. आपल्यातर्फे धर्मात वाढकिंवा बिदआत (नव्या गोष्टी) जारी करणे, अल्लाह आणि पैगंबराच्या पुढे जाण्याचे दुःसाहस करणे होय. जे कोणत्याही ईमानधारकासाठी योग्य नव्हे. त्याचप्रमाणे एखादा फतवा कुरआन व हदीसमध्ये विचार न करता दिला जावा आणि दिल्यानंतर जर तो शरिअतविरूद्ध दिल्याचे स्पष्ट व्हावे, तर त्यावर अडून राहणे देखील, या आयतीत दिल्या गेलेल्या अनुमतीच्या विरूद्ध आहे. ईमान राखणाऱ्याचे आचरण तर अल्लाह आणि पैगंबराच्या आदेशापुढे समर्पण आणि पालन करण्यासाठी नतमस्तक होणे होय. त्याच्या विरोधात आपले स्वतःचे कथन किंवा एखाद्या इमामाच्या विचारावर अडून राहणे नव्हे.

التفاسير:

external-link copy
2 : 49

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا لَا تَرْفَعُوْۤا اَصْوَاتَكُمْ فَوْقَ صَوْتِ النَّبِیِّ وَلَا تَجْهَرُوْا لَهٗ بِالْقَوْلِ كَجَهْرِ بَعْضِكُمْ لِبَعْضٍ اَنْ تَحْبَطَ اَعْمَالُكُمْ وَاَنْتُمْ لَا تَشْعُرُوْنَ ۟

२. हे ईमान राखणाऱ्यांनो! आपला स्वर (आवाज) पैगंबराच्या स्वरापेक्षा उंचावू नका, आणि त्यांच्याशी अशा प्रकारे उंच स्वरात बोलू नका ज्या प्रकारे आपसात एकमेकांशी बोलता. (कदाचित असे न व्हावे) की तुमची कर्मे वाया जावीत आणि तुम्हाला खबरही न व्हावी.१ info

(१) यात पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) करिता आदर सन्मान राखण्याचे वर्णन आहे, जे प्रत्येक मुसलमानाकडून अपेक्षित आहे.

التفاسير:

external-link copy
3 : 49

اِنَّ الَّذِیْنَ یَغُضُّوْنَ اَصْوَاتَهُمْ عِنْدَ رَسُوْلِ اللّٰهِ اُولٰٓىِٕكَ الَّذِیْنَ امْتَحَنَ اللّٰهُ قُلُوْبَهُمْ لِلتَّقْوٰی ؕ— لَهُمْ مَّغْفِرَةٌ وَّاَجْرٌ عَظِیْمٌ ۟

३. वस्तुतः जे लोक पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या समोर आपला स्वर धीमा (खालचा) राखतात, हेच ते लोक होत, ज्यांच्या हृदयांना, अल्लाहने तकवा (अल्लाहच्या भया) करीता पारखून घेतले आहे, त्यांच्यासाठी माफी आहे आणि फार मोठे पुण्य आहे. info
التفاسير:

external-link copy
4 : 49

اِنَّ الَّذِیْنَ یُنَادُوْنَكَ مِنْ وَّرَآءِ الْحُجُرٰتِ اَكْثَرُهُمْ لَا یَعْقِلُوْنَ ۟

४. निःसंशय, जे लोक तुम्हाला खोल्यांच्या मागून हाक मारतात, त्यांच्यापैकी अधिकांश (पूर्णतः) निर्बुद्ध आहेत. info
التفاسير: