(१) ‘‘हे....’’ संकेत आहे जहन्नमच्या शिक्षा- यातनेच्या वर्णनाकडे ज्यात जहन्नमी लोक जखडलेले असतील, तेव्हा इन्कार आणि मूर्तीपूजेचा हा मोबदला चांगला की ती सदैवकालीन जन्नत जिचा वायदा अल्लाहने, आपले भय राखणाऱ्यांना त्यांचे भय राखण्याबद्दल आणि अल्लाहचे आज्ञापालन केल्याबद्दल दिला आहे. अर्थात हा प्रश्न जहन्नममध्ये विचारला जाईल. परंतु इथे या हेतुने उल्लेखिला गेला की कदाचित जहन्नमी लोकांच्या या परिणामाने बोध प्राप्त करून अल्लाहचे भय आणि त्याच्या आदेशांचे पालन करण्याचा मार्ग अंगीकारतील आणि या दुष्परिणतीपासून आपला बचाव करतील जिचा उल्लेख या ठिकाणी केला गेला आहे.
(१) या जगात अल्लाहखेरीज ज्यांची उपासना केली जात राहिली आणि पुढेही केली जात राहील त्यात निर्जीव पदार्थ (दगड, लाकूड आणि इतर धातूंच्या मूर्त्या) देखील आहेत. तसेच अल्लाहचे सदाचारी दासही आहेत जे सजीव आहेत. उदा. हजरत उजैर आणि हजरत मसीह (येशू) व इतर नेक लोक. त्याचप्रमाणे फरिश्त्यांचे व जिन्नांचेही पुजारी असतील. अल्लाह निर्जीव वस्तुंनाही अक्कल, सामंजस्य आणि वाचा प्रदान करील. मग त्या समस्त आराध्य दैवतांना विचारील की सांगा माझ्या या दासांना तुम्ही आपल्या उपासनेचा आदेश दिला होता की ते आपल्या मर्जीने तुमचे उपासक बनून पथभ्रष्ट झाले होते?
(१) हे अल्लाहचे कथन आहे जे मूर्तीपूजकांना संबोधून अल्लाह फर्माविल की तुम्ही ज्यांना आपले आराध्य दैवत समजत होते त्यांनी तुमचे म्हणणे खोटे ठरविले आहे आणि तुम्ही पाहिले की त्यांनी तुमच्यापासून विभक्त होण्याचे ऐलानही केले आहे. अर्थात ज्यांना तुम्ही आपले समजत होते ते सहाय्यक ठरले नाहीत. तेव्हा आता काय तुम्ही हे सामर्थ्य राखता की माझी शिक्षा आपल्यावरून टाळू शकावे आणि आपली काही मदत करू शकावे?