وه‌رگێڕانی ماناكانی قورئانی پیرۆز - وەرگێڕاوی ماراتی - محمد شەفیع ئەنساڕی

external-link copy
41 : 2

وَاٰمِنُوْا بِمَاۤ اَنْزَلْتُ مُصَدِّقًا لِّمَا مَعَكُمْ وَلَا تَكُوْنُوْۤا اَوَّلَ كَافِرٍ بِهٖ ۪— وَلَا تَشْتَرُوْا بِاٰیٰتِیْ ثَمَنًا قَلِیْلًا ؗ— وَّاِیَّایَ فَاتَّقُوْنِ ۟

४१. आणि त्या (शरीअत) वर ईमान राखा, जिला मी त्याची सत्यता सिद्ध करण्यासाठी अवतरीत केले, जो (तौरात) तुमच्याजवळ आहे, आणि तुम्ही याचे सर्वप्रथम इन्कारी बनू नका आणि माझ्या आयतींना थोड्याशा किंमतीवर विकू नका १ आणि फक्त माझेच भय राखा. info

(१) ‘‘थोड्याशा किंमतीवर विकू नका’’ याचा अर्थ असा कदापि नाही की जास्त किंमत मिळाल्यास अल्लाहच्या आदेशाचा सौदा करा, किंबहुना याचा अर्थ असा की अल्लाहच्या आदेशाच्या तुलनेत ऐहिक लाभाला मुळीच महत्त्व देऊ नका. अल्लाहचे आदेश तर इतके मौल्यवान आहेत की साऱ्या जगाची सामग्री आणि चीजवस्तू त्यांच्या तुलनेत तुच्छ आहेत. आयतीत इस्राईलच्या पुत्रांकडे संकेत केला गेला असला तरी हा आदेश कयामतपर्यंत सर्व मानवांकरिता आहे. जो कोणी सत्याला सोडून असत्याची बाजू धरेल किंवा अज्ञान दाखवून केवळ ऐहिक लाभासाठी सत्याकडे पाठ फिरविल, त्याला हा आदेश लागू पडतो.

التفاسير: