وه‌رگێڕانی ماناكانی قورئانی پیرۆز - وەرگێڕاوی ماراتی - محمد شەفیع ئەنساڕی

external-link copy
188 : 2

وَلَا تَاْكُلُوْۤا اَمْوَالَكُمْ بَیْنَكُمْ بِالْبَاطِلِ وَتُدْلُوْا بِهَاۤ اِلَی الْحُكَّامِ لِتَاْكُلُوْا فَرِیْقًا مِّنْ اَمْوَالِ النَّاسِ بِالْاِثْمِ وَاَنْتُمْ تَعْلَمُوْنَ ۟۠

१८८. आणि एकमेकांचे धन चुकीच्या रीतीने खाऊ नका, ना हक्कदार लोकांना लाचलुचपत पोहचवून एखाद्याची काही संपत्ती जुलूमाने हडप करा, जरी तुम्ही हे जाणत असाल.१ info

(१) हे अशा माणसाबद्दल सांगितले गेले आहे ज्याच्याजवळ एखाद्याची काही ठेव किंवा मिळकत असावी आणि मालकाजवळ कसलाही पुरावा नसावा की ज्या आधारे तो न्यायालयातर्फे आपल्या बाजूने निर्णय करेल. अशा प्रकारे दुसऱयचा हक्क मारणे, सरासर अत्याचार आणि हराम आहे. असा मनुष्य अल्लाहच्या न्यायालयात अपराधी ठरेल. (इब्ने कसीर)

التفاسير: