وه‌رگێڕانی ماناكانی قورئانی پیرۆز - وەرگێڕاوی ماراتی - محمد شەفیع ئەنساڕی

إبراهیم

external-link copy
1 : 14

الٓرٰ ۫— كِتٰبٌ اَنْزَلْنٰهُ اِلَیْكَ لِتُخْرِجَ النَّاسَ مِنَ الظُّلُمٰتِ اِلَی النُّوْرِ ۙ۬— بِاِذْنِ رَبِّهِمْ اِلٰی صِرَاطِ الْعَزِیْزِ الْحَمِیْدِ ۟ۙ

१. आलिफ. लाम.रॉ हा (सर्वांत उत्तम) ग्रंथ आम्ही तुमच्याकडे अवतरित केला आहे, यासाठी की तुम्ही लोकांना अंधारातून प्रकाशाकडे आणावे त्यांच्या पालनकर्त्याच्या आदेशाने जबरदस्त, प्रशंसनीय अल्लाहच्या मार्गाकडे. info
التفاسير:

external-link copy
2 : 14

اللّٰهِ الَّذِیْ لَهٗ مَا فِی السَّمٰوٰتِ وَمَا فِی الْاَرْضِ ؕ— وَوَیْلٌ لِّلْكٰفِرِیْنَ مِنْ عَذَابٍ شَدِیْدِ ۟ۙ

२. आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे ते सर्व अल्लाहचेच आहे आणि काफिर (कृतघ्न) लोकांसाठी सक्त अज़ाबाचे संकट आहे. info
التفاسير:

external-link copy
3 : 14

١لَّذِیْنَ یَسْتَحِبُّوْنَ الْحَیٰوةَ الدُّنْیَا عَلَی الْاٰخِرَةِ وَیَصُدُّوْنَ عَنْ سَبِیْلِ اللّٰهِ وَیَبْغُوْنَهَا عِوَجًا ؕ— اُولٰٓىِٕكَ فِیْ ضَلٰلٍۢ بَعِیْدٍ ۟

३. जे लोक आखिरत (परलोक) च्या तुलनेत ऐहिक जीवनाचा मोह धरतात आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखतात आणि त्यात वक्रता निर्माण करू इच्छितात, हेच लोक मोठ्या दूरच्या मार्गभ्रष्टतेत आहेत. info
التفاسير:

external-link copy
4 : 14

وَمَاۤ اَرْسَلْنَا مِنْ رَّسُوْلٍ اِلَّا بِلِسَانِ قَوْمِهٖ لِیُبَیِّنَ لَهُمْ ؕ— فَیُضِلُّ اللّٰهُ مَنْ یَّشَآءُ وَیَهْدِیْ مَنْ یَّشَآءُ ؕ— وَهُوَ الْعَزِیْزُ الْحَكِیْمُ ۟

४. आणि आम्ही प्रत्येक पैगंबराला त्याच्या जनसमूहाच्या भाषेतच पाठविले आहे यासाठी की जनसमूहाच्या लोकांसमोर स्पष्टपणे सांगावे, आता अल्लाह ज्याला इच्छिल मार्गभ्रष्ट करील आणि ज्याला इच्छिल मार्ग दाखविल. तो मोठा जबरदस्त आणि हिकमतशाली आहे. info
التفاسير:

external-link copy
5 : 14

وَلَقَدْ اَرْسَلْنَا مُوْسٰی بِاٰیٰتِنَاۤ اَنْ اَخْرِجْ قَوْمَكَ مِنَ الظُّلُمٰتِ اِلَی النُّوْرِ ۙ۬— وَذَكِّرْهُمْ بِاَیّٰىمِ اللّٰهِ ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیٰتٍ لِّكُلِّ صَبَّارٍ شَكُوْرٍ ۟

५. (स्मरण करा जेव्हा) आम्ही मूसाला आपल्या निशाण्या देऊन पाठविले की तू आपल्या जनसमूहाच्या लोकांना अंधारातून काढून उजेडात आण आणि त्यांना अल्लाहच्या उपकारांची आठवण करून दे. यात निशाण्या आहेत प्रत्येक धीर-संयम राखणाऱ्याकरिता. info
التفاسير: