ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
6 : 60

لَقَدْ كَانَ لَكُمْ فِیْهِمْ اُسْوَةٌ حَسَنَةٌ لِّمَنْ كَانَ یَرْجُوا اللّٰهَ وَالْیَوْمَ الْاٰخِرَ ؕ— وَمَنْ یَّتَوَلَّ فَاِنَّ اللّٰهَ هُوَ الْغَنِیُّ الْحَمِیْدُ ۟۠

६. निसंशय, तुमच्यासाठी त्या लोकांमध्ये उत्तम आदर्श (आणि चांगले अनुसरण आहे, विशेषतः) त्या प्रत्येक माणसाकरिता, जो अल्लाह आणि कयामतच्या दिवसाच्या भेटीवर विश्वास राखत असेल आणि जर कोणी तोंड फिरविल, तर अल्लाह पूर्णतः निःस्पृह आहे आणि महानता व प्रशंसेस पात्र आहे. info
التفاسير:

external-link copy
7 : 60

عَسَی اللّٰهُ اَنْ یَّجْعَلَ بَیْنَكُمْ وَبَیْنَ الَّذِیْنَ عَادَیْتُمْ مِّنْهُمْ مَّوَدَّةً ؕ— وَاللّٰهُ قَدِیْرٌ ؕ— وَاللّٰهُ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟

७. नवल नव्हे की अल्लाहने, लवकरच तुमच्या आणि त्यांच्या दरम्यान प्रेम निर्माण करावे.१ अल्लाह सर्व सामर्थ्य बाळगतो आणि अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे. info

(१) अर्थात त्यांना मुस्लिम बनवून तुमचा बांधव आणि साथीदार बनवावे, ज्यामुळे तुमची आपसातील शत्रुता, मैत्रीत रुपांतर होईल आणि असेच घडले. मक्का विजयानंतर लोक समूहासमूहांनी इस्लाम धर्म स्वीकारू लागले आणि ते मुस्लिम होताच घृणाचे रूपांतर प्रेमात झाले. कालपर्यंत जे मुलसमानांचे रक्तपिपासू वैरी होते, ते त्यांचे जीवश्च कंठश्च बनले.

التفاسير:

external-link copy
8 : 60

لَا یَنْهٰىكُمُ اللّٰهُ عَنِ الَّذِیْنَ لَمْ یُقَاتِلُوْكُمْ فِی الدِّیْنِ وَلَمْ یُخْرِجُوْكُمْ مِّنْ دِیَارِكُمْ اَنْ تَبَرُّوْهُمْ وَتُقْسِطُوْۤا اِلَیْهِمْ ؕ— اِنَّ اللّٰهَ یُحِبُّ الْمُقْسِطِیْنَ ۟

८. ज्या लोकांनी तुमच्याशी धर्माच्या संदर्भात युद्ध केले नाही आणि तुम्हाला देशाबाहेर काढले नाही, त्यांच्याशी सद्‌व्यवहार उपकाराचे व न्यायपूर्ण वर्तन करण्यापासून अल्लाह तुम्हाला रोखत नाही. (किंबहुना) निःसंशय, अल्लाह न्याय करणाऱ्यांशी प्रेम राखतो. info
التفاسير:

external-link copy
9 : 60

اِنَّمَا یَنْهٰىكُمُ اللّٰهُ عَنِ الَّذِیْنَ قَاتَلُوْكُمْ فِی الدِّیْنِ وَاَخْرَجُوْكُمْ مِّنْ دِیَارِكُمْ وَظَاهَرُوْا عَلٰۤی اِخْرَاجِكُمْ اَنْ تَوَلَّوْهُمْ ۚ— وَمَنْ یَّتَوَلَّهُمْ فَاُولٰٓىِٕكَ هُمُ الظّٰلِمُوْنَ ۟

९. अल्लाह तुम्हाला केवळ त्या लोकांशी प्रेम राखण्यापासून रोखतो, ज्यांनी तुमच्याशी धर्माच्या बाबतीत लढाई केली आणि तुम्हाला देशाबाहेर काढले आणी देशाबाहेर काढणाऱ्यांना मदत केली, जे लोक अशा काफिरांशी प्रेम राखतील तेच निश्चितपणे अत्याचारी आहेत. info
التفاسير:

external-link copy
10 : 60

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْۤا اِذَا جَآءَكُمُ الْمُؤْمِنٰتُ مُهٰجِرٰتٍ فَامْتَحِنُوْهُنَّ ؕ— اَللّٰهُ اَعْلَمُ بِاِیْمَانِهِنَّ ۚ— فَاِنْ عَلِمْتُمُوْهُنَّ مُؤْمِنٰتٍ فَلَا تَرْجِعُوْهُنَّ اِلَی الْكُفَّارِ ؕ— لَا هُنَّ حِلٌّ لَّهُمْ وَلَا هُمْ یَحِلُّوْنَ لَهُنَّ ؕ— وَاٰتُوْهُمْ مَّاۤ اَنْفَقُوْا ؕ— وَلَا جُنَاحَ عَلَیْكُمْ اَنْ تَنْكِحُوْهُنَّ اِذَاۤ اٰتَیْتُمُوْهُنَّ اُجُوْرَهُنَّ ؕ— وَلَا تُمْسِكُوْا بِعِصَمِ الْكَوَافِرِ وَسْـَٔلُوْا مَاۤ اَنْفَقْتُمْ وَلْیَسْـَٔلُوْا مَاۤ اَنْفَقُوْا ؕ— ذٰلِكُمْ حُكْمُ اللّٰهِ ؕ— یَحْكُمُ بَیْنَكُمْ ؕ— وَاللّٰهُ عَلِیْمٌ حَكِیْمٌ ۟

१०. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुमच्याजवळ ईमान राखणाऱ्या स्त्रिया देशत्याग करून येतील, तेव्हा तुम्ही त्यांची परीक्षा घेत जा. वस्तुतः त्यांच्या ईमानास चांगल्या प्रकारे जाणणारा तर अल्लाहच आहे, परंतु जर त्या तुम्हाला ईमान राखणाऱ्या वाटतील, तर मग तुम्ही त्यांना काफिरांकडे परत पाठवू नका. या त्यांच्यासाठी हलाल (वैध) नाहीत आणि ना ते यांच्यासाठी हलाल आहेत, आणि जो काही खर्च त्या काफिरांनी केला असेल, तो त्यांना देऊन टाका, त्या स्त्रियांना त्यांचा महर अदा करून त्याच्याशी विवाह करून घेण्यात तुमच्यावर कसलाही गुन्हा नाही. आणि काफिर स्त्रियांच्या विवाहबंधनास आपल्या कब्जात ठेवू नका आणि जो काही खर्च तुम्ही केला असेल तो मागून घ्या आणि जो काही खर्च त्या काफिरांनी केला असेल, तो त्यांनीही मागून घ्यावा. हा अल्लाहचा फैसला आहे, जो तुमच्या दरम्यान करीत आहे आणि अल्लाह जाणणारा (आणि) हिकमत बाळगणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
11 : 60

وَاِنْ فَاتَكُمْ شَیْءٌ مِّنْ اَزْوَاجِكُمْ اِلَی الْكُفَّارِ فَعَاقَبْتُمْ فَاٰتُوا الَّذِیْنَ ذَهَبَتْ اَزْوَاجُهُمْ مِّثْلَ مَاۤ اَنْفَقُوْا ؕ— وَاتَّقُوا اللّٰهَ الَّذِیْۤ اَنْتُمْ بِهٖ مُؤْمِنُوْنَ ۟

११. आणि जर तुमची एखादी पत्नी तुमच्या हातून निघून जावी आणि काफिरांजवळ चालली जावी, मग तुम्हाला सूडाची संधी (वेळ) मिळावी तर ज्यांच्या पत्न्या चालल्या गेल्या आहेत, त्यांना त्यांच्या खर्चाइतके अदा करा, आणि त्या अल्लाहचे भय बाळगत राहा ज्यावर तुम्ही ईमान राखता. info
التفاسير: