ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
48 : 39

وَبَدَا لَهُمْ سَیِّاٰتُ مَا كَسَبُوْا وَحَاقَ بِهِمْ مَّا كَانُوْا بِهٖ یَسْتَهْزِءُوْنَ ۟

४८. आणि जे काही (कर्म) त्यांनी केले होते, त्याची दुष्परिणती त्यांच्यावर उघड होईल आणि ज्या गोष्टीची ते थट्टा उडवित होते, ती त्यांना येऊन घेरील. info
التفاسير:

external-link copy
49 : 39

فَاِذَا مَسَّ الْاِنْسَانَ ضُرٌّ دَعَانَا ؗ— ثُمَّ اِذَا خَوَّلْنٰهُ نِعْمَةً مِّنَّا ۙ— قَالَ اِنَّمَاۤ اُوْتِیْتُهٗ عَلٰی عِلْمٍ ؕ— بَلْ هِیَ فِتْنَةٌ وَّلٰكِنَّ اَكْثَرَهُمْ لَا یَعْلَمُوْنَ ۟

४९. माणसाला जेव्हा एखादे दुःख यातना पोहोचते तेव्हा तो आम्हाला पुकारतो, मग जेव्हा आम्ही त्याला आपल्यातर्फे एखादे सुखप्रदान करतो, तेव्हा म्हणू लागतो की हे तर मला केवळ आपल्या अक्कल हुशारीमुळे प्रदान केले गेले आहे, किंबहुना ही कसोटी आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक हे जाणत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
50 : 39

قَدْ قَالَهَا الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ فَمَاۤ اَغْنٰی عَنْهُمْ مَّا كَانُوْا یَكْسِبُوْنَ ۟

५०. यांच्या पूर्वीचे लोक देखील हीच गोष्ट बोलले आहेत, तेव्हा त्यांची कृत कर्मे त्यांच्या काहीच उपयोगी पडली नाहीत. info
التفاسير:

external-link copy
51 : 39

فَاَصَابَهُمْ سَیِّاٰتُ مَا كَسَبُوْا ؕ— وَالَّذِیْنَ ظَلَمُوْا مِنْ هٰۤؤُلَآءِ سَیُصِیْبُهُمْ سَیِّاٰتُ مَا كَسَبُوْا ۙ— وَمَا هُمْ بِمُعْجِزِیْنَ ۟

५१. मग त्यांच्या (कर्मांची) समस्त दुष्परिणती त्यांच्यावर येऊन कोसळली आणि यांच्यापैकी जे दुराचारी आहेत, त्यांच्या कृत-कर्मांची दुष्परिणतीही आता त्यांच्यावर येऊन कोसळेल. हे (आम्हाला) परास्त करणारे नाहीत. info
التفاسير:

external-link copy
52 : 39

اَوَلَمْ یَعْلَمُوْۤا اَنَّ اللّٰهَ یَبْسُطُ الرِّزْقَ لِمَنْ یَّشَآءُ وَیَقْدِرُ ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیٰتٍ لِّقَوْمٍ یُّؤْمِنُوْنَ ۟۠

५२. काय त्यांना हे नाही माहीत की अल्लाह ज्याच्यासाठी इच्छितो आजिविका वाढवितो आणि ज्याच्यासाठी इच्छितो मोजून मापून देतो, ईमान राखणाऱ्यांकरिता यात मोठमोठ्या निशाण्या आहेत. info
التفاسير:

external-link copy
53 : 39

قُلْ یٰعِبَادِیَ الَّذِیْنَ اَسْرَفُوْا عَلٰۤی اَنْفُسِهِمْ لَا تَقْنَطُوْا مِنْ رَّحْمَةِ اللّٰهِ ؕ— اِنَّ اللّٰهَ یَغْفِرُ الذُّنُوْبَ جَمِیْعًا ؕ— اِنَّهٗ هُوَ الْغَفُوْرُ الرَّحِیْمُ ۟

५३. (माझ्यातर्फे) सांगा की, हे माझ्या दासांनो! ज्यांनी आपल्या प्राणांवर अत्याचार केला आहे, तुम्ही अल्लाहच्या कृपेपासून निराश होऊ नका. निःसंशय, अल्लाह समस्त अपराधांना माफ करतो. वस्तुतः तो मोठा माफ करणारा, मोठा दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
54 : 39

وَاَنِیْبُوْۤا اِلٰی رَبِّكُمْ وَاَسْلِمُوْا لَهٗ مِنْ قَبْلِ اَنْ یَّاْتِیَكُمُ الْعَذَابُ ثُمَّ لَا تُنْصَرُوْنَ ۟

५४. आणि तुम्ही सर्व आपल्या पालनकर्त्याकडे झुका आणि त्याचे आज्ञापालन करीत राहा, यापूर्वी की तुमच्याजवळ अज़ाब येऊन पोहचावा, मग तुमची मदत न केली जावी. info
التفاسير:

external-link copy
55 : 39

وَاتَّبِعُوْۤا اَحْسَنَ مَاۤ اُنْزِلَ اِلَیْكُمْ مِّنْ رَّبِّكُمْ مِّنْ قَبْلِ اَنْ یَّاْتِیَكُمُ الْعَذَابُ بَغْتَةً وَّاَنْتُمْ لَا تَشْعُرُوْنَ ۟ۙ

५५. आणि अनुसरण करा त्या सर्वांत उत्तम गोष्टीचे, जी तुमच्याकडे तुमच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित केली गेली आहे, यापूर्वी की तुमच्यावर अचानक अल्लाहची शिक्षा यातना यावी आणि तुम्हाला खबरही न व्हावी. info
التفاسير:

external-link copy
56 : 39

اَنْ تَقُوْلَ نَفْسٌ یّٰحَسْرَتٰی عَلٰی مَا فَرَّطْتُ فِیْ جَنْۢبِ اللّٰهِ وَاِنْ كُنْتُ لَمِنَ السّٰخِرِیْنَ ۟ۙ

५६. (असे न व्हावे की) एखाद्या माणसाने म्हणावे की, अरेरे! खेद आहे या गोष्टीवर की मी अल्लाहच्या बाबतीत सुस्ती केली, किंबहुना मी थट्टा उडविणाऱ्यांमध्येच राहिलो. info
التفاسير: