ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
6 : 39

خَلَقَكُمْ مِّنْ نَّفْسٍ وَّاحِدَةٍ ثُمَّ جَعَلَ مِنْهَا زَوْجَهَا وَاَنْزَلَ لَكُمْ مِّنَ الْاَنْعَامِ ثَمٰنِیَةَ اَزْوَاجٍ ؕ— یَخْلُقُكُمْ فِیْ بُطُوْنِ اُمَّهٰتِكُمْ خَلْقًا مِّنْ بَعْدِ خَلْقٍ فِیْ ظُلُمٰتٍ ثَلٰثٍ ؕ— ذٰلِكُمُ اللّٰهُ رَبُّكُمْ لَهُ الْمُلْكُ ؕ— لَاۤ اِلٰهَ اِلَّا هُوَ ۚ— فَاَنّٰی تُصْرَفُوْنَ ۟

६. त्याने तुम्हा सर्वांना एकाच जिवापासून निर्माण केले, मग त्यापासून त्याची जोडी निर्माण केली आणि तुमच्याकरिता जनावरांपैकी आठ जोडे (नर-मादा) अवतरित केले. तो तुम्हाला तुमच्या मातांच्या गर्भामध्ये एका स्वरूपानंतर दुसऱ्या स्वरुपात घडवितो, तीन तीन अंधारामध्ये हाच अल्लाह तुमचा रब (स्वामी व पालनकर्ता) आहे त्याच्याचकरिता राज्यसत्ता आहे, त्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही. मग तुम्ही कोठे भटकत जात आहात? info
التفاسير:

external-link copy
7 : 39

اِنْ تَكْفُرُوْا فَاِنَّ اللّٰهَ غَنِیٌّ عَنْكُمْ ۫— وَلَا یَرْضٰی لِعِبَادِهِ الْكُفْرَ ۚ— وَاِنْ تَشْكُرُوْا یَرْضَهُ لَكُمْ ؕ— وَلَا تَزِرُ وَازِرَةٌ وِّزْرَ اُخْرٰی ؕ— ثُمَّ اِلٰی رَبِّكُمْ مَّرْجِعُكُمْ فَیُنَبِّئُكُمْ بِمَا كُنْتُمْ تَعْمَلُوْنَ ؕ— اِنَّهٗ عَلِیْمٌۢ بِذَاتِ الصُّدُوْرِ ۟

७. जर तुम्ही कृतघ्नता कराल तर (लक्षात ठेवा की) अल्लाह तुम्हा सर्वांपासून निःस्पृह आहे आणि तो आपल्या दासांच्या कृतघ्नतेने खूश नाही आणि जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल तर तो त्यास तुमच्यासाठी पसंत करील आणि कोणीही कोणाचे ओझे उचलणार नाही, मग तुम्हा सर्वांचे परतणे तुमच्या पालनकर्त्याकडेच आहे, तो तुम्हाला दाखवून देईल, जे काही तुम्ही करत होते. निःसंशय, तो मनातल्या गोष्टी देखील जाणतो. info
التفاسير:

external-link copy
8 : 39

وَاِذَا مَسَّ الْاِنْسَانَ ضُرٌّ دَعَا رَبَّهٗ مُنِیْبًا اِلَیْهِ ثُمَّ اِذَا خَوَّلَهٗ نِعْمَةً مِّنْهُ نَسِیَ مَا كَانَ یَدْعُوْۤا اِلَیْهِ مِنْ قَبْلُ وَجَعَلَ لِلّٰهِ اَنْدَادًا لِّیُضِلَّ عَنْ سَبِیْلِهٖ ؕ— قُلْ تَمَتَّعْ بِكُفْرِكَ قَلِیْلًا ۖۗ— اِنَّكَ مِنْ اَصْحٰبِ النَّارِ ۟

८. आणि माणसाला जेव्हा एखादे दुःख पोहोचते, तेव्हा तो खूप ध्यान एकवटून आपल्या पालनकर्त्यास पुकारतो. मग जेव्हा अल्लहा आपल्याकडुन त्याला सुख प्रदान करतो तो याच्यापूर्वी जी दुआ - प्रार्थना करीत होता, तिला पूर्णपणे विसरतो, आणि अल्लाहचे भागीदार ठरवू लागतो. ज्याद्वारे (इतरांनाही) त्याच्या मार्गापासून विचलित करावे. (तुम्ही) सांगा की आपल्या कुप्र (सत्य-विरोधा) चा फायदा आणखी काही दिवस उचलून घ्या, (शेवटी) तू जहन्नमवासींपैकी होणार आहेस. info
التفاسير:

external-link copy
9 : 39

اَمَّنْ هُوَ قَانِتٌ اٰنَآءَ الَّیْلِ سَاجِدًا وَّقَآىِٕمًا یَّحْذَرُ الْاٰخِرَةَ وَیَرْجُوْا رَحْمَةَ رَبِّهٖ ؕ— قُلْ هَلْ یَسْتَوِی الَّذِیْنَ یَعْلَمُوْنَ وَالَّذِیْنَ لَا یَعْلَمُوْنَ ؕ— اِنَّمَا یَتَذَكَّرُ اُولُوا الْاَلْبَابِ ۟۠

९. काय तो मनुष्य, जो रात्रीच्या वेळी सजदा आणि उभे राहण्याच्या अवस्थेत उपासना करण्यात घालवित असेल, आखिरतचे भय बाळगत असेल आणि आपल्या पालनकर्त्याच्या दया - कृपेची आस बाळगत असेल, आणि तो, जो याच्या उलट असेल, समान असू शकतात, बरे हे सांगा की विद्वान आणि अज्ञानी दोघे समान आहेत? निःसंशय, बोध तर तेच प्राप्त करतात, जे बुद्धिमान असतील. info
التفاسير:

external-link copy
10 : 39

قُلْ یٰعِبَادِ الَّذِیْنَ اٰمَنُوا اتَّقُوْا رَبَّكُمْ ؕ— لِلَّذِیْنَ اَحْسَنُوْا فِیْ هٰذِهِ الدُّنْیَا حَسَنَةٌ ؕ— وَاَرْضُ اللّٰهِ وَاسِعَةٌ ؕ— اِنَّمَا یُوَفَّی الصّٰبِرُوْنَ اَجْرَهُمْ بِغَیْرِ حِسَابٍ ۟

१०. सांगा, (अल्लाह फर्मावितो) की हे माझ्या ईमान राखणाऱ्या दासांनो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगत राहा. जे या जगात सत्कर्म करीत राहतात त्याच्यासाठी उत्तम मोबदला आहे आणि अल्लाहची धरती मोठी विशाल (विस्तृत) आहे. धीर संयम राखणाऱ्यांनाच त्यांचा पुरेपूर अगणित मोबदला दिला जातो. info
التفاسير: