ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
55 : 16

لِیَكْفُرُوْا بِمَاۤ اٰتَیْنٰهُمْ ؕ— فَتَمَتَّعُوْا ۫— فَسَوْفَ تَعْلَمُوْنَ ۟

५५. यासाठी की आम्ही प्रदान केलेल्या देणग्यांशी कृतघ्नता दाखवावी (ठीक आहे) थोडा लाभ प्राप्त करून घ्या. शेवटी तुम्हाला माहीतच पडेल. info
التفاسير:

external-link copy
56 : 16

وَیَجْعَلُوْنَ لِمَا لَا یَعْلَمُوْنَ نَصِیْبًا مِّمَّا رَزَقْنٰهُمْ ؕ— تَاللّٰهِ لَتُسْـَٔلُنَّ عَمَّا كُنْتُمْ تَفْتَرُوْنَ ۟

५६. आणि ज्याला ते जाणतही नाही, त्याचा हिस्सा आम्ही दिलेल्या वस्तूंमध्ये निश्चित करतात, अल्लाहची शपथ! तुमच्या या आरोपाबद्दल तुम्हाला अवश्य विचारणा होईल. info
التفاسير:

external-link copy
57 : 16

وَیَجْعَلُوْنَ لِلّٰهِ الْبَنٰتِ سُبْحٰنَهٗ ۙ— وَلَهُمْ مَّا یَشْتَهُوْنَ ۟

५७. आणि ते पवित्र अल्लाहकरीता मुली निर्धारीत करतात, आणि स्वतःसाठी ते, जे त्यांच्या इच्छेनुसार असेल. info
التفاسير:

external-link copy
58 : 16

وَاِذَا بُشِّرَ اَحَدُهُمْ بِالْاُ ظَلَّ وَجْهُهٗ مُسْوَدًّا وَّهُوَ كَظِیْمٌ ۟ۚ

५८. आणि त्यांच्यापैकी जेव्हा एखाद्याला मुलगी झाल्याची खबर दिली जाते तेव्हा त्याचे तोंड काळवंडते आणि तो मनातल्या मनात कुढू लागतो. info
التفاسير:

external-link copy
59 : 16

یَتَوَارٰی مِنَ الْقَوْمِ مِنْ سُوْٓءِ مَا بُشِّرَ بِهٖ ؕ— اَیُمْسِكُهٗ عَلٰی هُوْنٍ اَمْ یَدُسُّهٗ فِی التُّرَابِ ؕ— اَلَا سَآءَ مَا یَحْكُمُوْنَ ۟

५९. या वाईट बातमीमुळे, लोकांपासून तोंड लपवित फिरतो विचार करतो काय या अपमानाला सोबतच राहू द्यावी की हिला मातीत गाडून टाकावे किती वाईट निर्णय घेतात हे! info
التفاسير:

external-link copy
60 : 16

لِلَّذِیْنَ لَا یُؤْمِنُوْنَ بِالْاٰخِرَةِ مَثَلُ السَّوْءِ ۚ— وَلِلّٰهِ الْمَثَلُ الْاَعْلٰی ؕ— وَهُوَ الْعَزِیْزُ الْحَكِیْمُ ۟۠

६०. आखिरतवर ईमान न राखणाऱ्यांचेच वाईट उदाहरण आहे. अल्लाहकरिता तर अतिशय उच्च उदाहरण आहे. तो मोठा वर्चस्वशाली आणि हिकमत बाळगणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
61 : 16

وَلَوْ یُؤَاخِذُ اللّٰهُ النَّاسَ بِظُلْمِهِمْ مَّا تَرَكَ عَلَیْهَا مِنْ دَآبَّةٍ وَّلٰكِنْ یُّؤَخِّرُهُمْ اِلٰۤی اَجَلٍ مُّسَمًّی ۚ— فَاِذَا جَآءَ اَجَلُهُمْ لَا یَسْتَاْخِرُوْنَ سَاعَةً وَّلَا یَسْتَقْدِمُوْنَ ۟

६१. आणि जर लोकांच्या दुराचाराबद्दल अल्लाहने त्यांना पकडीत घेणे सुरू केले असते तर धरतीवर एक देखील जीव वाचला नसता, परंतु तो तर त्यांना एका निर्धारीत अवधीपर्यंत ढील (सवड) देतो, मग जेव्हा त्यांची ती वेळ येते तेव्हा ते एक क्षण ना मागे राहू शकतात आणि ना पुढे जाऊ शकतात. info
التفاسير:

external-link copy
62 : 16

وَیَجْعَلُوْنَ لِلّٰهِ مَا یَكْرَهُوْنَ وَتَصِفُ اَلْسِنَتُهُمُ الْكَذِبَ اَنَّ لَهُمُ الْحُسْنٰی ؕ— لَا جَرَمَ اَنَّ لَهُمُ النَّارَ وَاَنَّهُمْ مُّفْرَطُوْنَ ۟

६२. आणि ते स्वतःसाठी जे अप्रिय समजतात, ते अल्लाहसाठी सिद्ध करतात आणि त्यांच्या जीभा खोट्या गोष्टींचे वर्णन करतात की त्यांच्यासाठी भलाई आहे?(मुळीच नाही), वास्तविक त्यांच्यासाठी आग आहे आणि हे लोक, जहन्नमी लोकांच्या पुढे पुढे जाणारे आहेत. info
التفاسير:

external-link copy
63 : 16

تَاللّٰهِ لَقَدْ اَرْسَلْنَاۤ اِلٰۤی اُمَمٍ مِّنْ قَبْلِكَ فَزَیَّنَ لَهُمُ الشَّیْطٰنُ اَعْمَالَهُمْ فَهُوَ وَلِیُّهُمُ الْیَوْمَ وَلَهُمْ عَذَابٌ اَلِیْمٌ ۟

६३. अल्लाहची शपथ! आम्ही तुमच्या पूर्वीच्या जनसमूहांकडेही आपले पैगंबर पाठविले, परंतु सैतानाने त्यांच्या दुष्कर्मांना त्यांच्या नजरेत चांगले ठरविले. तो सैतान आज देखील त्यांचा दोस्त बनलेला आहे आणि त्यांच्यासाठी दुःखदायक अज़ाब आहे. info
التفاسير:

external-link copy
64 : 16

وَمَاۤ اَنْزَلْنَا عَلَیْكَ الْكِتٰبَ اِلَّا لِتُبَیِّنَ لَهُمُ الَّذِی اخْتَلَفُوْا فِیْهِ ۙ— وَهُدًی وَّرَحْمَةً لِّقَوْمٍ یُّؤْمِنُوْنَ ۟

६४. आणि हा ग्रंथ आम्ही तुमच्यावर अशासाठी अवतरित केला आहे की तुम्ही ती प्रत्येक गोष्ट उघड करावी, ज्याबाबत ते मतभेद करीत आहेत आणि हा ग्रंथ ईमान राखणाऱ्यांकरिता मार्गदर्शन आणि दया आहे. info
التفاسير: