ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
119 : 16

ثُمَّ اِنَّ رَبَّكَ لِلَّذِیْنَ عَمِلُوا السُّوْٓءَ بِجَهَالَةٍ ثُمَّ تَابُوْا مِنْ بَعْدِ ذٰلِكَ وَاَصْلَحُوْۤا اِنَّ رَبَّكَ مِنْ بَعْدِهَا لَغَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟۠

११९. की जो कोणी अज्ञानाने वाईट कर्म करील, मग त्यानंतर तौबा (क्षमा-याचना) करील आणि (आपल्या आचरणात) सुधारणाही करून घेईल तर मग तुमचा पालनकर्ता निश्चितच मोठा माफ करणारा आणि अतिशय दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
120 : 16

اِنَّ اِبْرٰهِیْمَ كَانَ اُمَّةً قَانِتًا لِّلّٰهِ حَنِیْفًا ؕ— وَلَمْ یَكُ مِنَ الْمُشْرِكِیْنَ ۟ۙ

१२०. निःसंशय, इब्राहीम (मुस्लिम जनसमूहाचे) प्रमुख आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे मोठे आज्ञाधारक, सगळीकडून अलग होऊन फक्त एक अल्लाहचे झाले होते आणि अनेक ईश्वरांची उपासना करणाऱ्यांपैकी नव्हते. info
التفاسير:

external-link copy
121 : 16

شَاكِرًا لِّاَنْعُمِهٖ ؕ— اِجْتَبٰىهُ وَهَدٰىهُ اِلٰی صِرَاطٍ مُّسْتَقِیْمٍ ۟

१२१. सर्वश्रेष्ठ अल्लाहने प्रदान केलेल्या कृपा देणग्यांबद्दल कृतज्ञशील होते. अल्लाहने त्यांना निवडून घेतले होते आणि त्यांना सरळ मार्ग दाखविला होता. info
التفاسير:

external-link copy
122 : 16

وَاٰتَیْنٰهُ فِی الدُّنْیَا حَسَنَةً ؕ— وَاِنَّهٗ فِی الْاٰخِرَةِ لَمِنَ الصّٰلِحِیْنَ ۟ؕ

१२२. आणि आम्ही त्यांना या जगातही भलाई प्रदान केली आणि निःसंशय आखिरतमध्येही ते नेक सदाचारी लोकांपैकी आहेत. info
التفاسير:

external-link copy
123 : 16

ثُمَّ اَوْحَیْنَاۤ اِلَیْكَ اَنِ اتَّبِعْ مِلَّةَ اِبْرٰهِیْمَ حَنِیْفًا ؕ— وَمَا كَانَ مِنَ الْمُشْرِكِیْنَ ۟

१२३. मग आम्ही तुमच्याकडे वहयी (प्रकाशना) पाठविली की तुम्ही इब्राहीमच्याच मार्गाचे अनुसरण करा, जे सर्वांपासून अलग होऊन एक अल्लाहचे झाले होते आणि ते अनेक ईश्वरांची उपासना करणाऱ्यांपैकी नव्हते. info
التفاسير:

external-link copy
124 : 16

اِنَّمَا جُعِلَ السَّبْتُ عَلَی الَّذِیْنَ اخْتَلَفُوْا فِیْهِ ؕ— وَاِنَّ رَبَّكَ لَیَحْكُمُ بَیْنَهُمْ یَوْمَ الْقِیٰمَةِ فِیْمَا كَانُوْا فِیْهِ یَخْتَلِفُوْنَ ۟

१२४. शनिवारच्या दिवसाचे महत्त्व तर फक्त त्या लोकांकरिता अत्यावश्य ठरविले गेले होते, ज्यांनी त्यात मतभेद केला होता. वास्तविक तुमचा पालनकर्ता स्वतःच त्यांच्यात त्यांच्या मतभेदाचा फैसला कयामतच्या दिवशी करेल. info
التفاسير:

external-link copy
125 : 16

اُدْعُ اِلٰی سَبِیْلِ رَبِّكَ بِالْحِكْمَةِ وَالْمَوْعِظَةِ الْحَسَنَةِ وَجَادِلْهُمْ بِالَّتِیْ هِیَ اَحْسَنُ ؕ— اِنَّ رَبَّكَ هُوَ اَعْلَمُ بِمَنْ ضَلَّ عَنْ سَبِیْلِهٖ وَهُوَ اَعْلَمُ بِالْمُهْتَدِیْنَ ۟

१२५. आपल्या पालनकर्त्याकडे लोकांना हिकमतीने आणि उत्तम अशा शिकवणीसह बोलवा आणि त्यांच्याशी खूप चांगल्या प्रकारे बोला. निःसंशय तुमचा पालनकर्ता, आपल्या मार्गापासून भटकलेल्या लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो आणि सन्मार्गावर चालणाऱ्यांनाही तो पूर्णतः जाणून आहे. info
التفاسير:

external-link copy
126 : 16

وَاِنْ عَاقَبْتُمْ فَعَاقِبُوْا بِمِثْلِ مَا عُوْقِبْتُمْ بِهٖ ؕ— وَلَىِٕنْ صَبَرْتُمْ لَهُوَ خَیْرٌ لِّلصّٰبِرِیْنَ ۟

१२६. आणि (एखाद्याशी) सूड घ्यायचाच असेल तर अगदी तेवढाच घ्या जेवढे दुःख तुम्हाला पोहचविले गेले असेल आणि जर सबुरी राखाला तर निःसंशय सबुरी राखणाऱ्यांसाठी हेच उत्तम आहे. info
التفاسير:

external-link copy
127 : 16

وَاصْبِرْ وَمَا صَبْرُكَ اِلَّا بِاللّٰهِ وَلَا تَحْزَنْ عَلَیْهِمْ وَلَا تَكُ فِیْ ضَیْقٍ مِّمَّا یَمْكُرُوْنَ ۟

१२७. तुम्ही धीर-संयम राखा. अल्लाहच्या दयेविना तुम्ही धीर-संयम राखूच शकत नाही आणि त्यांच्या अवस्थेने दुःखी कष्टी होऊ नका आणि जो कावेबाजपणा हे करतात, त्यामुळे मन संकुचित करू नका. info
التفاسير:

external-link copy
128 : 16

اِنَّ اللّٰهَ مَعَ الَّذِیْنَ اتَّقَوْا وَّالَّذِیْنَ هُمْ مُّحْسِنُوْنَ ۟۠

१२८. निःसंशय, जे लोक अल्लाहचे भय राखून, दुराचारापासून दूर राहतात आणि सत्कर्म करीत राहतात, अल्लाह त्यांच्या पाठीशी आहे. info
التفاسير: