クルアーンの対訳 - マラーティー語対訳 - Muhammad Shafi Ansari

ページ番号:close

external-link copy
68 : 7

اُبَلِّغُكُمْ رِسٰلٰتِ رَبِّیْ وَاَنَا لَكُمْ نَاصِحٌ اَمِیْنٌ ۟

६८. मी तुम्हाला आपल्या पालनकर्त्याचा संदेश पोहचवितो, आणि तुमचा प्रामाणिक हितचिंतक आहे. info
التفاسير:

external-link copy
69 : 7

اَوَعَجِبْتُمْ اَنْ جَآءَكُمْ ذِكْرٌ مِّنْ رَّبِّكُمْ عَلٰی رَجُلٍ مِّنْكُمْ لِیُنْذِرَكُمْ ؕ— وَاذْكُرُوْۤا اِذْ جَعَلَكُمْ خُلَفَآءَ مِنْ بَعْدِ قَوْمِ نُوْحٍ وَّزَادَكُمْ فِی الْخَلْقِ بَصْۜطَةً ۚ— فَاذْكُرُوْۤا اٰلَآءَ اللّٰهِ لَعَلَّكُمْ تُفْلِحُوْنَ ۟

६९. काय तुम्हाला आश्चर्य वाटते की तुमच्या पालनकर्त्यातर्फे एखादी बोधपूर्ण गोष्ट तुमच्यातल्याच एका माणसाजवळ आली आहे, यासाठी की त्याने तुम्हाला सचेत करावे. स्मरण करा, जेव्हा अल्लाहने तुम्हाला नूहच्या जनसमूहानंतर त्यांच्या जागी केले आणि तुमचा शरीर-बांधा अधिक वाढविला, यास्तव तुम्ही अल्लाहच्या कृपा देणग्यांचे स्मरण करा यासाठी की सफल व्हावे. info
التفاسير:

external-link copy
70 : 7

قَالُوْۤا اَجِئْتَنَا لِنَعْبُدَ اللّٰهَ وَحْدَهٗ وَنَذَرَ مَا كَانَ یَعْبُدُ اٰبَآؤُنَا ۚ— فَاْتِنَا بِمَا تَعِدُنَاۤ اِنْ كُنْتَ مِنَ الصّٰدِقِیْنَ ۟

७०. जनसमूहाचे लोक म्हणाले, काय तुम्ही आमच्याजवळ एवढ्यासाठी आला आहात की आम्ही फक्त एक अल्लाहची उपासना करावी आणि आपल्या वाडवडिलांच्या उपास्य दैवतांचा त्याग करावा.१ तेव्हा ज्या गोष्टीची तुम्ही आम्हाला धमकी देत आहात, ती आणा जर तुम्ही सच्चे असाल. info

(१) ‘हाच’शी अभिप्रेत पवित्र कुरआन होय किंवा इस्लाम धर्म किंवा अल्लाहचे ते आदेश, जे प्रामुख्याने या आयतीत वर्णिले गेले आहेत आणि तो तौहीद (एकेश्वरवाद) मरणोत्तर परिणती आणि प्रेषित्व आणि हेच इस्लामचे तीन मूलाधार आहेत, ज्याच्या आसावर संपूर्ण इस्लामी कायदे फिरतात. यास्तव याचा जोदेखील अर्थ घेतला जाईल, एकच अर्थ आहे.

التفاسير:

external-link copy
71 : 7

قَالَ قَدْ وَقَعَ عَلَیْكُمْ مِّنْ رَّبِّكُمْ رِجْسٌ وَّغَضَبٌ ؕ— اَتُجَادِلُوْنَنِیْ فِیْۤ اَسْمَآءٍ سَمَّیْتُمُوْهَاۤ اَنْتُمْ وَاٰبَآؤُكُمْ مَّا نَزَّلَ اللّٰهُ بِهَا مِنْ سُلْطٰنٍ ؕ— فَانْتَظِرُوْۤا اِنِّیْ مَعَكُمْ مِّنَ الْمُنْتَظِرِیْنَ ۟

७१. हूद म्हणाले, तुमच्या पालनकर्त्यातर्फे तुमच्यावर शिक्षा आणि प्रकोप येऊनच पोहचला. काय तुम्ही माझ्याशी काही अशा नावांविषयी वाद घालता, जे तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी ठेवून घेतलेत ज्यांचे कसलेही प्रमाण अल्लाहने उतरविले नाही. तुम्ही प्रतिक्षा करा. तुमच्यासोबत मीदेखील प्रतिक्षा करतो. info
التفاسير:

external-link copy
72 : 7

فَاَنْجَیْنٰهُ وَالَّذِیْنَ مَعَهٗ بِرَحْمَةٍ مِّنَّا وَقَطَعْنَا دَابِرَ الَّذِیْنَ كَذَّبُوْا بِاٰیٰتِنَا وَمَا كَانُوْا مُؤْمِنِیْنَ ۟۠

७२. तेव्हा आम्ही त्यांना आणि त्यांच्या अनुयायींना आपल्या दयेने वाचवून घेतले आणि त्या लोकांची मुळे कापून टाकली, ज्यांनी आमच्या आयतींना खोटे ठरविले आणि ते ईमानधारक नव्हते. info
التفاسير:

external-link copy
73 : 7

وَاِلٰی ثَمُوْدَ اَخَاهُمْ صٰلِحًا ۘ— قَالَ یٰقَوْمِ اعْبُدُوا اللّٰهَ مَا لَكُمْ مِّنْ اِلٰهٍ غَیْرُهٗ ؕ— قَدْ جَآءَتْكُمْ بَیِّنَةٌ مِّنْ رَّبِّكُمْ ؕ— هٰذِهٖ نَاقَةُ اللّٰهِ لَكُمْ اٰیَةً فَذَرُوْهَا تَاْكُلْ فِیْۤ اَرْضِ اللّٰهِ وَلَا تَمَسُّوْهَا بِسُوْٓءٍ فَیَاْخُذَكُمْ عَذَابٌ اَلِیْمٌ ۟

७३. आणि समूदकडे त्यांचा भाऊ सॉलेह (पाठविले). सॉलेह म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! अल्लाहची उपासना करा, त्याच्याखेरीज तुमचा कोणीही माबूद (उपास्य) नाही. तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्यातर्फे प्रमाण येऊन पोहोचले. ही अल्लाहची सांडणी तुमच्याकरिता निशाणी आहे, तिला अल्लाहच्या धरतीत खाण्या (चरण्या) साठी सोडून द्या. तिला वाईट इराद्याने हात लावू नका, अन्यथा दुःखदायक अज़ाब तुम्हाला येऊन धरेल. info
التفاسير: