(१) ‘मसजिद’चा अर्थ सजदा करण्याचे स्थान. सजदा नमाजचा एक स्तंभ (अनिवार्य कृती) आहे. यास्तव नमाज पढण्याच्या ठिकाणास मस्जिद म्हणतात. आयतीचा अर्थ स्पष्ट आहे की मस्जिदीचा उद्देश केवळ एक अल्लाहची उपासना होय. यास्तव मस्जिदींमध्ये दुसऱ्या कोणाची उपासना, दुसऱ्या कोणाला दुआ (प्रार्थना), आर्जव, गाऱ्हाणे किंवा त्यास मदतीसाठी पुकारणे वैध नाही. जर इथेही अल्लाहखेरीज दुसऱ्या कोणाला पुकारले जाऊ लागले तर हे फार वाईट आणि मोठे अत्याचाराचे कृत्य ठरेल. परंतु दुर्दैवाने नामधारी मुसलमान आता मस्जिदींमध्येही अल्लाहसोबत इतरांना मदतीसाठी पुकारतात किंबहुना मस्जिदीत असे शिलालेख (तक्ते) लावून ठेवले आहेत की ज्यात अल्लाहला सोडून दुसऱ्यांना मदतीसाठी पुकारले गेले आहे.
(१) ‘अब्दुल्लाह’ (अल्लाहचा दास) शी अभिप्रेत पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम होत. अर्थात जिन्न आणि मानव दोघे मिळून इच्छितात की अल्लाहचे हे दिव्य तेज (नूर) आपल्या फुंकींनी विझवावे. याचे दुसरेही अर्थ सांगितले गेले आहेत, परंतु इमाम इब्ने कसीर यांनी उपरोक्त अर्थास प्राधान्य दिले आहे.
(१) अर्थात आपल्या पैगंबराला काही परोक्ष गोष्टींची खबर करवितो, ज्याचा संबंध एकतर संदेश पोहचविण्याशी असतो किंवा त्याच्या रसूल होणअयाचे पुरावे असतात. उघड आहे की अल्लाहद्वारे सूचित केल्याने रसूल गैब (परोक्ष) चा जाणणारा ठरू शकत नाही, कारण जर स्वतः पैगंबरालाही गैबचे ज्ञान असते, तर अल्लाहतर्फे त्याला गैबच्या गोष्टींची खबर देण्याची गरजच काय? अल्लाह आपले परोक्ष ज्ञान त्याच वेळी आपल्या रसूलवर प्रकट करतो, जेव्हा तो ते पहिल्यापासून जाणत नसतो, अर्थात हे निर्विवाद सत्य आहे की गैब (परोक्ष) ज्ञान केवळ अल्लाहलाच आहे. जसे की या ठिकाणी स्पष्टतः सांगितले गेले आहे.