Traduzione dei Significati del Sacro Corano - Traduzione marathi - Muhammad Shafi Ansari

Numero di pagina:close

external-link copy
84 : 3

قُلْ اٰمَنَّا بِاللّٰهِ وَمَاۤ اُنْزِلَ عَلَیْنَا وَمَاۤ اُنْزِلَ عَلٰۤی اِبْرٰهِیْمَ وَاِسْمٰعِیْلَ وَاِسْحٰقَ وَیَعْقُوْبَ وَالْاَسْبَاطِ وَمَاۤ اُوْتِیَ مُوْسٰی وَعِیْسٰی وَالنَّبِیُّوْنَ مِنْ رَّبِّهِمْ ۪— لَا نُفَرِّقُ بَیْنَ اَحَدٍ مِّنْهُمْ ؗ— وَنَحْنُ لَهٗ مُسْلِمُوْنَ ۟

८४. तुम्ही सांगा, ‘‘आम्ही अल्लाहवर आणि जे काही आमच्यावर उतरविले गेले आहे आणि जे इब्राहीम आणि इस्माईल आणि याकूब आणि त्यांच्या संततीवर उतरविले गेले आणी जे काही मुसा आणी ईसा आणि इतर पैगबरांना अल्लहाच्या तर्फे प्रदान केले गेले त्या सर्वांवर ईमान ( विश्वास) राखलेे,आम्ही त्यांच्यापैकी कोणाच्याही दरम्यान फरक करीत नाही आणि आम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाहचे आज्ञधारक आहोत.’’ info
التفاسير:

external-link copy
85 : 3

وَمَنْ یَّبْتَغِ غَیْرَ الْاِسْلَامِ دِیْنًا فَلَنْ یُّقْبَلَ مِنْهُ ۚ— وَهُوَ فِی الْاٰخِرَةِ مِنَ الْخٰسِرِیْنَ ۟

८५. आणि जो कोणी इस्लामऐवजी अन्य एखाद्या दीन-धर्माचा शोध करील त्याचा तो दीन-धर्म कबूल केला जाणार नाही आणि तो आखिरतमध्ये तोटा उचलणाऱ्यांपैकी राहील. info
التفاسير:

external-link copy
86 : 3

كَیْفَ یَهْدِی اللّٰهُ قَوْمًا كَفَرُوْا بَعْدَ اِیْمَانِهِمْ وَشَهِدُوْۤا اَنَّ الرَّسُوْلَ حَقٌّ وَّجَآءَهُمُ الْبَیِّنٰتُ ؕ— وَاللّٰهُ لَا یَهْدِی الْقَوْمَ الظّٰلِمِیْنَ ۟

८६. अल्लाह कशाप्रकारे त्या लोकांना मार्गदर्शन करील, जे स्वतः ईमान राखल्यानंतर, पैगंबरांची सत्यता जाणण्याची साक्ष दिल्यानंतर आणि आपल्या स्वतःजवळ स्पष्ट निशाणी येऊन पोहोचल्यानंतरही इन्कारी व्हावेत. अल्लाह अशा अत्याचारींना सरळ मार्ग दाखवित नाही. info
التفاسير:

external-link copy
87 : 3

اُولٰٓىِٕكَ جَزَآؤُهُمْ اَنَّ عَلَیْهِمْ لَعْنَةَ اللّٰهِ وَالْمَلٰٓىِٕكَةِ وَالنَّاسِ اَجْمَعِیْنَ ۟ۙ

८७. त्यांची शिक्षा ही की, त्यांच्यावर अल्लाहचा धिःक्कार आहे आणि फरिश्त्यांचा व समस्त लोकांतर्फेही धिःक्कार आहे. info
التفاسير:

external-link copy
88 : 3

خٰلِدِیْنَ فِیْهَا ۚ— لَا یُخَفَّفُ عَنْهُمُ الْعَذَابُ وَلَا هُمْ یُنْظَرُوْنَ ۟ۙ

८८. ते सदैव त्यात राहतील ना त्यांची सजा हलकी (सौम्य) केली जाईल आणि ना त्यांना कसली सूट दिली जाईल. info
التفاسير:

external-link copy
89 : 3

اِلَّا الَّذِیْنَ تَابُوْا مِنْ بَعْدِ ذٰلِكَ وَاَصْلَحُوْا ۫— فَاِنَّ اللّٰهَ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟

८९. परंतु जे लोक यानंतर तौबा (क्षमा-याचना) करून (आपल्या आचरणात) सुधार करून घेतली तर निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा, मेहरबान आहे. info
التفاسير:

external-link copy
90 : 3

اِنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْا بَعْدَ اِیْمَانِهِمْ ثُمَّ ازْدَادُوْا كُفْرًا لَّنْ تُقْبَلَ تَوْبَتُهُمْ ۚ— وَاُولٰٓىِٕكَ هُمُ الضَّآلُّوْنَ ۟

९०. निःसंशय, जे लोक स्वतः ईमान राखल्यानंतर कुप्र (इन्कार) करतील मग इन्कार करण्यात अधिक पुढे जातील तर त्यांची तौबा (क्षमा-याचना) कधीही कबूल केली जाणार नाही आणि हेच लोक मार्गभ्रष्ट आहेत. info
التفاسير:

external-link copy
91 : 3

اِنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْا وَمَاتُوْا وَهُمْ كُفَّارٌ فَلَنْ یُّقْبَلَ مِنْ اَحَدِهِمْ مِّلْءُ الْاَرْضِ ذَهَبًا وَّلَوِ افْتَدٰی بِهٖ ؕ— اُولٰٓىِٕكَ لَهُمْ عَذَابٌ اَلِیْمٌۙ— وَّمَا لَهُمْ مِّنْ نّٰصِرِیْنَ ۟۠

९१. निःसंशय, जे लोक काफिर (इन्कारी, अविश्वासी) असतील, आणि मरेपर्यंत काफिर राहतील, त्यांच्यापैकी जर कोणी अज़ाबपासून सुटका मिळविण्यासाठी दंड (फिदिया) म्हणून जमिनीइतके सोने देईल, तरीही ते कधीही स्वीकारले जाणार नाही. अशाच लोकांकरिता सक्त अज़ाब (अतिशय कठोर शिक्षा-यातना) आहे आणि त्यांचा कोणी मदतकर्ता नाही. info
التفاسير: