Traduzione dei Significati del Sacro Corano - Traduzione marathi - Muhammad Shafi Ansari

Numero di pagina:close

external-link copy
73 : 22

یٰۤاَیُّهَا النَّاسُ ضُرِبَ مَثَلٌ فَاسْتَمِعُوْا لَهٗ ؕ— اِنَّ الَّذِیْنَ تَدْعُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ لَنْ یَّخْلُقُوْا ذُبَابًا وَّلَوِ اجْتَمَعُوْا لَهٗ ؕ— وَاِنْ یَّسْلُبْهُمُ الذُّبَابُ شَیْـًٔا لَّا یَسْتَنْقِذُوْهُ مِنْهُ ؕ— ضَعُفَ الطَّالِبُ وَالْمَطْلُوْبُ ۟

७३. लोक हो! एक उदाहरण दिले जात आहे, जरा लक्षपूर्वक ऐका. अल्लाहखेरीज तुम्ही ज्यांना ज्यांना (उपास्य समजून) पुकारत राहिला आहात, ते एक माशी देखील निर्माण करू शकत नाही. जर सर्वच्या सर्व एकत्र होतील, किंबहुना जर माशी यांच्याकडून एखादी वस्तू घेऊन पळेल तर हे त्या वस्तूला तिच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. मोठा कमकुवत आहे मागणारा आणि खूप दुबळा आहे तो ज्याच्याकडे मागितले जात आहे. info
التفاسير:

external-link copy
74 : 22

مَا قَدَرُوا اللّٰهَ حَقَّ قَدْرِهٖ ؕ— اِنَّ اللّٰهَ لَقَوِیٌّ عَزِیْزٌ ۟

७४. त्यांनी अल्लाहच्या महानतेनुसार त्याचे महत्त्व जाणलेच नाही, निःसंशय अल्लाह मोठा जबरदस्त आणि वर्चस्वशाली आहे. info
التفاسير:

external-link copy
75 : 22

اَللّٰهُ یَصْطَفِیْ مِنَ الْمَلٰٓىِٕكَةِ رُسُلًا وَّمِنَ النَّاسِ ؕ— اِنَّ اللّٰهَ سَمِیْعٌ بَصِیْرٌ ۟ۚ

७५. फरिश्त्यांमधून आणि मानवांमधून रसूल (संदेशवाहक) अल्लाहच निवडतो. निःसंशय अल्लाह ऐकणारा, पाहणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
76 : 22

یَعْلَمُ مَا بَیْنَ اَیْدِیْهِمْ وَمَا خَلْفَهُمْ ؕ— وَاِلَی اللّٰهِ تُرْجَعُ الْاُمُوْرُ ۟

७६. तो चांगल्या प्रकारे जाणतो जे काही त्यांच्या पुढे आहे आणि जे काही त्यांच्या मागे आहे आणि अल्लाहच्याचकडे सर्व व्यवहार परतविले जातात. info
التفاسير:

external-link copy
77 : 22

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوا ارْكَعُوْا وَاسْجُدُوْا وَاعْبُدُوْا رَبَّكُمْ وَافْعَلُوا الْخَیْرَ لَعَلَّكُمْ تُفْلِحُوْنَ ۟

७७. हे ईमान राखणाऱ्यांनो! रुकुअ, सजदा करीत राहा आणि आपल्या पालनकर्त्याची उपासना करीत राहा आणि सत्कर्म करीत राहा, यासाठी की तुम्ही सफल व्हावे. info
التفاسير:

external-link copy
78 : 22

وَجَاهِدُوْا فِی اللّٰهِ حَقَّ جِهَادِهٖ ؕ— هُوَ اجْتَبٰىكُمْ وَمَا جَعَلَ عَلَیْكُمْ فِی الدِّیْنِ مِنْ حَرَجٍ ؕ— مِلَّةَ اَبِیْكُمْ اِبْرٰهِیْمَ ؕ— هُوَ سَمّٰىكُمُ الْمُسْلِمِیْنَ ۙ۬— مِنْ قَبْلُ وَفِیْ هٰذَا لِیَكُوْنَ الرَّسُوْلُ شَهِیْدًا عَلَیْكُمْ وَتَكُوْنُوْا شُهَدَآءَ عَلَی النَّاسِ ۖۚ— فَاَقِیْمُوا الصَّلٰوةَ وَاٰتُوا الزَّكٰوةَ وَاعْتَصِمُوْا بِاللّٰهِ ؕ— هُوَ مَوْلٰىكُمْ ۚ— فَنِعْمَ الْمَوْلٰی وَنِعْمَ النَّصِیْرُ ۟۠

७८. आणि अल्लाहच्या मार्गात तसेच जिहाद (धर्मयुद्ध) करा, जसा जिहादचा हक्क आहे. त्याने तुम्हाला निवडले आहे आणि तुमच्यावर दीन (धर्मा) संदर्भात कसलीही कमतरता राखली नाही. तुमचे पिता इब्राहीमचा दीन (धर्म कायम राखा) त्याच (अल्लाहने) ने तुमचे नाव मुस्लिम ठेवले आहे. या (कुरआना) पूर्वी आणि याच्यातही, यासाठी की पैगंबर तुमच्यावर साक्षी असावा आणि तुम्ही लोकांवर साक्षी व्हावे. तेव्हा तुमचे हे कर्तव्य ठरते की नमाज कायम करा आणि जकात (धर्मदान) अदा करीत राहा आणि अल्लाहला दृढतापूर्वक धरा, तोच तुमचा संरक्षक आणि स्वामी आहे, तेव्हा किती चांगला स्वामी आणि किती चांगला सहाय्य करणारा. info
التفاسير: