Traduzione dei Significati del Sacro Corano - Traduzione marathi - Muhammad Shafi Ansari

Numero di pagina:close

external-link copy
13 : 11

اَمْ یَقُوْلُوْنَ افْتَرٰىهُ ؕ— قُلْ فَاْتُوْا بِعَشْرِ سُوَرٍ مِّثْلِهٖ مُفْتَرَیٰتٍ وَّادْعُوْا مَنِ اسْتَطَعْتُمْ مِّنْ دُوْنِ اللّٰهِ اِنْ كُنْتُمْ صٰدِقِیْنَ ۟

१३. काय ते असे म्हणतात की या कुरआनाला त्याने आपल्या मनाने रचले आहे. तुम्ही उत्तर द्या की तुम्हीदेखील अशा दहा सूरह (अध्याय) मनाने रचून आणा आणि अल्लाहखेरीज वाटेल त्याला आपल्यासोबत सामील करून घ्या, जर तुम्ही सच्चे असाल. info
التفاسير:

external-link copy
14 : 11

فَاِلَّمْ یَسْتَجِیْبُوْا لَكُمْ فَاعْلَمُوْۤا اَنَّمَاۤ اُنْزِلَ بِعِلْمِ اللّٰهِ وَاَنْ لَّاۤ اِلٰهَ اِلَّا هُوَ ۚ— فَهَلْ اَنْتُمْ مُّسْلِمُوْنَ ۟

१४. मग जर ते तुमचे हे म्हणणे मान्य न करतील तर तुम्ही खात्रीपूर्वक जाणून घ्या की हा ग्रंथ (कुरआन) अल्लाहच्या ज्ञानासह अवतरित केला गेला आहे आणि हे की अल्लाहशिवाय कोणीही उपास्य नाही. तर काय तुम्ही मुस्लिम होता? info
التفاسير:

external-link copy
15 : 11

مَنْ كَانَ یُرِیْدُ الْحَیٰوةَ الدُّنْیَا وَزِیْنَتَهَا نُوَفِّ اِلَیْهِمْ اَعْمَالَهُمْ فِیْهَا وَهُمْ فِیْهَا لَا یُبْخَسُوْنَ ۟

१५. जो मनुष्य ऐहिक जीवन आणि शोभा- सजावटीवर आसक्त असेल तर अशांना आम्ही सर्व कर्मांचा (मोबदला) इथेच पूर्णतः देऊन टाकतो आणि इथे त्यांना कसलीही कमतरता ठेवली जात नाही. info
التفاسير:

external-link copy
16 : 11

اُولٰٓىِٕكَ الَّذِیْنَ لَیْسَ لَهُمْ فِی الْاٰخِرَةِ اِلَّا النَّارُ ۖؗ— وَحَبِطَ مَا صَنَعُوْا فِیْهَا وَبٰطِلٌ مَّا كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟

१६. मात्र हेच ते लोक होत, ज्यांच्यासाठी आखिरतमध्ये आगीशिवाय दुसरे काहीही नाही आणि जे काही त्यांनी इथे केले असेल ते तिथे सर्व व्यर्थ आहे आणि जी काही त्यांची कर्मे होती, ती सर्व नाश पावणारी आहेत. info
التفاسير:

external-link copy
17 : 11

اَفَمَنْ كَانَ عَلٰی بَیِّنَةٍ مِّنْ رَّبِّهٖ وَیَتْلُوْهُ شَاهِدٌ مِّنْهُ وَمِنْ قَبْلِهٖ كِتٰبُ مُوْسٰۤی اِمَامًا وَّرَحْمَةً ؕ— اُولٰٓىِٕكَ یُؤْمِنُوْنَ بِهٖ ؕ— وَمَنْ یَّكْفُرْ بِهٖ مِنَ الْاَحْزَابِ فَالنَّارُ مَوْعِدُهٗ ۚ— فَلَا تَكُ فِیْ مِرْیَةٍ مِّنْهُ ۗ— اِنَّهُ الْحَقُّ مِنْ رَّبِّكَ وَلٰكِنَّ اَكْثَرَ النَّاسِ لَا یُؤْمِنُوْنَ ۟

१७. तो, जो आपल्या पालनकर्त्यातर्फे एका प्रमाणावर कायम असेल, आणि त्याच्यासोबत अल्लाहतर्फे साक्षी असेल, आणि त्याच्यापूर्वी मूसाचा ग्रंथ (साक्षी) असेल जो मार्गदर्शक आणि दया- कृपा आहे. (दुसऱ्यांप्रमाणे असू शकतो?) हेच लोक आहेत, जे त्यावर ईमान राखतात आणि सर्व समूहांपैकी, जोदेखील याचा इन्कारी असेल त्याच्या अंतिम वायद्याचे ठिकाण जहन्नम आहे.१ तेव्हा तुम्ही त्याबाबत कसल्याही संशयात पडू नका. निःसंशय हे तुमच्या पालनकर्त्यातर्फे पूर्णतः सत्य आहे. परंतु अधिकांश लोक ईमान बाळगणारे नसतात. info

(१) सर्व समूहांशी अभिप्रेत साऱ्या जगात आढळणारे धर्म होत. यहूदी, ख्रिश्चन, अग्निपूजक, बौद्ध, अनेकेश्वरोपासक व इतर जोदेखील पैगंबर मुहम्मद (स.) आणि कुरआनावर ईमान राखणार नाही, त्याचे ठिकाण जहन्नम आहे. हीच गोष्ट हदीसमध्ये उल्लेखित आहे. शपथ आहे त्या शक्तीची जिच्या ताब्यात माझा प्राण आहे. या उम्मतीच्या ज्या यहूदी किंवा ख्रिश्चनाने माझ्या प्रेषित्वाबाबत ऐकले आणि मग माझ्यावर ईमान राखले नाही तो नरकात जाईल. (सहीह मुस्लिम, किताबुल ईमान प्रकरण वजूबुल ईमान)

التفاسير:

external-link copy
18 : 11

وَمَنْ اَظْلَمُ مِمَّنِ افْتَرٰی عَلَی اللّٰهِ كَذِبًا ؕ— اُولٰٓىِٕكَ یُعْرَضُوْنَ عَلٰی رَبِّهِمْ وَیَقُوْلُ الْاَشْهَادُ هٰۤؤُلَآءِ الَّذِیْنَ كَذَبُوْا عَلٰی رَبِّهِمْ ۚ— اَلَا لَعْنَةُ اللّٰهِ عَلَی الظّٰلِمِیْنَ ۟ۙ

१८. आणि त्याहून अधिक अत्याचारी कोण असेल, जो अल्लाहबाबत खोटे रचेल. हे लोक आपल्या पालनकर्त्यासमोर सादर केले जातील आणि साक्ष देणारे सर्व म्हणतील की हे असे लोक आहेत ज्यांनी आपल्या पालनकर्त्याविषयी असत्य रचले. खबरदार! अल्लाहतर्फे धिक्काराचा मारा आहे अशा अत्याचारी लोकांवर.१ info

(१) हदीसमध्ये याचे स्पष्टीकरण अशा प्रकारे आहे की कयामतच्या दिवशी अल्लाह एका ईमानधारकाकडून त्याचे अपराध कबूल करून घेईल की तुला माहीत आहे की तू अमुक एक अपराध केला होता. तो म्हणेल, हो बरोबर आहे. मग अल्लाह फर्माविल की मी त्या अपराधांवर जगात आवरण घातले होते, तेव्हा आजही त्यांना क्षमा करतो. थथापि इतर लोक किंवा काफिरांचा मामला असा असेल की त्यांना साक्ष देणाऱ्यांसमोर पुकारले जाईल आणि साक्ष देणारे साक्ष देतील की हेच ते लोक होते, ज्यांनी आपल्या पालनकर्त्याबाबत खोटे रचले होते. (सहीह बुखारी - तफसीर सूरह हूद)

التفاسير:

external-link copy
19 : 11

الَّذِیْنَ یَصُدُّوْنَ عَنْ سَبِیْلِ اللّٰهِ وَیَبْغُوْنَهَا عِوَجًا ؕ— وَهُمْ بِالْاٰخِرَةِ هُمْ كٰفِرُوْنَ ۟

१९. जे अल्लाहच्या मार्गापासून रोखतात आणि त्यात चुका शोधण्यामागे लागतात. हेच ते लोक होते, जे आखिरतचा इन्कार करतात. info
التفاسير: