(१) अर्थात तौहीद (अद्वैत) आणि अल्लाहची उपासना सोडून अनेक जमाती आणि समूहांमध्ये विभागले गेले. एक समूह अनेकेश्वरवादी आणि काफिर लोकांचा बनला आणि पैगंबरांना मानणारेही वेगवेगळे झाले. कोणी यहूदी बनला कोणी ख्रिश्चन बनला तर कोणी अन्य काही. दुर्दैवाने मुसलमानांनामध्ये देखील गटबाजी निर्माण झाली आणि ते सुद्धा अनेकानेक समूहांमध्ये विभागले गेले. या सर्वांचा न्याय, जेव्हा हे अल्लाहच्या समोर हजर केले जातील, तेव्हा तिथेच होईल.