क़ुरआन के अर्थों का अनुवाद - मराठी अनुवाद - मुहम्मद शफ़ी अंसारी

पृष्ठ संख्या:close

external-link copy
45 : 21

قُلْ اِنَّمَاۤ اُنْذِرُكُمْ بِالْوَحْیِ ۖؗ— وَلَا یَسْمَعُ الصُّمُّ الدُّعَآءَ اِذَا مَا یُنْذَرُوْنَ ۟

४५. सांगा, मी तर केवळ तुम्हाला अल्लाहच्या वहयी (ईशवाणी) द्वारे सचेत करतो, परंतु बधीर माणसे हाक ऐकत नाहीत, जेव्हा त्यांना सावध केले जात असेल. info
التفاسير:

external-link copy
46 : 21

وَلَىِٕنْ مَّسَّتْهُمْ نَفْحَةٌ مِّنْ عَذَابِ رَبِّكَ لَیَقُوْلُنَّ یٰوَیْلَنَاۤ اِنَّا كُنَّا ظٰلِمِیْنَ ۟

४६. आणि जर त्यांना तुमच्या पालनकर्त्याच्या शिक्षा- यातनेची नुसती वाफ जरी लागली तर उद्‌गारतील, अरेरे! आमचा विनाश! निःसंशय आम्ही अत्याचारी होतो. info
التفاسير:

external-link copy
47 : 21

وَنَضَعُ الْمَوَازِیْنَ الْقِسْطَ لِیَوْمِ الْقِیٰمَةِ فَلَا تُظْلَمُ نَفْسٌ شَیْـًٔا ؕ— وَاِنْ كَانَ مِثْقَالَ حَبَّةٍ مِّنْ خَرْدَلٍ اَتَیْنَا بِهَا ؕ— وَكَفٰی بِنَا حٰسِبِیْنَ ۟

४७. आणि आम्ही कयामतच्या दिवशी त्यांच्या दरम्यान यथायोग्य वजन करणारा तराजू आणून ठेवू, मग कोणावर कशाही प्रकारचा जुलूम केला जाणार नाही आणि जर एक राईच्या दाण्याइतकेही कर्म असेल तर तेही आम्ही समोर आणू, आणि आम्ही हिशोब घेण्यासाठी पुरेसे आहोत. info
التفاسير:

external-link copy
48 : 21

وَلَقَدْ اٰتَیْنَا مُوْسٰی وَهٰرُوْنَ الْفُرْقَانَ وَضِیَآءً وَّذِكْرًا لِّلْمُتَّقِیْنَ ۟ۙ

४८. आणि हे पूर्णतः सत्य आहे की आम्ही मूसा आणि हारून यांना निर्णय करणारा दिव्य आणि नेक सदाचारी लोकांकरिता बोध-उपदेशपूर्ण ग्रंथ प्रदान केला आहे. info
التفاسير:

external-link copy
49 : 21

الَّذِیْنَ یَخْشَوْنَ رَبَّهُمْ بِالْغَیْبِ وَهُمْ مِّنَ السَّاعَةِ مُشْفِقُوْنَ ۟

४९. ते लोक, जे न पाहता आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगतात आणि जे कयामत (च्या विचारा) ने भयकंपित राहतात. info
التفاسير:

external-link copy
50 : 21

وَهٰذَا ذِكْرٌ مُّبٰرَكٌ اَنْزَلْنٰهُ ؕ— اَفَاَنْتُمْ لَهٗ مُنْكِرُوْنَ ۟۠

५०. आणि हा बोध- उपदेश आणि बरकतपूर्ण कुरआन आम्हीच अवतरित केला आहे. मग काय तरीही तुम्ही याचा इन्कार करता़? info
التفاسير:

external-link copy
51 : 21

وَلَقَدْ اٰتَیْنَاۤ اِبْرٰهِیْمَ رُشْدَهٗ مِنْ قَبْلُ وَكُنَّا بِهٖ عٰلِمِیْنَ ۟ۚ

५१. आणि निःसंशय, आम्ही याच्यापूर्वी इब्राहीमला सामंजस्य प्रदान केले होते, आणि त्याच्या अवस्थेशी चांगल्या प्रकारे परिचित होतो. info
التفاسير:

external-link copy
52 : 21

اِذْ قَالَ لِاَبِیْهِ وَقَوْمِهٖ مَا هٰذِهِ التَّمَاثِیْلُ الَّتِیْۤ اَنْتُمْ لَهَا عٰكِفُوْنَ ۟

५२. जेव्हा ते आपल्या पित्यास आणि आपल्या जमातीच्या लोकांना म्हणाले की या मूर्त्या, ज्यांचे तुम्ही पुजारी बनून बसला आहात, हे काय आहे? info
التفاسير:

external-link copy
53 : 21

قَالُوْا وَجَدْنَاۤ اٰبَآءَنَا لَهَا عٰبِدِیْنَ ۟

५३. ते म्हणाले, आम्हाला आमचे वाडवडील यांचीच उपासना करताना आढळले आहेत.१ info

(१) ज्याप्रमाणे आज देखील अज्ञान आणि अंधश्रद्धेत अडकलेल्या मुसलमानांना बिदअत (इस्लाम धर्मात नव्या गोष्टी निर्माण करणे, ज्यांचा इस्लाम धर्माच्या तत्त्वाशी, नियमांशी काहीच संबंध किंवा पुरावा उपलब्ध नसावा) आणि चुकीच्या प्रथांना रोखले जाते, तेव्हा म्हणतात, आम्ही हे रीतीरिवाज कसे बरे सोडावेत, वास्तविक आम्ही आपल्या पूर्वजांना असेच करताना पाहिले आहे, आणि हेच उत्तर ते लोक देखील देतात जे कुरआन आणि पैगंबर (रस.) यांच्या आचरणशैलीच्या आदेशांना सोडून धर्मज्ञानी (आलिम) आणि धर्मशास्त्राचे ज्ञानी (फिकह) यांच्याशी संबंधित राहणेच आवश्यक समजतात.

التفاسير:

external-link copy
54 : 21

قَالَ لَقَدْ كُنْتُمْ اَنْتُمْ وَاٰبَآؤُكُمْ فِیْ ضَلٰلٍ مُّبِیْنٍ ۟

५४. इब्राहीम म्हणाले, मग तर तुम्ही आणि तुमचे वाडवडील उघड अशा मार्गभ्रष्टतेत होते. info
التفاسير:

external-link copy
55 : 21

قَالُوْۤا اَجِئْتَنَا بِالْحَقِّ اَمْ اَنْتَ مِنَ اللّٰعِبِیْنَ ۟

५५. लोक म्हणाले, काय तुम्ही खरोखर सत्य घेऊन आला आहात की उगाच थट्टा-मस्करी करत आहात? info
التفاسير:

external-link copy
56 : 21

قَالَ بَلْ رَّبُّكُمْ رَبُّ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ الَّذِیْ فَطَرَهُنَّ ۖؗ— وَاَنَا عَلٰی ذٰلِكُمْ مِّنَ الشّٰهِدِیْنَ ۟

५६. इब्राहीम म्हणाले, (नव्हे) किंबहुना, खरोखर तुमचा स्वामी व पालनकर्ता आकाशांचा आणि जमिनीचा स्वामी व पालनकर्ता आहे, ज्याने त्यां ना निर्माण केले आहे आणि मी तर याच गोष्टीचा साक्षी (आणि मानणारा) आहे. info
التفاسير:

external-link copy
57 : 21

وَتَاللّٰهِ لَاَكِیْدَنَّ اَصْنَامَكُمْ بَعْدَ اَنْ تُوَلُّوْا مُدْبِرِیْنَ ۟

५७. आणि अल्लाहची शपथ, मी तुमच्या या उपास्यांचा इलाज जरूर करेन जेव्हा तुम्ही पाठ फिरवून चालते व्हाल. info
التفاسير: