क़ुरआन के अर्थों का अनुवाद - मराठी अनुवाद - मुहम्मद शफ़ी अंसारी

पृष्ठ संख्या:close

external-link copy
31 : 12

فَلَمَّا سَمِعَتْ بِمَكْرِهِنَّ اَرْسَلَتْ اِلَیْهِنَّ وَاَعْتَدَتْ لَهُنَّ مُتَّكَاً وَّاٰتَتْ كُلَّ وَاحِدَةٍ مِّنْهُنَّ سِكِّیْنًا وَّقَالَتِ اخْرُجْ عَلَیْهِنَّ ۚ— فَلَمَّا رَاَیْنَهٗۤ اَكْبَرْنَهٗ وَقَطَّعْنَ اَیْدِیَهُنَّ ؗ— وَقُلْنَ حَاشَ لِلّٰهِ مَا هٰذَا بَشَرًا ؕ— اِنْ هٰذَاۤ اِلَّا مَلَكٌ كَرِیْمٌ ۟

३१. तिने जेव्हा त्यांची ही कुत्सित निंदा ऐकली, तेव्हा त्यांना (भोजनासाठी) आमंत्रित केले आणि त्यांच्यासाठी एका सभेचा इतमामही केला आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला एक एक चाकू दिला आणि म्हणाली, हे यूसुफ! यांच्या समोर या. त्या स्त्रियांनी जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा खूप मोठे जाणले आणि (नकळत) आपले हात कापून घेतले आणि त्या उद्‌गारल्या, पाकी (पवित्रता) अल्लाहकरिता आहे. ऱ मनुष्य कदापि नाही. हा तर खात्रीने कोणी फार मोठा फरिश्ता आहे. info
التفاسير:

external-link copy
32 : 12

قَالَتْ فَذٰلِكُنَّ الَّذِیْ لُمْتُنَّنِیْ فِیْهِ ؕ— وَلَقَدْ رَاوَدْتُّهٗ عَنْ نَّفْسِهٖ فَاسْتَعْصَمَ ؕ— وَلَىِٕنْ لَّمْ یَفْعَلْ مَاۤ اٰمُرُهٗ لَیُسْجَنَنَّ وَلَیَكُوْنًا مِّنَ الصّٰغِرِیْنَ ۟

३२. (त्या वेळी मिस्रच्या अजीजची पत्नी) म्हणाली, हाच तो, ज्याच्याविषयी तुम्ही मला बरे-वाईट बोलत होत्या. मी सर्व प्रकारे याच्याकडून आपली इच्छा पूर्ण करू इच्छिले, परंतु हा निष्कलंक राहिला आणि जे काही मी याला सांगत आहे, जर ते हा करणार नाही तर निश्चितच याला कैदी बनविले जाईल आणि खात्रीने हा मोठा अपमानित होईल. info
التفاسير:

external-link copy
33 : 12

قَالَ رَبِّ السِّجْنُ اَحَبُّ اِلَیَّ مِمَّا یَدْعُوْنَنِیْۤ اِلَیْهِ ۚ— وَاِلَّا تَصْرِفْ عَنِّیْ كَیْدَهُنَّ اَصْبُ اِلَیْهِنَّ وَاَكُنْ مِّنَ الْجٰهِلِیْنَ ۟

३३. यूसुफ म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! ज्या गोष्टीकडे या स्त्रिया मला बोलावित आहेत, त्यापेक्षा कारागृह मला जास्त प्रिय आहे. जर तू यांचे कपट (मोहजाल) माझ्यापासून दूर केले नाहीस तर मी यांच्याकडे आकर्षित होईन आणि अगदी मूर्खांमध्ये सामील होईन. info
التفاسير:

external-link copy
34 : 12

فَاسْتَجَابَ لَهٗ رَبُّهٗ فَصَرَفَ عَنْهُ كَیْدَهُنَّ ؕ— اِنَّهٗ هُوَ السَّمِیْعُ الْعَلِیْمُ ۟

३४. त्यांच्या पालनकर्त्याने त्यांची दुआ (प्रार्थना) स्वीकारली आणि त्या स्त्रियांच्या कपटापासून यूसुफला वाचविले. निःसंशय तो ऐकणारा आणि जाणणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
35 : 12

ثُمَّ بَدَا لَهُمْ مِّنْ بَعْدِ مَا رَاَوُا الْاٰیٰتِ لَیَسْجُنُنَّهٗ حَتّٰی حِیْنٍ ۟۠

३५. मग त्या सर्व निशाण्यांना पाहून घेतल्यावर त्यांना हेच भले वाटले की यूसुफला काही काळ कारागृहात ठेवावे. info
التفاسير:

external-link copy
36 : 12

وَدَخَلَ مَعَهُ السِّجْنَ فَتَیٰنِ ؕ— قَالَ اَحَدُهُمَاۤ اِنِّیْۤ اَرٰىنِیْۤ اَعْصِرُ خَمْرًا ۚ— وَقَالَ الْاٰخَرُ اِنِّیْۤ اَرٰىنِیْۤ اَحْمِلُ فَوْقَ رَاْسِیْ خُبْزًا تَاْكُلُ الطَّیْرُ مِنْهُ ؕ— نَبِّئْنَا بِتَاْوِیْلِهٖ ۚ— اِنَّا نَرٰىكَ مِنَ الْمُحْسِنِیْنَ ۟

३६. आणि त्यांच्यासोबत इतर दोन तरुण कारागृहात आले. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, मी स्वप्नात स्वतःला दारु गाळताना पाहिले आहे, आणि दुसरा म्हणाला, मी स्वप्नात काय पाहतो की मी आपल्या डोक्यावर भाकरी ठेवल्या आहेत, ज्यांना पक्षी खात आहेत. तुम्ही याचा अर्थ (खुलासा) आम्हाला सांगावा. आम्हाला तर तुम्ही गुणवान दिसता. info
التفاسير:

external-link copy
37 : 12

قَالَ لَا یَاْتِیْكُمَا طَعَامٌ تُرْزَقٰنِهٖۤ اِلَّا نَبَّاْتُكُمَا بِتَاْوِیْلِهٖ قَبْلَ اَنْ یَّاْتِیَكُمَا ؕ— ذٰلِكُمَا مِمَّا عَلَّمَنِیْ رَبِّیْ ؕ— اِنِّیْ تَرَكْتُ مِلَّةَ قَوْمٍ لَّا یُؤْمِنُوْنَ بِاللّٰهِ وَهُمْ بِالْاٰخِرَةِ هُمْ كٰفِرُوْنَ ۟

३७. (यूसुफ) म्हणाले, तुम्हाला जे भोजन दिले जाते, ते तुमच्याजवळ पोहचण्यापूर्वीच मी तुम्हाला त्याचा खुलासा सांगेने, हे सर्व काही त्या ज्ञानामुळे आहे जे मला माझ्या पालनकर्त्याने शिकविले आहे. मी त्या लोकांचा दीन (धर्म) सोडला आहे, जे अल्लाहवर ईमान राखत नाही आणि आखिरतलाही मान्य करीत नाही. info
التفاسير: