(१) काहींनी याचा अनुवाद असा केला आहे की आदर सन्मानार्थ यूसुफसमोर झुकले, परंतु ‘व खर्रू लहू सुज्जदन्’ हे शब्द दर्शवितात की त्यांनी यूसुफसमोर जमिनीवर माथा टेकला. हा सजदा माथा टेकण्याच्या अर्थाने आहे, तरीही हा सजदा आदर व सन्मानासाठी आहे, उपासना म्हणून नाही आणि आदराप्रित्यर्थ सजदा हजरत याकूब यांच्या शरीअतमध्ये उचित होता. इस्लाममध्ये शिर्कवर प्रतिबंध लावण्याकरिता अशा प्रकारचे आदरार्थी सजदे करणे वर्ज्य ठरविले गेले आणि आता आदर-सन्मान व्यक्त करण्यासाठी कोणालाही सजदा करणे अनुचित आहे.