Traduction des sens du Noble Coran - La traduction marathe - Muhammad Chafî' Ansârî

external-link copy
50 : 6

قُلْ لَّاۤ اَقُوْلُ لَكُمْ عِنْدِیْ خَزَآىِٕنُ اللّٰهِ وَلَاۤ اَعْلَمُ الْغَیْبَ وَلَاۤ اَقُوْلُ لَكُمْ اِنِّیْ مَلَكٌ ۚ— اِنْ اَتَّبِعُ اِلَّا مَا یُوْحٰۤی اِلَیَّ ؕ— قُلْ هَلْ یَسْتَوِی الْاَعْمٰی وَالْبَصِیْرُ ؕ— اَفَلَا تَتَفَكَّرُوْنَ ۟۠

५०. तुम्ही सांगा की मी ना तर तुम्हाला हे सांगतो की माझ्याजवळ अल्लाहचा खजिना आहे आणि ना मी परोक्ष गोष्टींना जाणतो आणि ना मी असे सांगतो की मी फरिश्ता आहे, मी तर केवळ, जे काही वहयीच्या रूपाने माझ्याजवळ येते, त्याचे अनुसरण करतो.१ तुम्ही सांगा की आंधळा आणि डोळस दोघे समान कसे असू शकतात? तर मग तुम्ही विचार चिंतन का नाही करीत? info

(१) ‘माझ्याजवळ अल्लाहचे खजिने नाहीत’ यास अभिप्रेत हे की प्रत्येक प्रकारचे सामर्थ्य मी बाळगणार नाही की मी तुम्हाला अल्लाहच्या हुकूमाविना व मर्जीविना एखादा चमत्कार दाखवावा, जसे तुम्ही इच्छिता, ज्याला पाहून तुम्हाला माझ्या सत्यतेवर विश्वास बसावा. मी परोक्ष ज्ञानही बाळगत नाही की ज्याद्वारे मी भविष्यकालीन घटनांबद्दल तुम्हाला माहीत करावे. मी फरिश्ता असण्याचाही दावा करीत नाही की ज्यामुळे तुम्ही मला अशी कामे करण्यास विवश करावे, जी मानव-सामर्थ्यापलीकडची असावीत, मी तर केवळ त्या वहयीला मानणारा आहे जी माझ्यावर अवतरीत केली गेली आणि या हदीसमध्येही उल्लेखित आहे. जसे की पैगंबरानी फर्माविले, मला कुरआनसोबत त्याच्याच समानही प्रदान केले गेले यात ‘समान’शी अभिप्रेत पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची हदीस (कथने व आचरणशैली) आहेत.

التفاسير: