Traduction des sens du Noble Coran - La traduction marathe - Muhammad Chafî' Ansârî

external-link copy
116 : 6

وَاِنْ تُطِعْ اَكْثَرَ مَنْ فِی الْاَرْضِ یُضِلُّوْكَ عَنْ سَبِیْلِ اللّٰهِ ؕ— اِنْ یَّتَّبِعُوْنَ اِلَّا الظَّنَّ وَاِنْ هُمْ اِلَّا یَخْرُصُوْنَ ۟

११६. आणि जगात राहणाऱ्यांपैकी तुम्ही जर अधिकांश लोकांचे अनुसरण कराल तर ते तुम्हाला अल्लाहच्या मार्गापासून हटवतील. ते फक्त निराधार कल्पनांच्या मागे चालतात आणि अटकळीच्या गोष्टी करतात.१ info

(१) कुरआनात सांगितलेल्या सत्याचे अवलोकन प्रत्येक कालखंडात केले जाऊ शकते अन्य एका ठिकाणी अल्लाहने फर्माविले, ‘’तुमच्या मर्जीनंतरही अधिकांश लोक ईमान राखणार नाहीत.’’ (सूरह यूसुफ-१०३) तात्पर्य, सत्य आणि सचोटीच्या मार्गावर चालणारे नेहमी फार थोडे असतात ज्यावरून हेही सिद्ध होते की सत्याचा आधार प्रमाण व पुरावा आहे. लोकांची कमी अधिक संख्या नव्हे. ज्या गोष्टीला जास्तीत जास्त लोकांनी मानले ती सत्य असावी असे नाही आणि कमी लोक सत्यनिष्ठ नाहीत असेही नाही, किंबहुना कुरआनाद्वआरे या सत्याच्या आधारावर शक्य आहे की सत्यनिष्ठ संख्येने कमी असतात आणि खोटे लोक जास्त. ज्याची पुष्टी हदीसद्वारे होते. पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, माझे अनुयायी ७३ गटांमध्ये विभागले जातील, ज्यापैकी फक्त एक गट जन्नतमध्ये जाईल, बाकी सर्व जहन्नममध्ये जातील आणि जन्नतमध्ये जाणाऱ्या गटाची लक्षणे सांगितली की जो माझ्या आणि माझ्या सहाबांच्या मार्गावर चालणारा असेल. (अबु दाऊद- किताबुस सुन्नः, प्रकरण शरह अस सुन्नः नं. ४५९६, तिर्मिजी- किताबुल ईमान, प्रकरण माजाअ फी श्फ्तराक हाजेहिल उम्मः)

التفاسير: