Traduction des sens du Noble Coran - La traduction marathe - Muhammad Chafî' Ansârî

Numéro de la page:close

external-link copy
75 : 4

وَمَا لَكُمْ لَا تُقَاتِلُوْنَ فِیْ سَبِیْلِ اللّٰهِ وَالْمُسْتَضْعَفِیْنَ مِنَ الرِّجَالِ وَالنِّسَآءِ وَالْوِلْدَانِ الَّذِیْنَ یَقُوْلُوْنَ رَبَّنَاۤ اَخْرِجْنَا مِنْ هٰذِهِ الْقَرْیَةِ الظَّالِمِ اَهْلُهَا ۚ— وَاجْعَلْ لَّنَا مِنْ لَّدُنْكَ وَلِیًّا ۙۚ— وَّاجْعَلْ لَّنَا مِنْ لَّدُنْكَ نَصِیْرًا ۟ؕ

७५. बरे काय कारण आहे की तुम्ही अल्लाहच्या मार्गात आणि त्या दुर्बल पुरुष स्त्रिया आणि लहान लहान बालकांच्या सुटकेकरिता न लढावे? जे अशा प्रकारे दुआ (प्रार्थना) करीत आहेत की हे आमच्या पालनहार! या अत्याचारी लोकांच्या वस्तीतून आम्हाला बाहेर काढआणि आमच्यासाठी स्वतः आपल्यातर्फे एखादा हिमायती (समर्थक निश्चित कर, आणि आमच्यासाठी विशेषरित्या आपल्यातर्फे मदत करणारा पाठव. info
التفاسير:

external-link copy
76 : 4

اَلَّذِیْنَ اٰمَنُوْا یُقَاتِلُوْنَ فِیْ سَبِیْلِ اللّٰهِ ۚ— وَالَّذِیْنَ كَفَرُوْا یُقَاتِلُوْنَ فِیْ سَبِیْلِ الطَّاغُوْتِ فَقَاتِلُوْۤا اَوْلِیَآءَ الشَّیْطٰنِ ۚ— اِنَّ كَیْدَ الشَّیْطٰنِ كَانَ ضَعِیْفًا ۟۠

७६. ज्या लोकांनी ईमान राखले आहे, ते तर अल्लाहच्या मार्गात जिहाद करतात आणि ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला आहे ते तर तागूत (सैतान) च्या मार्गात लढतात. तेव्हा तुम्ही सैतानाच्या मित्रांशी युद्ध करा. निःसंशय सैतानाचे (डावपेच) अतिशय कमकुवत आहेत. info
التفاسير:

external-link copy
77 : 4

اَلَمْ تَرَ اِلَی الَّذِیْنَ قِیْلَ لَهُمْ كُفُّوْۤا اَیْدِیَكُمْ وَاَقِیْمُوا الصَّلٰوةَ وَاٰتُوا الزَّكٰوةَ ۚ— فَلَمَّا كُتِبَ عَلَیْهِمُ الْقِتَالُ اِذَا فَرِیْقٌ مِّنْهُمْ یَخْشَوْنَ النَّاسَ كَخَشْیَةِ اللّٰهِ اَوْ اَشَدَّ خَشْیَةً ۚ— وَقَالُوْا رَبَّنَا لِمَ كَتَبْتَ عَلَیْنَا الْقِتَالَ ۚ— لَوْلَاۤ اَخَّرْتَنَاۤ اِلٰۤی اَجَلٍ قَرِیْبٍ ؕ— قُلْ مَتَاعُ الدُّنْیَا قَلِیْلٌ ۚ— وَالْاٰخِرَةُ خَیْرٌ لِّمَنِ اتَّقٰی ۫— وَلَا تُظْلَمُوْنَ فَتِیْلًا ۟

७७. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले, ज्यांना आदेश दिला गेला की आपल्या हातांना रोखून ठेवा आणि नमाज नियमित पढत राहा आणि जकात अदा करीत राहा, मग जेव्हा त्यांना जिहाद (धर्मयुद्धा) चा आदेश दिला गेला तेव्हा त्याच वेळी त्यांच्यातला एक समूह, लोकांपासून असा भयभीत होता, जणू अल्लाहचे भय असावे, किंबहुना यापेक्षा अधिक आणि म्हणू लागले, हे आमच्या पालनकर्त्या! तू आमच्यावर जिहाद अनिवार्य का केले? आणखी थोडे जीवन आम्हाला का व्यतीत करू दिले नाही? तुम्ही त्यांना सांगा की या जगाचा लाभ तर फार थोडासा आहे आणि अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता आखिरत कितीतरी उत्तम आहे, आणि तुमच्यावर एका धाग्याइतकाही अत्याचार केला जाणार नाही. info
التفاسير:

external-link copy
78 : 4

اَیْنَمَا تَكُوْنُوْا یُدْرِكْكُّمُ الْمَوْتُ وَلَوْ كُنْتُمْ فِیْ بُرُوْجٍ مُّشَیَّدَةٍ ؕ— وَاِنْ تُصِبْهُمْ حَسَنَةٌ یَّقُوْلُوْا هٰذِهٖ مِنْ عِنْدِ اللّٰهِ ۚ— وَاِنْ تُصِبْهُمْ سَیِّئَةٌ یَّقُوْلُوْا هٰذِهٖ مِنْ عِنْدِكَ ؕ— قُلْ كُلٌّ مِّنْ عِنْدِ اللّٰهِ ؕ— فَمَالِ هٰۤؤُلَآءِ الْقَوْمِ لَا یَكَادُوْنَ یَفْقَهُوْنَ حَدِیْثًا ۟

७८. तुम्ही कोठेही असा, मृत्यु कोणत्याही स्थितीत तुम्हाला येऊन धरील, मग तुम्ही मजबूत अशा किल्ल्यामध्ये असाल तरीही. आणि जर यांना एखादी भलाई प्राप्त होते, तेव्हा म्हणतात, की ही सर्वश्रेष्ठ अल्लाहतर्फे आहे, आणि जर एखादी असफलता पदरी पडते तेव्हा म्हणू लागतात, हे तुमच्यामुळे झाले. त्यांना सांगा, हे सर्व काही अल्लाहतर्फे आहे. यांना झाले तरी काय की एखादी गोष्ट नीट समजूनही घेत नाही. info
التفاسير:

external-link copy
79 : 4

مَاۤ اَصَابَكَ مِنْ حَسَنَةٍ فَمِنَ اللّٰهِ ؗ— وَمَاۤ اَصَابَكَ مِنْ سَیِّئَةٍ فَمِنْ نَّفْسِكَ ؕ— وَاَرْسَلْنٰكَ لِلنَّاسِ رَسُوْلًا ؕ— وَكَفٰی بِاللّٰهِ شَهِیْدًا ۟

७९. तुम्हाला जी काही भलाई लाभते, ती अल्लाहतर्फे आहे आणि जी काही हानि पोहचते ती स्वतः तुमच्याकडून आहे. आम्ही (हे पैगंबर!) तुम्हाला समस्त मानवजातीकरिता रसूल बनवून पाठविले आहे आणि अल्लाह या गोष्टीची साक्ष देण्यास पुरेसा आहे. info
التفاسير: