Traduction des sens du Noble Coran - La traduction marathe - Muhammad Chafî' Ansârî

external-link copy
151 : 3

سَنُلْقِیْ فِیْ قُلُوْبِ الَّذِیْنَ كَفَرُوا الرُّعْبَ بِمَاۤ اَشْرَكُوْا بِاللّٰهِ مَا لَمْ یُنَزِّلْ بِهٖ سُلْطٰنًا ۚ— وَمَاْوٰىهُمُ النَّارُ ؕ— وَبِئْسَ مَثْوَی الظّٰلِمِیْنَ ۟

१५१. आम्ही लवकरच इन्कारी लोकांच्या मनात भय निर्माण करू या कारणास्तव की ते अल्लाहच्या सोबत त्या चीज वस्तूंनाही सहभागी करतात, ज्यांच्याविषयी कोणतेही प्रमाण अल्लाहने उतरविले नाही,१ त्यांचे ठिकाण जहन्नम आहे आणि त्या अत्याचारी लोकांचे वाईट ठिकाण आहे. info

(१) ईमानधारकांना पराभूत होतांना पाहून काफिरांच्या मनात हा विचार आला की, ही मुसलमानांचा खात्मा करण्याची चांगली संधी आहे. याप्रसंगी अल्लाहने त्यांच्या मनात ईमानधारकांचे भय टाकले, मग त्यांना आपला विचार पूर्ण करण्याचे धाडस झाले नाही (फतहूल कदीर) सहीहेन या हदीस संकलनात उल्लेख आहे की पैगंबर (स.) यांनी फर्माविले की मला पाच गोष्टी अशा प्रदान केल्या गेल्या आहेत, ज्या माझ्यापूर्वी कोणत्याही नबीला प्रदान केल्या गेल्या नाहीत. त्यापैकी एक ही की शत्रूच्या मनात एक महिन्याच्या अंतरापर्यंत माझे भय टाकून माझी मदत केली गेली आहे. तात्पर्य, पैगंबर (स.) यांचे भय स्थायी स्वरूपात शत्रूंच्या मनात रुजवले गेले. तसेच पैगंबर (स.) यांच्या सोबत त्यांच्या उम्मत (जनसमूहा) चे अर्थात मुसलमानांचेही भय अनेकेश्वरवाद्यांच्या मनात टाकले गेले. याला कारण त्यांचे, अल्लाहसोबत इतरांना सहभागी ठरविणे होय. कदाचित याच कारणाने मुसलमानांची एक मोठी संख्या अनेकेश्वरवाद्यांप्रमाणेच श्रद्धा आणि कर्मांमुळे, शत्रू त्यांना भिण्याऐवजी ते शत्रूला भितात.

التفاسير: