Traduction des sens du Noble Coran - La traduction marathe - Muhammad Chafî' Ansârî

Numéro de la page:close

external-link copy
14 : 28

وَلَمَّا بَلَغَ اَشُدَّهٗ وَاسْتَوٰۤی اٰتَیْنٰهُ حُكْمًا وَّعِلْمًا ؕ— وَكَذٰلِكَ نَجْزِی الْمُحْسِنِیْنَ ۟

१४. आणि जेव्हा मूसा (अलै.) आपल्या तारुण्यावस्थेस पोहचले आणि पूर्णतः शक्तिशाली झाले, आम्ही त्यांना बुद्धीकौशल्य आणि ज्ञान प्रदान केले. सत्कर्म करणाऱ्यांना आम्ही अशाच प्रकारचा मोबदला देत असतो. info
التفاسير:

external-link copy
15 : 28

وَدَخَلَ الْمَدِیْنَةَ عَلٰی حِیْنِ غَفْلَةٍ مِّنْ اَهْلِهَا فَوَجَدَ فِیْهَا رَجُلَیْنِ یَقْتَتِلٰنِ ؗ— هٰذَا مِنْ شِیْعَتِهٖ وَهٰذَا مِنْ عَدُوِّهٖ ۚ— فَاسْتَغَاثَهُ الَّذِیْ مِنْ شِیْعَتِهٖ عَلَی الَّذِیْ مِنْ عَدُوِّهٖ ۙ— فَوَكَزَهٗ مُوْسٰی فَقَضٰی عَلَیْهِ ؗ— قَالَ هٰذَا مِنْ عَمَلِ الشَّیْطٰنِ ؕ— اِنَّهٗ عَدُوٌّ مُّضِلٌّ مُّبِیْنٌ ۟

१५. आणि (मूसा) अशा वेळी शहरात आले, जेव्हा शहरवासी झोपलेले होते. इथे दोन माणसे लढत असताना आढळले. हा एक तर त्यांच्या समूहापैकी होता आणि हा दुसरा त्यांच्या शत्रूंपैकी. जो त्यांच्या समूहापैकी होता त्याने त्या माणसाच्या विरोधात, त्या शत्रू पक्षाचा होता त्यांच्याकडे मदत मागितली. ज्यावर मूसाने त्याला ठोसा मारला. परिणामी तो मरण पावला. मूसा म्हणाले, हे तर सैतानी कृत्य आहे निःसंशय, सैतान शत्रू आणि उघडरित्या बहकविणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
16 : 28

قَالَ رَبِّ اِنِّیْ ظَلَمْتُ نَفْسِیْ فَاغْفِرْ لِیْ فَغَفَرَ لَهٗ ؕ— اِنَّهٗ هُوَ الْغَفُوْرُ الرَّحِیْمُ ۟

१६. मग मूसा दुआ (प्रार्थना) करू लागले की हे माझ्या पालनकर्त्या! मी तर स्वतःवरच अत्याचार करून घेतला. तू मला माफ कर. अल्लाहने त्यांना माफ केले. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा आणि मोठा दयावान आहे. info
التفاسير:

external-link copy
17 : 28

قَالَ رَبِّ بِمَاۤ اَنْعَمْتَ عَلَیَّ فَلَنْ اَكُوْنَ ظَهِیْرًا لِّلْمُجْرِمِیْنَ ۟

१७. (मूसा) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! जसा तू माझ्यावर हा उपकार केला, मी देखील आता यापुढे कोणत्याही अपराध्याचा सहाय्यक बनणार नाही. info
التفاسير:

external-link copy
18 : 28

فَاَصْبَحَ فِی الْمَدِیْنَةِ خَآىِٕفًا یَّتَرَقَّبُ فَاِذَا الَّذِی اسْتَنْصَرَهٗ بِالْاَمْسِ یَسْتَصْرِخُهٗ ؕ— قَالَ لَهٗ مُوْسٰۤی اِنَّكَ لَغَوِیٌّ مُّبِیْنٌ ۟

१८. मग (दुसऱ्या दिवशी) सकाळी सकाळी भय राखत बातमी घेण्याच्या हेतूने शहरात गेले, तेवढ्यात तोच मनुष्य ज्याने काल त्यांच्याजवळ मदत मागितली होती, पुन्हा त्यांच्याजवळ विनंती करीत आहे. मूसा त्याला म्हणाले, निःसंशय, तू तर उघडरित्या पथभ्रष्ट आहेस. info
التفاسير:

external-link copy
19 : 28

فَلَمَّاۤ اَنْ اَرَادَ اَنْ یَّبْطِشَ بِالَّذِیْ هُوَ عَدُوٌّ لَّهُمَا ۙ— قَالَ یٰمُوْسٰۤی اَتُرِیْدُ اَنْ تَقْتُلَنِیْ كَمَا قَتَلْتَ نَفْسًا بِالْاَمْسِ ۗ— اِنْ تُرِیْدُ اِلَّاۤ اَنْ تَكُوْنَ جَبَّارًا فِی الْاَرْضِ وَمَا تُرِیْدُ اَنْ تَكُوْنَ مِنَ الْمُصْلِحِیْنَ ۟

१९. मग जेव्हा आपल्या आणि त्याच्या शत्रूला धरू इच्छिले, तो म्हणाला, हे मूसा! काय ज्या प्रकारे तुम्ही काल एका माणसाला ठार मारले, (आज) मलाही ठार करू इच्छिता? तुम्ही तर देशात जुलमी व उत्पात करणारे बनू इच्छिता आणि तुमचा हा इरादाच नाही की समजोता (समेट) करणाऱ्यांपैकी व्हावे. info
التفاسير:

external-link copy
20 : 28

وَجَآءَ رَجُلٌ مِّنْ اَقْصَا الْمَدِیْنَةِ یَسْعٰی ؗ— قَالَ یٰمُوْسٰۤی اِنَّ الْمَلَاَ یَاْتَمِرُوْنَ بِكَ لِیَقْتُلُوْكَ فَاخْرُجْ اِنِّیْ لَكَ مِنَ النّٰصِحِیْنَ ۟

२०. आणि शहराच्या दूरच्या किनाऱ्याकडून धावत धावत एक मनुष्य आला आणि म्हणू लागला की हे मूसा! इथले प्रमुख लोक तुमच्या वधाची सल्लामसलत करीत आहेत. यास्तव तुम्ही (फार लवकर) येथून निघून जा. मला आपला हितचिंतक माना. info
التفاسير:

external-link copy
21 : 28

فَخَرَجَ مِنْهَا خَآىِٕفًا یَّتَرَقَّبُ ؗ— قَالَ رَبِّ نَجِّنِیْ مِنَ الْقَوْمِ الظّٰلِمِیْنَ ۟۠

२१. यास्तव मूसा भयभीत होऊन सावधपणे तेथून निघाले. म्हणाले, हे पालनकर्त्या! मला अत्याचारी समूहापासून वाचव. info
التفاسير: