Traducción de los significados del Sagrado Corán - Traducción al maratiano - Muhammad Shafi Ansari

Al-Ma'aarij

external-link copy
1 : 70

سَاَلَ سَآىِٕلٌۢ بِعَذَابٍ وَّاقِعٍ ۟ۙ

१. एका मागणी करणाऱ्याने त्या अज़ाब (शिक्षा - यातने) ची मागणी केली जो घडून येणार आहे. info
التفاسير:

external-link copy
2 : 70

لِّلْكٰفِرِیْنَ لَیْسَ لَهٗ دَافِعٌ ۟ۙ

२. काफिरांवर, ज्याला कोणी हटविणारा नाही. info
التفاسير:

external-link copy
3 : 70

مِّنَ اللّٰهِ ذِی الْمَعَارِجِ ۟ؕ

३. या अल्लाहतर्फे, जो शिड्या बाळगणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
4 : 70

تَعْرُجُ الْمَلٰٓىِٕكَةُ وَالرُّوْحُ اِلَیْهِ فِیْ یَوْمٍ كَانَ مِقْدَارُهٗ خَمْسِیْنَ اَلْفَ سَنَةٍ ۟ۚ

४. ज्याच्याकडे फरिश्ते आणि आत्मा चढून जातात एका दिवसात, ज्याची मुदत पन्नास हजार वर्षांची आहे. info
التفاسير:

external-link copy
5 : 70

فَاصْبِرْ صَبْرًا جَمِیْلًا ۟

५. तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे धीर संयम राखा. info
التفاسير:

external-link copy
6 : 70

اِنَّهُمْ یَرَوْنَهٗ بَعِیْدًا ۟ۙ

६. निःसंशय, हे त्या (अज़ाब) ला दूर समजतात. info
التفاسير:

external-link copy
7 : 70

وَّنَرٰىهُ قَرِیْبًا ۟ؕ

७. आणि आम्ही त्याला जवळ असल्याचे पाहतो. info
التفاسير:

external-link copy
8 : 70

یَوْمَ تَكُوْنُ السَّمَآءُ كَالْمُهْلِ ۟ۙ

८. ज्या दिवशी आकाश वितळलेल्या धातूसारखे होईल. info
التفاسير:

external-link copy
9 : 70

وَتَكُوْنُ الْجِبَالُ كَالْعِهْنِ ۟ۙ

९. आणि पर्वत रंगीत लोकरीसारखे होतील. info
التفاسير:

external-link copy
10 : 70

وَلَا یَسْـَٔلُ حَمِیْمٌ حَمِیْمًا ۟ۚۖ

१०. आणि कोणी मित्र कोणा मित्राला विचारणार नाही. info
التفاسير:

external-link copy
11 : 70

یُّبَصَّرُوْنَهُمْ ؕ— یَوَدُّ الْمُجْرِمُ لَوْ یَفْتَدِیْ مِنْ عَذَابِ یَوْمِىِٕذٍ بِبَنِیْهِ ۟ۙ

११. (जरी ते) एकमेकांना दाखविले जातील. अपराधी, त्या दिवसाच्या शिक्षा - यातनेच्या मोबदल्यात (दंड म्हणून) आपल्या पुत्रांना देऊ इच्छिल. info
التفاسير:

external-link copy
12 : 70

وَصَاحِبَتِهٖ وَاَخِیْهِ ۟ۙ

१२. आपल्या पत्नीला आणि आपल्या भावाला. info
التفاسير:

external-link copy
13 : 70

وَفَصِیْلَتِهِ الَّتِیْ تُـْٔوِیْهِ ۟ۙ

१३. आणि आपल्या कुटुंबाला, जे त्याला आश्रय देत होते. info

(१) अर्थात पूर्णतः ईमान राखणारे एकेश्वरवादी त्यांच्यात वर सांगितलेले वैगुण्य नसते. किंबहुना याच्या उलट ते सद्‌गुणांनी युक्त असतात. रोज नित्यनेमाने नमाज पढण्याचा अर्थ असा की ते नमाजबाबतच सुस्ती दिरंगाई करीत नाही. ते प्रत्येक नमाज तिच्या ठरलेल्या वेळेवर अगदी वक्तशीरपणे अदा करतात. कोणतेही काम त्यांना नमाजपासून रोखत नाही आणि जगाचा कोणताही लाभ त्यांना नमाज पढण्यापासून विमुख (गाफील) करीत नाही.

التفاسير:

external-link copy
14 : 70

وَمَنْ فِی الْاَرْضِ جَمِیْعًا ۙ— ثُمَّ یُنْجِیْهِ ۟ۙ

१४. आणि जमिनीवरील समस्त लोकांना, यासाठी की यांनी त्याला मुक्ती मिळवून द्यावी. info
التفاسير:

external-link copy
15 : 70

كَلَّا ؕ— اِنَّهَا لَظٰی ۟ۙ

१५. (परंतु) हे कदापि होणार नाही. निःसशय, तो (धगधगणाऱ्या) निखाऱ्यांची (आग) आहे. info
التفاسير:

external-link copy
16 : 70

نَزَّاعَةً لِّلشَّوٰی ۟ۚۖ

१६. जी (तोंडाची व डोक्याची) त्वचा सोलून काढणारी आहे. info
التفاسير:

external-link copy
17 : 70

تَدْعُوْا مَنْ اَدْبَرَ وَتَوَلّٰی ۟ۙ

१७. ती अशा त्या प्रत्येक माणसाला हाक मारील, जो मागे हटतो आणि विमुख होतो. info
التفاسير:

external-link copy
18 : 70

وَجَمَعَ فَاَوْعٰی ۟

१८. आणि गोळा (जमा) करून सांभाळून ठेवतो. info
التفاسير:

external-link copy
19 : 70

اِنَّ الْاِنْسَانَ خُلِقَ هَلُوْعًا ۟ۙ

१९. निःसंशय, मनुष्य मोठ्या कच्च्या हृदयाचा बनविला गेला आहे. info
التفاسير:

external-link copy
20 : 70

اِذَا مَسَّهُ الشَّرُّ جَزُوْعًا ۟ۙ

२०. जेव्हा त्याला कष्ट - यातना पोहचते, तेव्हा भयचिंतीत होतो. info
التفاسير:

external-link copy
21 : 70

وَّاِذَا مَسَّهُ الْخَیْرُ مَنُوْعًا ۟ۙ

२१. आणि जेव्हा त्याला सुख प्राप्त होते, कंजूसपणा करू लागतो. info
التفاسير:

external-link copy
22 : 70

اِلَّا الْمُصَلِّیْنَ ۟ۙ

२२. परंतु ते नमाज पढणारे. info
التفاسير:

external-link copy
23 : 70

الَّذِیْنَ هُمْ عَلٰی صَلَاتِهِمْ دَآىِٕمُوْنَ ۟

२३. जे आपल्या नमाजचे वक्तशीर पालन करणारे आहेत.१ info
التفاسير:

external-link copy
24 : 70

وَالَّذِیْنَ فِیْۤ اَمْوَالِهِمْ حَقٌّ مَّعْلُوْمٌ ۟

२४. आणि ज्यांच्या धन-संपत्तीत निर्धारित हिस्सा आहे. info
التفاسير:

external-link copy
25 : 70

لِّلسَّآىِٕلِ وَالْمَحْرُوْمِ ۟

२५. याचकांचाही आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचाही. info
التفاسير:

external-link copy
26 : 70

وَالَّذِیْنَ یُصَدِّقُوْنَ بِیَوْمِ الدِّیْنِ ۟

२६. आणि जे न्यायाच्या दिवसावर विश्वास राखतात. info
التفاسير:

external-link copy
27 : 70

وَالَّذِیْنَ هُمْ مِّنْ عَذَابِ رَبِّهِمْ مُّشْفِقُوْنَ ۟ۚ

२७. आणि जे आपल्या पालनकर्त्याच्या शिक्षेचे भय बाळगत राहतात. info
التفاسير:

external-link copy
28 : 70

اِنَّ عَذَابَ رَبِّهِمْ غَیْرُ مَاْمُوْنٍ ۪۟

२८. निःसंशय, त्यांच्या पालनकर्त्याची शिक्षा यातना, निर्धास्त होण्याची बाब नाही. info
التفاسير:

external-link copy
29 : 70

وَالَّذِیْنَ هُمْ لِفُرُوْجِهِمْ حٰفِظُوْنَ ۟ۙ

२९. आणि जे लोक आपल्या लज्जास्थानां (गुप्तांगां) चे (हराम कृत्यापासून) रक्षण करतात. info
التفاسير:

external-link copy
30 : 70

اِلَّا عَلٰۤی اَزْوَاجِهِمْ اَوْ مَا مَلَكَتْ اَیْمَانُهُمْ فَاِنَّهُمْ غَیْرُ مَلُوْمِیْنَ ۟ۚ

३०. पंरतु आपल्या पत्नींच्या आणि आपल्या दासींच्याखेरीज ज्यांचे ते मालक (स्वामी) आहेत, या बाबतीत ते निंदनीय नाहीत. info
التفاسير:

external-link copy
31 : 70

فَمَنِ ابْتَغٰی وَرَآءَ ذٰلِكَ فَاُولٰٓىِٕكَ هُمُ الْعٰدُوْنَ ۟ۚ

३१. आता जो कोणी याच्याखेरीज (मार्ग) शोधेल, तर असे लोक मर्यादेचे उल्लंघन करणारे ठरतील. info
التفاسير:

external-link copy
32 : 70

وَالَّذِیْنَ هُمْ لِاَمٰنٰتِهِمْ وَعَهْدِهِمْ رٰعُوْنَ ۟

३२. आणि जे आपल्या अनामती (ठेवी) ची, आणि आपल्या वायद्या-वचनांची व प्रतिज्ञेची कास बाळगतात. info
التفاسير:

external-link copy
33 : 70

وَالَّذِیْنَ هُمْ بِشَهٰدٰتِهِمْ قَآىِٕمُوْنَ ۟

३३. आणि जे आपल्या साक्षींवर सरळ (आणि अटळ) राहतात. info
التفاسير:

external-link copy
34 : 70

وَالَّذِیْنَ هُمْ عَلٰی صَلَاتِهِمْ یُحَافِظُوْنَ ۟ؕ

३४. आणि जे आपल्या नमाजांचे संरक्षण करतात. info
التفاسير:

external-link copy
35 : 70

اُولٰٓىِٕكَ فِیْ جَنّٰتٍ مُّكْرَمُوْنَ ۟ؕ۠

३५. हेच लोक जन्नतमध्ये मान - प्रतिष्ठा राखणारे असतील. info
التفاسير:

external-link copy
36 : 70

فَمَالِ الَّذِیْنَ كَفَرُوْا قِبَلَكَ مُهْطِعِیْنَ ۟ۙ

३६. तेव्हा, या काफिरांना झाले तरी काय की ते तुमच्याकडे धावत येतात. info
التفاسير:

external-link copy
37 : 70

عَنِ الْیَمِیْنِ وَعَنِ الشِّمَالِ عِزِیْنَ ۟

३७. उजव्या आणि डाव्या बाजूने, समूहासमूहाने. info
التفاسير:

external-link copy
38 : 70

اَیَطْمَعُ كُلُّ امْرِئٍ مِّنْهُمْ اَنْ یُّدْخَلَ جَنَّةَ نَعِیْمٍ ۟ۙ

३८. काय त्यांच्यापैकी प्रत्येकजण असे इच्छितो की त्यांना देणग्यांनी युक्त (ऐश-आरामाच्या) जन्नतमध्ये प्रवेश लाभेल? info
التفاسير:

external-link copy
39 : 70

كَلَّا ؕ— اِنَّا خَلَقْنٰهُمْ مِّمَّا یَعْلَمُوْنَ ۟

३९. (असे) कदापि होणार नाही. आम्ही त्यांना त्या (वस्तू) पासून निर्माण केले आहे, जिला ते जाणतात. info
التفاسير:

external-link copy
40 : 70

فَلَاۤ اُقْسِمُ بِرَبِّ الْمَشٰرِقِ وَالْمَغٰرِبِ اِنَّا لَقٰدِرُوْنَ ۟ۙ

४०. तेव्हा मला शपथ आहे दोन्ही पूर्व आणि पश्चिम (दिशां) च्या पालनकर्त्याची की आम्ही निश्चतपणे समर्थ आहोत. info
التفاسير:

external-link copy
41 : 70

عَلٰۤی اَنْ نُّبَدِّلَ خَیْرًا مِّنْهُمْ ۙ— وَمَا نَحْنُ بِمَسْبُوْقِیْنَ ۟

४१. या गोष्टीवर की त्यांच्याऐवजी त्यांच्यापेक्षा चांगले लोक आणावेत, आणि आम्ही लाचार विवश नाहीत. info
التفاسير:

external-link copy
42 : 70

فَذَرْهُمْ یَخُوْضُوْا وَیَلْعَبُوْا حَتّٰی یُلٰقُوْا یَوْمَهُمُ الَّذِیْ یُوْعَدُوْنَ ۟ۙ

४२. तेव्हा तुम्ही त्यांना भांडत-खेळत (असलेले) सोडा, येथे पर्यर्ंत की हे आपल्या त्या दिवसाला जाऊन मिळावेत, ज्याचा वायदा त्यांच्याशी केला जात आहे. info
التفاسير:

external-link copy
43 : 70

یَوْمَ یَخْرُجُوْنَ مِنَ الْاَجْدَاثِ سِرَاعًا كَاَنَّهُمْ اِلٰی نُصُبٍ یُّوْفِضُوْنَ ۟ۙ

४३. ज्या दिवशी कबरीमधून हे धावत पळत बाहेर पडतील, जणू काही ते साध्य-चिन्हाकडे वेगाने जात आहेत. info
التفاسير:

external-link copy
44 : 70

خَاشِعَةً اَبْصَارُهُمْ تَرْهَقُهُمْ ذِلَّةٌ ؕ— ذٰلِكَ الْیَوْمُ الَّذِیْ كَانُوْا یُوْعَدُوْنَ ۟۠

४४. त्यांचे डोळे (नजरा) झुकलेले असतील, त्यांच्यावर अपमानाचे सावट (पसरलेले) असेल. हाच तो दिवस, ज्याचा त्यांच्याशी वायदा केला जात होता. info
التفاسير: