Traducción de los significados del Sagrado Corán - Traducción al maratiano - Muhammad Shafi Ansari

Número de página:close

external-link copy
71 : 28

قُلْ اَرَءَیْتُمْ اِنْ جَعَلَ اللّٰهُ عَلَیْكُمُ الَّیْلَ سَرْمَدًا اِلٰی یَوْمِ الْقِیٰمَةِ مَنْ اِلٰهٌ غَیْرُ اللّٰهِ یَاْتِیْكُمْ بِضِیَآءٍ ؕ— اَفَلَا تَسْمَعُوْنَ ۟

७१. सांगा की, जरा विचार करा, जर अल्लाह कयामतपर्यंत तुमच्यावर निरंतर रात्रच रात्र आच्छादित करील तर अल्लाहखेरीज ते कोणते आराध्य दैवत आहे, जे तुमच्यावर दिवसाचा प्रकाश आणील? काय तुम्ही ऐकत नाही? info
التفاسير:

external-link copy
72 : 28

قُلْ اَرَءَیْتُمْ اِنْ جَعَلَ اللّٰهُ عَلَیْكُمُ النَّهَارَ سَرْمَدًا اِلٰی یَوْمِ الْقِیٰمَةِ مَنْ اِلٰهٌ غَیْرُ اللّٰهِ یَاْتِیْكُمْ بِلَیْلٍ تَسْكُنُوْنَ فِیْهِ ؕ— اَفَلَا تُبْصِرُوْنَ ۟

७२. त्यांना विचारा, हाही विचार करा, जर अल्लाह कयामतपर्यंत तुमच्यावर निरंतर दिवसच दिवस ठेवील तर अशा स्थितीतही अल्लाहखेरीज ते कोणते दैवत (माबूद) आहे जे तुमच्याजवळ रात्र आणील, ज्यात तुम्ही आराम करू शकावे. काय तुम्ही पाहत नाहीत? info
التفاسير:

external-link copy
73 : 28

وَمِنْ رَّحْمَتِهٖ جَعَلَ لَكُمُ الَّیْلَ وَالنَّهَارَ لِتَسْكُنُوْا فِیْهِ وَلِتَبْتَغُوْا مِنْ فَضْلِهٖ وَلَعَلَّكُمْ تَشْكُرُوْنَ ۟

७३. आणि त्यानेच तुमच्यासाठी आपल्या दया कृपेने दिवस रात्र निर्धारित केले आहेत, यासाठी की रात्री तुम्ही आराम करू शकावे आणि दिवसा त्याच्या (पाठविलेल्या) आजिविकेचा शोध घ्यावा. हे अशासाठी की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी. info
التفاسير:

external-link copy
74 : 28

وَیَوْمَ یُنَادِیْهِمْ فَیَقُوْلُ اَیْنَ شُرَكَآءِیَ الَّذِیْنَ كُنْتُمْ تَزْعُمُوْنَ ۟

७४. आणि ज्या दिवशी त्यांना हाक मारून अल्लाह फर्माविल की ज्यांना तुम्ही माझा सहभागी समजत होते, ते आहेत कोठे? info
التفاسير:

external-link copy
75 : 28

وَنَزَعْنَا مِنْ كُلِّ اُمَّةٍ شَهِیْدًا فَقُلْنَا هَاتُوْا بُرْهَانَكُمْ فَعَلِمُوْۤا اَنَّ الْحَقَّ لِلّٰهِ وَضَلَّ عَنْهُمْ مَّا كَانُوْا یَفْتَرُوْنَ ۟۠

७५. आणि तुम्ही प्रत्येक जनसमुदायातून एक साक्षी वेगळा करू आणि सांगू की आपला पुरावा सादर करा, जेव्हा त्या वेळी जाणून घेतील की सत्य अल्लाहच्या बाजूने आहे आणि जे काही असत्य ते रचत राहिले ते सर्व त्यांच्या जवळून हरवले जाईल. info
التفاسير:

external-link copy
76 : 28

اِنَّ قَارُوْنَ كَانَ مِنْ قَوْمِ مُوْسٰی فَبَغٰی عَلَیْهِمْ ۪— وَاٰتَیْنٰهُ مِنَ الْكُنُوْزِ مَاۤ اِنَّ مَفَاتِحَهٗ لَتَنُوْٓاُ بِالْعُصْبَةِ اُولِی الْقُوَّةِ ۗ— اِذْ قَالَ لَهٗ قَوْمُهٗ لَا تَفْرَحْ اِنَّ اللّٰهَ لَا یُحِبُّ الْفَرِحِیْنَ ۟

७६. कारुन मूसाच्या जनसमूहापैकी होता, परंतु तो त्याच्यावर अत्याचार करू लागला होता. आम्ही त्याला एवढा प्रचंड खजिना देऊन ठेवला होता की कित्येक शक्तिशाली लोक मोठ्या कष्टाने त्याच्या चाव्या उचलू शकत होते. एकदा त्याच्या जनसमूहाच्या लोकांनी त्याला म्हटले की दिमाख दाखवू नकोस. अल्लाह, दिमाख दाखविणाऱ्यांशी प्रेम करीत नाही. info
التفاسير:

external-link copy
77 : 28

وَابْتَغِ فِیْمَاۤ اٰتٰىكَ اللّٰهُ الدَّارَ الْاٰخِرَةَ وَلَا تَنْسَ نَصِیْبَكَ مِنَ الدُّنْیَا وَاَحْسِنْ كَمَاۤ اَحْسَنَ اللّٰهُ اِلَیْكَ وَلَا تَبْغِ الْفَسَادَ فِی الْاَرْضِ ؕ— اِنَّ اللّٰهَ لَا یُحِبُّ الْمُفْسِدِیْنَ ۟

७७. आणि जे काही अल्लाहने तुला प्रदान केले आहे, त्यातून आखिरतच्या घराचा शोधही ठेव आणि आपला ऐहिक हिस्साही विसरू नकोस आणि ज्या प्रकारे अल्लाहने तुझ्यावर उपकार केला आहे, तू देखील सद्‌वर्तन कर आणि देशात उत्पात (माजविण्या) ची इच्छा धरू नकोस. निश्चितच, अल्लाह उत्पात (फसाद) माजविणाऱ्यांशी प्रेम राखत नाही. info
التفاسير: