Traducción de los significados del Sagrado Corán - Traducción al maratiano - Muhammad Shafi Ansari

Número de página:close

external-link copy
40 : 26

لَعَلَّنَا نَتَّبِعُ السَّحَرَةَ اِنْ كَانُوْا هُمُ الْغٰلِبِیْنَ ۟

४०. यासाठी की जर जादूगार प्रभावी ठरले तर आम्ही त्यांचेच अनुसरण करू. info
التفاسير:

external-link copy
41 : 26

فَلَمَّا جَآءَ السَّحَرَةُ قَالُوْا لِفِرْعَوْنَ اَىِٕنَّ لَنَا لَاَجْرًا اِنْ كُنَّا نَحْنُ الْغٰلِبِیْنَ ۟

४१. जादूगार येऊन फिरऔनला म्हणू लागले की जर आम्ही जिंकलो तर आम्हाला काही बक्षीस वगैरे मिळेल ना! info
التفاسير:

external-link copy
42 : 26

قَالَ نَعَمْ وَاِنَّكُمْ اِذًا لَّمِنَ الْمُقَرَّبِیْنَ ۟

४२. (फिरऔन) म्हणाला, होय! (मोठ्या खुशीने) किंबहुना अशा परिस्थितीत तुम्ही माझे खास दरबारी व्हाल. info
التفاسير:

external-link copy
43 : 26

قَالَ لَهُمْ مُّوْسٰۤی اَلْقُوْا مَاۤ اَنْتُمْ مُّلْقُوْنَ ۟

४३. (हजरत) मूसा जादूगारांना म्हणाले, जे काय तुम्हाला टाकायचे आहे, ते टाका. info
التفاسير:

external-link copy
44 : 26

فَاَلْقَوْا حِبَالَهُمْ وَعِصِیَّهُمْ وَقَالُوْا بِعِزَّةِ فِرْعَوْنَ اِنَّا لَنَحْنُ الْغٰلِبُوْنَ ۟

४४. त्यांनी आपल्या दोऱ्या आणि काठ्या खाली टाकल्या आणि म्हणाले, फिरऔनच्या प्रतिष्ठेची शपथ, आम्ही अवश्य विजयी होऊ. info
التفاسير:

external-link copy
45 : 26

فَاَلْقٰی مُوْسٰی عَصَاهُ فَاِذَا هِیَ تَلْقَفُ مَا یَاْفِكُوْنَ ۟ۚۖ

४५. आता (हजरत) मूसा यांनीही आपली काठी खाली टाकली, जिने त्याच क्षणी त्यांचा असत्याचा बनविलेला खेळ गिळायला सुरुवात केली. info
التفاسير:

external-link copy
46 : 26

فَاُلْقِیَ السَّحَرَةُ سٰجِدِیْنَ ۟ۙ

४६. हे पाहताच ते जादूगार सजद्यात पडले. info
التفاسير:

external-link copy
47 : 26

قَالُوْۤا اٰمَنَّا بِرَبِّ الْعٰلَمِیْنَ ۟ۙ

४७. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही तर सर्व विश्वाच्या पालनकर्त्यावर ईमान राखले. info
التفاسير:

external-link copy
48 : 26

رَبِّ مُوْسٰی وَهٰرُوْنَ ۟

४८. अर्थात मूसा आणि हारूनच्या पालनकर्त्यावर. info
التفاسير:

external-link copy
49 : 26

قَالَ اٰمَنْتُمْ لَهٗ قَبْلَ اَنْ اٰذَنَ لَكُمْ ۚ— اِنَّهٗ لَكَبِیْرُكُمُ الَّذِیْ عَلَّمَكُمُ السِّحْرَ ۚ— فَلَسَوْفَ تَعْلَمُوْنَ ؕ۬— لَاُقَطِّعَنَّ اَیْدِیَكُمْ وَاَرْجُلَكُمْ مِّنْ خِلَافٍ وَّلَاُوصَلِّبَنَّكُمْ اَجْمَعِیْنَ ۟ۚ

४९. (फिरऔन) म्हणाला, माझी परवानगी घेण्यापूर्वीच तुम्ही त्याच्यावर ईमान राखले, निश्चितच हा तुमचा सरदार (मोठा गुरू) आहे, ज्याने तुम्हा सर्वांना जादू शिकवली आहे. तेव्हा तुम्हाला अत्ताच माहीत पडेल. शपथ आहे. मी देखील तुमचे हात पाय विरूद्ध दिशांनी कापून टाकीन आणि तुम्हा सर्वांना फासावर लटकवीन. info
التفاسير:

external-link copy
50 : 26

قَالُوْا لَا ضَیْرَ ؗ— اِنَّاۤ اِلٰی رَبِّنَا مُنْقَلِبُوْنَ ۟ۚ

५०. ते म्हणाले, काही हरकत नाही, आम्ही तर आपल्या पालनकर्त्याकडे परतून जाणारच आहोत. info
التفاسير:

external-link copy
51 : 26

اِنَّا نَطْمَعُ اَنْ یَّغْفِرَ لَنَا رَبُّنَا خَطٰیٰنَاۤ اَنْ كُنَّاۤ اَوَّلَ الْمُؤْمِنِیْنَ ۟ؕ۠

५१. या कारणास्तव की आम्ही सर्वांत प्रथम ईमान राखणारे बनलो आहोत, आम्ही आशा बाळगतो की आमचा स्वामी व पालनकर्ता आमच्या सर्व चुका माफ करील. info
التفاسير:

external-link copy
52 : 26

وَاَوْحَیْنَاۤ اِلٰی مُوْسٰۤی اَنْ اَسْرِ بِعِبَادِیْۤ اِنَّكُمْ مُّتَّبَعُوْنَ ۟

५२. आणि आम्ही मूसावर वहयी (प्रकाशना) केली की रात्रीच्या रात्री माझ्या दासांना घेऊन निघा. तुम्हा सर्वांचा पाठलाग केला जाईल. info
التفاسير:

external-link copy
53 : 26

فَاَرْسَلَ فِرْعَوْنُ فِی الْمَدَآىِٕنِ حٰشِرِیْنَ ۟ۚ

५३. फिरऔनने शहरांमध्ये जमा करणाऱ्यांना पाठविले. info
التفاسير:

external-link copy
54 : 26

اِنَّ هٰۤؤُلَآءِ لَشِرْذِمَةٌ قَلِیْلُوْنَ ۟ۙ

५४. की निश्चितच हा समूह अतिशय कमी संख्येत आहे. info
التفاسير:

external-link copy
55 : 26

وَاِنَّهُمْ لَنَا لَغَآىِٕظُوْنَ ۟ۙ

५५. आणि त्यावर हे आम्हाला फार क्रोधित करीत आहेत. info
التفاسير:

external-link copy
56 : 26

وَاِنَّا لَجَمِیْعٌ حٰذِرُوْنَ ۟ؕ

५६. आणि निःसंशय, आम्ही मोठ्या संख्येत आहोत, त्यांच्यापासून सावध राहणारे. info
التفاسير:

external-link copy
57 : 26

فَاَخْرَجْنٰهُمْ مِّنْ جَنّٰتٍ وَّعُیُوْنٍ ۟ۙ

५७. शेवटी आम्ही त्यांना बागांमधून व झऱ्यांमधून बाहेर काढले. info
التفاسير:

external-link copy
58 : 26

وَّكُنُوْزٍ وَّمَقَامٍ كَرِیْمٍ ۟ۙ

५८. आणि खजिन्यांमधून आणि चांगल्या चांगल्या ठिकाणांमधून. info
التفاسير:

external-link copy
59 : 26

كَذٰلِكَ ؕ— وَاَوْرَثْنٰهَا بَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ ۟ؕ

५९. अशा प्रकारे झाले, आणि आम्ही त्या (सर्व वस्तूं) चा वारस इस्राईलच्या संततीला बनविले. info
التفاسير:

external-link copy
60 : 26

فَاَتْبَعُوْهُمْ مُّشْرِقِیْنَ ۟

६०. यास्तव फिरऔनचे अनुयायी सूर्य उगवताच त्यांचा पाठलाग करण्यास निघाले. info
التفاسير: