Translation of the Meanings of the Noble Qur'an - Marathi translation - Muhammad Shafi Ansari

Al-Inshiqāq

external-link copy
1 : 84

اِذَا السَّمَآءُ انْشَقَّتْ ۟ۙ

१. जेव्हा आकाश विदीर्ण होईल. info
التفاسير:

external-link copy
2 : 84

وَاَذِنَتْ لِرَبِّهَا وَحُقَّتْ ۟ۙ

२. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल, आणि त्याला तसे करणे भाग आहे. info
التفاسير:

external-link copy
3 : 84

وَاِذَا الْاَرْضُ مُدَّتْ ۟ؕ

३. आणि जेव्हा जमिनीला (खेचून) पसरविले जाईल. info
التفاسير:

external-link copy
4 : 84

وَاَلْقَتْ مَا فِیْهَا وَتَخَلَّتْ ۟ۙ

४. आणि तिच्यात जे आहे ते ओकून बाहेर काढील आणि अगदी खाली होईल. info
التفاسير:

external-link copy
5 : 84

وَاَذِنَتْ لِرَبِّهَا وَحُقَّتْ ۟ؕ

५. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश कान लावून ऐकेल आणि ती त्यास पात्र आहे. info
التفاسير:

external-link copy
6 : 84

یٰۤاَیُّهَا الْاِنْسَانُ اِنَّكَ كَادِحٌ اِلٰی رَبِّكَ كَدْحًا فَمُلٰقِیْهِ ۟ۚ

६. हे मानवा! तू आपल्या पालनकर्त्याशी भेट होईपर्यंत हे प्रयत्न आणि सर्व कार्य आणि परिश्रम करून त्याची भेट घेणार आहेस. info
التفاسير:

external-link copy
7 : 84

فَاَمَّا مَنْ اُوْتِیَ كِتٰبَهٗ بِیَمِیْنِهٖ ۟ۙ

७. तर त्या वेळी ज्या माणसाच्या उजव्या हातात कर्म-पत्र दिले जाईल. info
التفاسير:

external-link copy
8 : 84

فَسَوْفَ یُحَاسَبُ حِسَابًا یَّسِیْرًا ۟ۙ

८. त्याचा हिशोब मोठ्या सहजतेने घेतला जाईल.१ info

(१) सहज सोपा हिशोब असा की, ईमान राखणाऱ्याचे कर्म-पत्र प्रस्तुत केले जाईल, त्याचे दोष (अपराध) देखील त्याच्यासमोर आणले जातील. मग अल्लाह आपल्या असीम दया-कृपेने त्याला माफ करील. हजरत आयशा (रजि.) फर्मावितात की पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, ज्याचा हिशोब घेतला गेला तो नाश पावला. मी म्हटले, हे अल्लाहचे रसूल! अल्लाह माझे आपणावर बलिदान करो. काय अल्लाहने नाही फर्माविले की ज्याच्या उजव्या हाता कर्म-पत्र दिले गेले, त्याचा हिशोब सह सोपा होईल. (हजरत आयशा यांच्या मते या आयतीनुसार तर ईमान राखणाऱ्याचाही हिशोब घेतला जाईल, परंतु तो नाश पावणार नाही.) पैगंबरांनी स्पष्ट केले, ही तर पेशी (हजर होणे) आहे. अर्थात ईमान राखणाऱ्याशी हिशोबाचा (सक्त) व्यवहार होणार नाही. एक सर्वसाधारण पेशी असेल. ईमान राखणाऱ्यांना अल्लाहसमोर हजर केले जाईल, ज्याला सक्तीने विचारपूस होईल तो नाश पावेल. (सहीह बुखारी, तफसीर सूरह इन्शिकाक)

التفاسير:

external-link copy
9 : 84

وَّیَنْقَلِبُ اِلٰۤی اَهْلِهٖ مَسْرُوْرًا ۟ؕ

९. आणि तो आपल्या कुटुंबियांकडे आनंदित होऊन परत जाईल. info
التفاسير:

external-link copy
10 : 84

وَاَمَّا مَنْ اُوْتِیَ كِتٰبَهٗ وَرَآءَ ظَهْرِهٖ ۟ۙ

१०. परंतु ज्या माणसाचे कर्म-पत्र त्याच्या पाठीमागून दिले जाईल. info
التفاسير:

external-link copy
11 : 84

فَسَوْفَ یَدْعُوْا ثُبُوْرًا ۟ۙ

११. तेव्हा तो मृत्युला बोलावू लागेल. info
التفاسير:

external-link copy
12 : 84

وَّیَصْلٰی سَعِیْرًا ۟ؕ

१२. आणि भडकत्या जहन्नममध्ये दाखल होईल. info
التفاسير:

external-link copy
13 : 84

اِنَّهٗ كَانَ فِیْۤ اَهْلِهٖ مَسْرُوْرًا ۟ؕ

१३. हा मनुष्य आपल्या कुटुंबात (जगात) आनंदित होता. info
التفاسير:

external-link copy
14 : 84

اِنَّهٗ ظَنَّ اَنْ لَّنْ یَّحُوْرَ ۟ۚۛ

१४. तो समजत होता की अल्लाहकडे परतून जाणारच नाही. info
التفاسير:

external-link copy
15 : 84

بَلٰۤی ۛۚ— اِنَّ رَبَّهٗ كَانَ بِهٖ بَصِیْرًا ۟ؕ

१५. हे कसे शक्य आहे, वास्तविक त्याचा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे पाहात होता. info
التفاسير:

external-link copy
16 : 84

فَلَاۤ اُقْسِمُ بِالشَّفَقِ ۟ۙ

१६. मला संध्याकाळच्या लालिमेची शपथ. info
التفاسير:

external-link copy
17 : 84

وَالَّیْلِ وَمَا وَسَقَ ۟ۙ

१७. आणि रात्रीची आणि तिने गोळा केलेल्या वस्तूंची शपथ. info
التفاسير:

external-link copy
18 : 84

وَالْقَمَرِ اِذَا اتَّسَقَ ۟ۙ

१८. आणि पूर्ण चंद्राची शपथ. info
التفاسير:

external-link copy
19 : 84

لَتَرْكَبُنَّ طَبَقًا عَنْ طَبَقٍ ۟ؕ

१९. निःसंशय, तुम्ही एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पोहोचाल. info
التفاسير:

external-link copy
20 : 84

فَمَا لَهُمْ لَا یُؤْمِنُوْنَ ۟ۙ

२०. त्यांना झाले तरी काय की ईमान राखत नाहीत? info
التفاسير:

external-link copy
21 : 84

وَاِذَا قُرِئَ عَلَیْهِمُ الْقُرْاٰنُ لَا یَسْجُدُوْنَ ۟

२१. आणि जेव्हा त्यांच्यासमोर कुरआन वाचले जाते, तेव्हा सजदा करीत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
22 : 84

بَلِ الَّذِیْنَ كَفَرُوْا یُكَذِّبُوْنَ ۟ؗۖ

२२. किंबहुना त्यांनी कुप्र (इन्कार) केला, ते खोटे ठरवित आहेत. info
التفاسير:

external-link copy
23 : 84

وَاللّٰهُ اَعْلَمُ بِمَا یُوْعُوْنَ ۟ؗۖ

२३. आणि हे जे काही मनात ठेवतात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो. info
التفاسير:

external-link copy
24 : 84

فَبَشِّرْهُمْ بِعَذَابٍ اَلِیْمٍ ۟ۙ

२४. तेव्हा तुम्ही त्यांना दुःखदायक शिक्षा यातनांची खूशखबर द्या. info
التفاسير:

external-link copy
25 : 84

اِلَّا الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ لَهُمْ اَجْرٌ غَیْرُ مَمْنُوْنٍ ۟۠

२५. तथापि ईमान राखणाऱ्या नेक सदाचारी लोकांना अगणित आणि कधीही न संपणारा मोबदला प्रदान केला जाईल. info
التفاسير: