(१) अर्थात हृदय, डोळे आणि कान सर्वश्रेष्ठ अल्लाहने अशासाठी प्रदान केले आहेत की माणसाने यांचा लाभ घेत आपल्या स्वामी व पालनकर्त्या अल्लाहला समजून घ्यावे, त्याच्या निशाण्यांना पाहावे आणि सत्य गोष्ट लक्षपूर्वक ऐकावी, परंतु जो मनुष्य यांच्याद्वारे हे काम घेत नाही, तो त्यांच्याकरावी लाभ न घडल्याने पशूवत आहे, किंबहुना जनावरांपेक्षा अधिक वाट चुकलेला आहे. यासाठी की जनावरे तरीदेखील आपले काही फायदे व नुकसान समजतात, कारण ते लाभदायक गोष्टींपासून लाभ घेतात आणि हानिकारक वस्तूंचा अव्हेर करतात. परंतु अल्लाहच्या मार्गदर्शनापासून पथभ्रष्ट मनुष्याला इतकेही समजत नाही की त्याच्यासाठी लाभदायक काय आहे आणि हानिकारक काय आहे.