Translation of the Meanings of the Noble Qur'an - Marathi translation - Muhammad Shafi Ansari

Page Number:close

external-link copy
60 : 6

وَهُوَ الَّذِیْ یَتَوَفّٰىكُمْ بِالَّیْلِ وَیَعْلَمُ مَا جَرَحْتُمْ بِالنَّهَارِ ثُمَّ یَبْعَثُكُمْ فِیْهِ لِیُقْضٰۤی اَجَلٌ مُّسَمًّی ۚ— ثُمَّ اِلَیْهِ مَرْجِعُكُمْ ثُمَّ یُنَبِّئُكُمْ بِمَا كُنْتُمْ تَعْمَلُوْنَ ۟۠

६०. तोच (अल्लाह) होय, जो रात्री तुमचा आत्मा (एक पट) ताब्यात घेतो आणि दिवसा जे काही करता तेही जाणतो, मग तुम्हाला त्यात एक ठरलेली मुदत पूर्ण करण्याकरिता जागे करतो. मग तुम्हाला त्याच्याचकडे परत जायचे आहे. तेव्हा तुम्ही जे काही करीत राहिले ते तुम्हाला सांगेल. info
التفاسير:

external-link copy
61 : 6

وَهُوَ الْقَاهِرُ فَوْقَ عِبَادِهٖ وَیُرْسِلُ عَلَیْكُمْ حَفَظَةً ؕ— حَتّٰۤی اِذَا جَآءَ اَحَدَكُمُ الْمَوْتُ تَوَفَّتْهُ رُسُلُنَا وَهُمْ لَا یُفَرِّطُوْنَ ۟

६१. तोच आपल्या दासांवर वर्चस्वशाली आहे आणि तुमच्यावर देखरेख ठेवणारे (फरिश्ते) पाठवितो, येथ पर्यंत की जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचा मृत्यु (समय) जवळ येतो, तेव्हा आमचे फरिश्ते त्याचा जीव काढून घेतात आणि ते किंचितही आळस करीत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
62 : 6

ثُمَّ رُدُّوْۤا اِلَی اللّٰهِ مَوْلٰىهُمُ الْحَقِّ ؕ— اَلَا لَهُ الْحُكْمُ ۫— وَهُوَ اَسْرَعُ الْحٰسِبِیْنَ ۟

६२. मग ते आपल्या सच्चा पालनकर्त्या (अल्लाह) जवळ आणले जातील सावधान! त्याचाच आदेश चालेल आणि तो फार लवकर हिशोब घेईल. info
التفاسير:

external-link copy
63 : 6

قُلْ مَنْ یُّنَجِّیْكُمْ مِّنْ ظُلُمٰتِ الْبَرِّ وَالْبَحْرِ تَدْعُوْنَهٗ تَضَرُّعًا وَّخُفْیَةً ۚ— لَىِٕنْ اَنْجٰىنَا مِنْ هٰذِهٖ لَنَكُوْنَنَّ مِنَ الشّٰكِرِیْنَ ۟

६३. तुम्ही सांगा, जमीन आणि जलाशयाच्या अंधःकारातून जेव्हा त्याला नरमी आणि हळू स्वरात पुकारता की जर आम्हाला यातून सोडवशिल तर आम्ही खआत्रीने तुझे कृतज्ञशील बनू, तेव्हा कोण तुम्हाला वाचवितो. info
التفاسير:

external-link copy
64 : 6

قُلِ اللّٰهُ یُنَجِّیْكُمْ مِّنْهَا وَمِنْ كُلِّ كَرْبٍ ثُمَّ اَنْتُمْ تُشْرِكُوْنَ ۟

६४. तुम्ही स्वतः सांगा की यापासून आणि प्रत्येक संकटापासून तुम्हाला अल्लाहच वाचवितो, पण तरीही तुम्ही शिर्क करता. info
التفاسير:

external-link copy
65 : 6

قُلْ هُوَ الْقَادِرُ عَلٰۤی اَنْ یَّبْعَثَ عَلَیْكُمْ عَذَابًا مِّنْ فَوْقِكُمْ اَوْ مِنْ تَحْتِ اَرْجُلِكُمْ اَوْ یَلْبِسَكُمْ شِیَعًا وَّیُذِیْقَ بَعْضَكُمْ بَاْسَ بَعْضٍ ؕ— اُنْظُرْ كَیْفَ نُصَرِّفُ الْاٰیٰتِ لَعَلَّهُمْ یَفْقَهُوْنَ ۟

६५. तुम्ही सांगा, तोच तुमच्यावर, तुमच्यावरून किंवा तुमच्या पायांखालून अज़ाब (शिक्षा-यातना) पाठविण्याचे किंवा तुमचे अनेक समूह बनवून आपसात लढाईची मजा चाखविण्याचे सामर्थ्य राखतो. तुम्ही पाहा की आम्ही अनेकरित्या कशा प्रकारे आपल्या आयतींचे निवेदन करतो, यासाठी की त्यांना समजावे. info
التفاسير:

external-link copy
66 : 6

وَكَذَّبَ بِهٖ قَوْمُكَ وَهُوَ الْحَقُّ ؕ— قُلْ لَّسْتُ عَلَیْكُمْ بِوَكِیْلٍ ۟ؕ

६६. आणि तुमच्या जनसमूहाने त्याला खोटे ठरविले वास्तविक ते सत्य आहे. तुम्ही सांगा की मी तुमच्यावर अधिकारी (निरीक्षक) नाही. info
التفاسير:

external-link copy
67 : 6

لِكُلِّ نَبَاٍ مُّسْتَقَرٌّ ؗ— وَّسَوْفَ تَعْلَمُوْنَ ۟

६७. प्रत्येक खबरीची एक निर्धारीत वेळ आहे आणि हे तुम्ही फार लवकर जाणून घ्याल. info
التفاسير:

external-link copy
68 : 6

وَاِذَا رَاَیْتَ الَّذِیْنَ یَخُوْضُوْنَ فِیْۤ اٰیٰتِنَا فَاَعْرِضْ عَنْهُمْ حَتّٰی یَخُوْضُوْا فِیْ حَدِیْثٍ غَیْرِهٖ ؕ— وَاِمَّا یُنْسِیَنَّكَ الشَّیْطٰنُ فَلَا تَقْعُدْ بَعْدَ الذِّكْرٰی مَعَ الْقَوْمِ الظّٰلِمِیْنَ ۟

६८. आणि जेव्हा तुम्ही त्या लोकांना पाहाल, जे आमच्या आयतींमध्ये व्यंग दोष काढत आहेत, तेव्हा अशा लोकांपासून वेगळे व्हा, येथपर्यंत की ते दुसऱ्या कामात गुंतावेत आणि जर तुम्हाला सैतान विसरही पाडेल तरी आठवण आल्यावर पुन्हा अशा अत्याचारी लोकांसोबत बसू नका. info
التفاسير: