Translation of the Meanings of the Noble Qur'an - Marathi translation - Muhammad Shafi Ansari

Adh-Dhāriyāt

external-link copy
1 : 51

وَالذّٰرِیٰتِ ذَرْوًا ۟ۙ

१. शपथ आहे उडवून विखुरणाऱ्यां (वाऱ्यां) ची info
التفاسير:

external-link copy
2 : 51

فَالْحٰمِلٰتِ وِقْرًا ۟ۙ

२. मग ओझे उचलणाऱ्यांची info
التفاسير:

external-link copy
3 : 51

فَالْجٰرِیٰتِ یُسْرًا ۟ۙ

३. मग धीम्या गतीने चालणाऱ्यांची info
التفاسير:

external-link copy
4 : 51

فَالْمُقَسِّمٰتِ اَمْرًا ۟ۙ

४. मग कामाची वाटणी करणाऱ्यांची. info
التفاسير:

external-link copy
5 : 51

اِنَّمَا تُوْعَدُوْنَ لَصَادِقٌ ۟ۙ

५. निःसंशय, तुम्हाला जे वायदे दिले जातात (ते सर्व) खरे आहेत. info
التفاسير:

external-link copy
6 : 51

وَّاِنَّ الدِّیْنَ لَوَاقِعٌ ۟ؕ

६. आणि निश्चितच न्याय होणार आहे. info
التفاسير:

external-link copy
7 : 51

وَالسَّمَآءِ ذَاتِ الْحُبُكِ ۟ۙ

७. शपथ आहे, मार्ग राखणाऱ्या आकाशाची. info
التفاسير:

external-link copy
8 : 51

اِنَّكُمْ لَفِیْ قَوْلٍ مُّخْتَلِفٍ ۟ۙ

८. निश्चितच तुम्ही विभिन्न गोष्टीत पडला आहात. info
التفاسير:

external-link copy
9 : 51

یُّؤْفَكُ عَنْهُ مَنْ اُفِكَ ۟ؕ

९. त्या (सत्या) पासून तोच फिरविला जातो, जो फिरविला गेला असावा. info
التفاسير:

external-link copy
10 : 51

قُتِلَ الْخَرّٰصُوْنَ ۟ۙ

१०. अटकळीच्या गोष्टी बोलणारे नष्ट केले गेले. info
التفاسير:

external-link copy
11 : 51

الَّذِیْنَ هُمْ فِیْ غَمْرَةٍ سَاهُوْنَ ۟ۙ

११. जे चेतनाहीन आहेत आणि विसर पडलेले. info
التفاسير:

external-link copy
12 : 51

یَسْـَٔلُوْنَ اَیَّانَ یَوْمُ الدِّیْنِ ۟ؕ

१२. विचारतात की मोबदल्याचा दिवस केव्हा येईल? info
التفاسير:

external-link copy
13 : 51

یَوْمَ هُمْ عَلَی النَّارِ یُفْتَنُوْنَ ۟

१३. (होय) हा तो दिवस आहे की हे आगीवर तापविले जातील. info
التفاسير:

external-link copy
14 : 51

ذُوْقُوْا فِتْنَتَكُمْ ؕ— هٰذَا الَّذِیْ كُنْتُمْ بِهٖ تَسْتَعْجِلُوْنَ ۟

१४. स्वाद चाखा. हेच ते, ज्याची तुम्ही घाई माजवित होते. info
التفاسير:

external-link copy
15 : 51

اِنَّ الْمُتَّقِیْنَ فِیْ جَنّٰتٍ وَّعُیُوْنٍ ۟ۙ

१५. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे जन्नतींमध्ये आणि (शीतल) झऱ्यांमध्ये असतील. info
التفاسير:

external-link copy
16 : 51

اٰخِذِیْنَ مَاۤ اٰتٰىهُمْ رَبُّهُمْ ؕ— اِنَّهُمْ كَانُوْا قَبْلَ ذٰلِكَ مُحْسِنِیْنَ ۟ؕ

१६. त्यांच्या पालनकर्त्याने जे काही त्यांना प्रदान केले आहे, ते घेत असतील ते तर त्यापूर्वीच सत्कर्म करणारे होते. info
التفاسير:

external-link copy
17 : 51

كَانُوْا قَلِیْلًا مِّنَ الَّیْلِ مَا یَهْجَعُوْنَ ۟

१७. ते रात्री फार कमी झोपत असत. info
التفاسير:

external-link copy
18 : 51

وَبِالْاَسْحَارِ هُمْ یَسْتَغْفِرُوْنَ ۟

१८. आणि ते रात्रीच्या अंतिम प्रहरी (पहाटे) क्षमा - याचना करीत. info
التفاسير:

external-link copy
19 : 51

وَفِیْۤ اَمْوَالِهِمْ حَقٌّ لِّلسَّآىِٕلِ وَالْمَحْرُوْمِ ۟

१९. आणि त्यांच्या धन-संपत्तीत याचकांचा(मागणाऱ्यांचा)आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचा हक्क होता. info
التفاسير:

external-link copy
20 : 51

وَفِی الْاَرْضِ اٰیٰتٌ لِّلْمُوْقِنِیْنَ ۟ۙ

२०. आणि विश्वास राखणाऱ्यांकरिता तर धरतीत अनेक निशाण्या आहेत. info
التفاسير:

external-link copy
21 : 51

وَفِیْۤ اَنْفُسِكُمْ ؕ— اَفَلَا تُبْصِرُوْنَ ۟

२१. आणि स्वतः तुमच्या अस्तित्वात देखील, तर काय तुम्ही पाहत नाहीत? info
التفاسير:

external-link copy
22 : 51

وَفِی السَّمَآءِ رِزْقُكُمْ وَمَا تُوْعَدُوْنَ ۟

२२. आणि तुमची आजिविका(अन्न सामुग्री) आणि जो तुम्हाला वायदा दिला जात आहे, सर्व आकाशात आहे. info
التفاسير:

external-link copy
23 : 51

فَوَرَبِّ السَّمَآءِ وَالْاَرْضِ اِنَّهٗ لَحَقٌّ مِّثْلَ مَاۤ اَنَّكُمْ تَنْطِقُوْنَ ۟۠

२३. तेव्हा आकाश आणि धरतीच्या स्वामी व पालनकर्त्याची शपथ! हे अगदी सत्य आहे, असेच खात्रीपूर्वक, जसे तुम्ही बोलता. info
التفاسير:

external-link copy
24 : 51

هَلْ اَتٰىكَ حَدِیْثُ ضَیْفِ اِبْرٰهِیْمَ الْمُكْرَمِیْنَ ۟ۘ

२४. काय तुम्हाला इब्राहीम (अलैहिस्सलाम) च्या सन्मानित अतिथींची वार्ताही पोहचली आहे? info
التفاسير:

external-link copy
25 : 51

اِذْ دَخَلُوْا عَلَیْهِ فَقَالُوْا سَلٰمًا ؕ— قَالَ سَلٰمٌ ۚ— قَوْمٌ مُّنْكَرُوْنَ ۟

२५. ते जेव्हा त्यांच्याजवळ आले तेव्हा सलाम केला. (इब्राहीम) यांनी सलामला उत्तर दिले (आणि म्हणाले, हे तर) अनोळखी लोक आहेत. info
التفاسير:

external-link copy
26 : 51

فَرَاغَ اِلٰۤی اَهْلِهٖ فَجَآءَ بِعِجْلٍ سَمِیْنٍ ۟ۙ

२६. मग (गुपचुप घाईघाईने) आपल्या कुटुंबियांकडे गेले आणि एका लठ्ठ वासरुचे (मांस) घेऊन आले. info
التفاسير:

external-link copy
27 : 51

فَقَرَّبَهٗۤ اِلَیْهِمْ قَالَ اَلَا تَاْكُلُوْنَ ۟ؗ

२७. आणि ते त्यांच्या पुढे ठेवले आणि म्हणाले, तुम्ही खात का नाही? info
التفاسير:

external-link copy
28 : 51

فَاَوْجَسَ مِنْهُمْ خِیْفَةً ؕ— قَالُوْا لَا تَخَفْ ؕ— وَبَشَّرُوْهُ بِغُلٰمٍ عَلِیْمٍ ۟

२८. मग मनातल्या मनात त्यांच्यापासून भयभित झाले. (अतिथी) म्हणाले, तुम्ही भिऊ नका आणि त्यांना (हजरत) इब्राहीमला एका ज्ञानी पुत्रप्राप्तीची शुभवार्ता दिली. info
التفاسير:

external-link copy
29 : 51

فَاَقْبَلَتِ امْرَاَتُهٗ فِیْ صَرَّةٍ فَصَكَّتْ وَجْهَهَا وَقَالَتْ عَجُوْزٌ عَقِیْمٌ ۟

२९. तेव्हा त्यांच्या पत्नीने आश्चर्यचकित होऊन आपल्या तोंडावर हात मारून म्हटले की मी तर म्हातारी आहे, त्याचबरोबर वांझ देखील. info
التفاسير:

external-link copy
30 : 51

قَالُوْا كَذٰلِكِ ۙ— قَالَ رَبُّكِ ؕ— اِنَّهٗ هُوَ الْحَكِیْمُ الْعَلِیْمُ ۟

३०. ते म्हणाले की होय, तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने असेच फर्माविले आहे. निःसंशय, तो हिकमशाली आणि जाणणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
31 : 51

قَالَ فَمَا خَطْبُكُمْ اَیُّهَا الْمُرْسَلُوْنَ ۟

३१. (हजरत इब्राहीम अलै.) म्हणाले की अल्लाहने पाठविलेल्या (फरिश्त्यां) नो! तुमच्या (येण्याचा) हेतू काय? info
التفاسير:

external-link copy
32 : 51

قَالُوْۤا اِنَّاۤ اُرْسِلْنَاۤ اِلٰی قَوْمٍ مُّجْرِمِیْنَ ۟ۙ

३२. त्यांनी उत्तर दिले की आम्ही अपराधी लोकांकडे पाठविले गेलो आहोत. info
التفاسير:

external-link copy
33 : 51

لِنُرْسِلَ عَلَیْهِمْ حِجَارَةً مِّنْ طِیْنٍ ۟ۙ

३३. यासाठी की आम्ही त्याच्यावर (भाजलेल्या) मातीच्या दगडांचा वर्षाव करावा. info
التفاسير:

external-link copy
34 : 51

مُّسَوَّمَةً عِنْدَ رَبِّكَ لِلْمُسْرِفِیْنَ ۟

३४. जे तुमच्या पालनकर्त्यातर्फे चिन्हांकित झाले आहेत त्या मर्यादा भंग करणाऱ्यांकरिता. info
التفاسير:

external-link copy
35 : 51

فَاَخْرَجْنَا مَنْ كَانَ فِیْهَا مِنَ الْمُؤْمِنِیْنَ ۟ۚ

३५. तेव्हा जेवढे ईमान राखणारे तिथे होते, आम्ही त्यांना तेथून काढले. info
التفاسير:

external-link copy
36 : 51

فَمَا وَجَدْنَا فِیْهَا غَیْرَ بَیْتٍ مِّنَ الْمُسْلِمِیْنَ ۟ۚ

३६. आणि आम्हाला तिथे मुसलमानांचे फक्त एकच घर आढळले. info
التفاسير:

external-link copy
37 : 51

وَتَرَكْنَا فِیْهَاۤ اٰیَةً لِّلَّذِیْنَ یَخَافُوْنَ الْعَذَابَ الْاَلِیْمَ ۟ؕ

३७. आणि आम्ही तिथे त्यांच्यासाठी, जे दुःखदायक शिक्षा यातनेचे भय बाळगतात, एक पूर्ण चिन्ह सोडले. info
التفاسير:

external-link copy
38 : 51

وَفِیْ مُوْسٰۤی اِذْ اَرْسَلْنٰهُ اِلٰی فِرْعَوْنَ بِسُلْطٰنٍ مُّبِیْنٍ ۟

३८. आणि मूसाच्या वृत्तांतात (ही आमच्यातर्फे तंबी आहे) जेव्हा आम्ही त्यांना फिरऔनकडे स्पष्ट प्रमाणासह पाठविले. info
التفاسير:

external-link copy
39 : 51

فَتَوَلّٰی بِرُكْنِهٖ وَقَالَ سٰحِرٌ اَوْ مَجْنُوْنٌ ۟

३९. तेव्हा त्याने आपल्या सामर्थ्याच्या घमेंडीत तोंड फिरविले, आणि म्हणाले, हा (एकतर) जादूगार आहे किंवा वेडसर आहे. info
التفاسير:

external-link copy
40 : 51

فَاَخَذْنٰهُ وَجُنُوْدَهٗ فَنَبَذْنٰهُمْ فِی الْیَمِّ وَهُوَ مُلِیْمٌ ۟ؕ

४०. शेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या सैन्याला आपल्या शिक्षा-यातनेत धरून, समुद्रात टाकले. तो होताच निर्भर्त्सना करण्यायोग्य. info
التفاسير:

external-link copy
41 : 51

وَفِیْ عَادٍ اِذْ اَرْسَلْنَا عَلَیْهِمُ الرِّیْحَ الْعَقِیْمَ ۟ۚ

४१. त्याचप्रमाणे आदच्या लोकांमध्येही (आमच्यातर्फे तंबी आहे) जेव्हा आम्ही त्यांच्यावर वांझ (अशुभ) वादळ पाठविले. info
التفاسير:

external-link copy
42 : 51

مَا تَذَرُ مِنْ شَیْءٍ اَتَتْ عَلَیْهِ اِلَّا جَعَلَتْهُ كَالرَّمِیْمِ ۟ؕ

४२. ते ज्या ज्या वस्तूवरून गेले, तिला जीर्ण हाडांप्रमाणे चूरेचूर करून टाकले. info
التفاسير:

external-link copy
43 : 51

وَفِیْ ثَمُوْدَ اِذْ قِیْلَ لَهُمْ تَمَتَّعُوْا حَتّٰی حِیْنٍ ۟

४३. आणि समूद (च्या वृत्तांता) मध्येही (बोध) आहे, जेव्हा त्यांना सांगितले गेले की तुम्ही काही दिवसापर्यंत लाभ प्राप्त करून घ्या. info
التفاسير:

external-link copy
44 : 51

فَعَتَوْا عَنْ اَمْرِ رَبِّهِمْ فَاَخَذَتْهُمُ الصّٰعِقَةُ وَهُمْ یَنْظُرُوْنَ ۟

४४. परंतु त्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाचे पालन केले नाही, ज्याबद्दल त्यांना एका भयंकर गर्जनेने नष्ट करून टाकले आणि ते बघतच राहिले. info
التفاسير:

external-link copy
45 : 51

فَمَا اسْتَطَاعُوْا مِنْ قِیَامٍ وَّمَا كَانُوْا مُنْتَصِرِیْنَ ۟ۙ

४५. मग ना तर ते उभे राहू शकले, आणि ना सूड घेऊ शकले. info
التفاسير:

external-link copy
46 : 51

وَقَوْمَ نُوْحٍ مِّنْ قَبْلُ ؕ— اِنَّهُمْ كَانُوْا قَوْمًا فٰسِقِیْنَ ۟۠

४६. आणि नूह (अलै.) यांच्या जनसमूहाची देखील याच्या आधी (हीच अवस्था झाली होती) ते देखील मोठे अवज्ञाकारी लोक होते. info
التفاسير:

external-link copy
47 : 51

وَالسَّمَآءَ بَنَیْنٰهَا بِاَیْىدٍ وَّاِنَّا لَمُوْسِعُوْنَ ۟

४७. आणि आकाशाला आम्ही (आपल्या) हातांनी बनविले आहे आणि निःसंशय, आम्ही व्यापक करणारे आहोत. info
التفاسير:

external-link copy
48 : 51

وَالْاَرْضَ فَرَشْنٰهَا فَنِعْمَ الْمٰهِدُوْنَ ۟

४८. आणि जमिनीला आम्ही बिछाईत बनविले आहे, तेव्हा आम्ही किती चांगले बिछाईत करणारे आहोत. info
التفاسير:

external-link copy
49 : 51

وَمِنْ كُلِّ شَیْءٍ خَلَقْنَا زَوْجَیْنِ لَعَلَّكُمْ تَذَكَّرُوْنَ ۟

४९. आणि प्रत्येक वस्तूला आम्ही जोडी जोडीने निर्माण केले आहे,१ यासाठी की तुम्ही बोध ग्रहण करावा. info

(१) अर्थात प्रत्येक वस्तूची जोडी, जसे नर-मादी, किंवा विरुद्धार्थानेही निर्माण केले आहे. जसे अंधार-उजेड, जल-थल, चंद्र-सूर्य, गोड-कडू, रात्र-दिवस, भले-बुरे, जीवन-मृत्यु, ईमान-कुप्र, सौभाग्य-दुर्भाग्य, जन्नत-जहन्नम, जिन्न-मनुष्य वगैरे. येथपावेतो की सजीवांच्या तुलनेत निर्जीव. यास्तव या जगाचीही जोडी आहे ते म्हणजे आखिरत.

التفاسير:

external-link copy
50 : 51

فَفِرُّوْۤا اِلَی اللّٰهِ ؕ— اِنِّیْ لَكُمْ مِّنْهُ نَذِیْرٌ مُّبِیْنٌ ۟ۚ

५०. तेव्हा तुम्ही अल्लाहकडे धाव घ्या. निःसंशय, मी तुम्हाला त्याच्यातर्फे खबरदार करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
51 : 51

وَلَا تَجْعَلُوْا مَعَ اللّٰهِ اِلٰهًا اٰخَرَ ؕ— اِنِّیْ لَكُمْ مِّنْهُ نَذِیْرٌ مُّبِیْنٌ ۟

५१. आणि अल्लाहसोबत दुसऱ्या कोणालाही उपास्य (दैवत) बनवू नका, निश्चितच, मी तुम्हाला त्याच्यातर्फे स्पष्टतः सावध करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
52 : 51

كَذٰلِكَ مَاۤ اَتَی الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ مِّنْ رَّسُوْلٍ اِلَّا قَالُوْا سَاحِرٌ اَوْ مَجْنُوْنٌ ۟۫

५२. अशाच प्रकारे जे लोक त्यांच्या पूर्वी होऊन गेलेत, त्यांच्याजवळ जो देखील पैगंबर आला, त्याला ते म्हणाले की एकतर हा जादूगार आहे किंवा वेडा! info
التفاسير:

external-link copy
53 : 51

اَتَوَاصَوْا بِهٖ ۚ— بَلْ هُمْ قَوْمٌ طَاغُوْنَ ۟ۚ

५३. काय हे, या गोष्टीची एकमेकांना ताकीद करत गेलेत, नव्हे, किंबहुना हे सर्व विद्रोही (उन्मत्त) लोक आहेत. info
التفاسير:

external-link copy
54 : 51

فَتَوَلَّ عَنْهُمْ فَمَاۤ اَنْتَ بِمَلُوْمٍ ۟ؗ

५४. तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून तोंड फिरवून घ्या, तुमच्यावर कसलाही दोषारोप नाही. info
التفاسير:

external-link copy
55 : 51

وَّذَكِّرْ فَاِنَّ الذِّكْرٰی تَنْفَعُ الْمُؤْمِنِیْنَ ۟

५५. आणि उपदेश करीत राहा, निःसंशय हा उपदेश ईमान राखणाऱ्यांना लाभ देईल. info
التفاسير:

external-link copy
56 : 51

وَمَا خَلَقْتُ الْجِنَّ وَالْاِنْسَ اِلَّا لِیَعْبُدُوْنِ ۟

५६. मी जिन्नांना आणि मानवांना फक्त अशासाठी निर्माण केले आहे की त्यांनी केवळ माझी उपासना करावी.१ info

(१) यात अल्लाहच्या त्या इराद्यास जाहीर केले गेले आहे, जो शरिअतीनुसार तो आपल्या दासांकडून इच्छितो की समस्त जिन्न आणि मानवांनी केवळ एक अल्लाहचीच उपासना करावी व आज्ञापालनही त्याच एकाचे करावे. जर याचा संबंध उत्पत्तीच्या इराद्याशी असता तर सर्वच त्याची उपासना व आज्ञापालन करण्यास विवश झाले असते, मग कोणी अवज्ञा करण्याचे सामर्थ्य राखू शकला नसता. अर्थात यात जिन्न आणि मानवांना त्याच्या जीवन उद्देशाची आठवण करून दिली गेली आहे, ज्याचा त्यांनी विसर पाडल्यास आखिरतमध्ये सक्तीने विचारपूस होईल. परिणामी ते त्या कसोटीत असफल ठरतील, ज्यात अल्लाहने त्यांना संकल्प आणि पसंतीचे स्वातंत्र्य देऊन ठेवले आहे.

التفاسير:

external-link copy
57 : 51

مَاۤ اُرِیْدُ مِنْهُمْ مِّنْ رِّزْقٍ وَّمَاۤ اُرِیْدُ اَنْ یُّطْعِمُوْنِ ۟

५७. त्यांच्याकडून मी ना आजिविका (रोजी) इच्छितो ना असे इच्छितो की त्यांनी मला खाऊ घालावे. info
التفاسير:

external-link copy
58 : 51

اِنَّ اللّٰهَ هُوَ الرَّزَّاقُ ذُو الْقُوَّةِ الْمَتِیْنُ ۟

५८. निःसंशय, अल्लाह स्वतः रोजी देणारा सामर्थ्यशाली व बलवान आहे. info
التفاسير:

external-link copy
59 : 51

فَاِنَّ لِلَّذِیْنَ ظَلَمُوْا ذَنُوْبًا مِّثْلَ ذَنُوْبِ اَصْحٰبِهِمْ فَلَا یَسْتَعْجِلُوْنِ ۟

५९. तेव्हा ज्या लोकांनी अत्याचार केला आहे, त्यांनाही त्यांच्या साथीदारांच्या हिश्श्याइतकाच हिस्सा मिळेल, यास्तव त्यांनी माझ्याशी घाईने मागू नये. info
التفاسير:

external-link copy
60 : 51

فَوَیْلٌ لِّلَّذِیْنَ كَفَرُوْا مِنْ یَّوْمِهِمُ الَّذِیْ یُوْعَدُوْنَ ۟۠

६०. तेव्हा दुर्दशा आहे काफिरांसाठी, त्यांच्या त्या दिवशी ज्याचा त्यांना वायदा दिला जात आहे. info
التفاسير: