Translation of the Meanings of the Noble Qur'an - Marathi translation - Muhammad Shafi Ansari

external-link copy
5 : 33

اُدْعُوْهُمْ لِاٰبَآىِٕهِمْ هُوَ اَقْسَطُ عِنْدَ اللّٰهِ ۚ— فَاِنْ لَّمْ تَعْلَمُوْۤا اٰبَآءَهُمْ فَاِخْوَانُكُمْ فِی الدِّیْنِ وَمَوَالِیْكُمْ ؕ— وَلَیْسَ عَلَیْكُمْ جُنَاحٌ فِیْمَاۤ اَخْطَاْتُمْ بِهٖ وَلٰكِنْ مَّا تَعَمَّدَتْ قُلُوْبُكُمْ ؕ— وَكَانَ اللّٰهُ غَفُوْرًا رَّحِیْمًا ۟

५. दत्तक घेतलेल्या मुलांना त्यांच्या (खऱ्या) पित्यांच्या संबंधाने हाक मारा. अल्लाहजवळ पूर्ण न्याय हाच आहे. मग जर तुम्हाला त्यांचे (खरे) पिता माहीत नसतील तर ते तुमचे धर्म-बांधव आणि मित्र आहेत.१ तुमच्याकडून भूलचूक म्हणून काही घडल्यास त्याबाबत तुमच्यावर कसलाही गुन्हा नाही, परंतु गुन्हा तो आहे, ज्याचा तुम्ही इरादा कराल आणि इरादा मनापासून कराल. अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे. info

(१) या आदेशान्वये ती प्रथा हराम (निषिद्ध) केली गेली जी अज्ञानकाळापासून चालत आली होती आणि इस्लामच्या आरंभकाळात प्रचलित होती की दत्तक घेतलेल्या मुलाला स्वतःचा पुत्र समजले जात नसे. पैगंबरांच्या निकटतम अनुयायीं (सहाबां) चे कथन आहे की आम्ही जैद बिन हारिसला, ज्यांना पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी दास्यमुक्त करून पुत्र बनविले होते. जैद बिन मुहम्मद या नावाने हाक मारीत. येथपावेतो की कुरआनाची ही आयत अवतरली.

التفاسير: