Translation of the Meanings of the Noble Qur'an - Marathi translation - Muhammad Shafi Ansari

external-link copy
128 : 3

لَیْسَ لَكَ مِنَ الْاَمْرِ شَیْءٌ اَوْ یَتُوْبَ عَلَیْهِمْ اَوْ یُعَذِّبَهُمْ فَاِنَّهُمْ ظٰلِمُوْنَ ۟

१२८. (हे पैगंबर!) तुमच्या अखत्यारीत काही एक नाही१ अल्लाह इच्छिल तर त्यांची तौबा (क्षमा-याचना) कबूल करील किंवा त्यांना सजा देईल, कारण ते अत्याचारी लोक आहेत. info

(१) अर्थात त्या काफिरांना मार्गदर्शन करणे किंवा त्यांच्याबाबत एखादा निर्णय घेण्याचा अधिकार अल्लाहला आहे. हदीस वचनानुसार ओहदच्या युद्धात पैगंबर (स.) यांचे दात शहीद झाले आणि चेहराही जखमी झाला. तेव्हा पैगंबर म्हणाले, हा जनसमूह सफल कसा होईल, ज्याने आपल्या पैगंबराला घायाळ केले. पैगंबरांनी त्यांच्या सन्मार्गप्राप्तीबाबत नाउमेदी व्यक्त केली. या अनुषंगाने ही आयत उतरली. अन्य कथनांनुसार पैगंबरांनी काफिरांसाठी कुनूते नाजिलाचा इतमाम केला ज्यात त्यांच्यासाठी बद्दुआ (शाप) दिला, त्यावर ही आयत उतरली, तेव्हा त्यांनी बद्दुआ देणे बंद केले. (इब्ने कसीर व फतहूल कदीर) या आयतीद्वारे त्या लोकांनी बोध घेतला पाहिजे, जे पैगंबरांना सर्व समर्थ मानतात, वास्तविक एखाद्याला सन्मार्गावर आणणे हे त्यांच्या अवाख्यात नव्हते जरी त्यांना सन्मार्गाकडे बोलविण्यासाठी पाठविले गेले होते.

التفاسير: