Translation of the Meanings of the Noble Qur'an - Marathi translation - Muhammad Shafi Ansari

external-link copy
45 : 29

اُتْلُ مَاۤ اُوْحِیَ اِلَیْكَ مِنَ الْكِتٰبِ وَاَقِمِ الصَّلٰوةَ ؕ— اِنَّ الصَّلٰوةَ تَنْهٰی عَنِ الْفَحْشَآءِ وَالْمُنْكَرِ ؕ— وَلَذِكْرُ اللّٰهِ اَكْبَرُ ؕ— وَاللّٰهُ یَعْلَمُ مَا تَصْنَعُوْنَ ۟

४५. जो ग्रंथ तुमच्याकडे वहयी (अवतरित) केला गेला आहे, त्याचे पठण करा१ आणि नमाज कायम करा (नियमितपणे पढत राहा) निःसंशय नमाज, निर्लज्जता आणि दुष्कर्मापासून रोखते२ आणि निःसंशय अल्लाहचे नामःस्मरण फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही जे काही करीत आहात, अल्लाह ते जाणतो. info

(१) पवित्र कुरआनाच्या पठणाचे अनेक उद्देश आहेत. केवळ प्रतिफळ आणि पुण्यप्राप्तीकरिता, त्याच्या अर्थ व आशयावर विचार चिंतन करण्याकरिता बोध उपदेश व शिकवणप्राप्तीकरिता आणि स्पष्टीकरणाकरिता, पठणाच्या आदेशआत ते सर्वच प्रकारे सामील आहेत. (२) अर्थात निर्लज्जता आणि दुराचाराला रोखण्याचे माध्यम बनते. ज्या प्रकारे औषधांचे अनेक प्रभाव असतात आणि असे म्हटले जाते की अमुक एक औषध म्अमुक एका रोगावर उपाय आहे आणि वस्तुतः तसे घडते, परंतु केव्हा? जेव्हा दोन गोष्टी ध्यानात राखल्या जातील, एक तर औषधाला व्यवस्थित नियम व अटींसह वापरले जावे, ज्या वैद्य, हकीम किंवा डॉक्टरने सांगितल्या आहेत. दुसरे पथ्य म्हणजे अशा वस्तू वापरल्या न जाव्यात, ज्या औषधाचा प्रभाव कमी करतील किंवा नाहीसा करतील. तद्‌वतच नमाजमध्येही अल्लाहने असा प्रभाव राखला आहे की तो माणसाला निर्लज्जता आणि दुष्कृत्यांपासून रोखते, परंतु त्याच वेळी, जेव्हा नमाज पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आदर्श आचरणशैलीनुसार त्या पद्धती आणि अटींचे पालन करून अदा केली जाईल, ज्या तिच्या स्वीकृती आणि मान्यतेकरिता अनिवार्य आहेत.

التفاسير: