Translation of the Meanings of the Noble Qur'an - Marathi translation - Muhammad Shafi Ansari

external-link copy
68 : 25

وَالَّذِیْنَ لَا یَدْعُوْنَ مَعَ اللّٰهِ اِلٰهًا اٰخَرَ وَلَا یَقْتُلُوْنَ النَّفْسَ الَّتِیْ حَرَّمَ اللّٰهُ اِلَّا بِالْحَقِّ وَلَا یَزْنُوْنَ ۚؕ— وَمَنْ یَّفْعَلْ ذٰلِكَ یَلْقَ اَثَامًا ۟ۙ

६८. आणि जे अल्लाहसोबत दुसऱ्या एखाद्या उपास्याला पुकारत नाही, आणि एखाद्या अशा माणसाला, ज्याची हत्या करणे अल्लाहने हराम (अवैध) केले असावे, त्याची नाहक हत्या करीत नाही, ना ते व्यभिचार करतात१ आणि जो कोणी हे कर्म करील तर तो स्वतःवर कठोर शिक्षा ओढवून घेईल. info

(२) हदीसमध्ये पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांना विचारले गेले, कोणता अपराध सर्वांत मोठा आहे. पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी फर्माविले, हे की तू अल्लाहसोबत दुसऱ्याला सहभागी करावे, वास्तविक त्यानेच तुला निर्माण केले. त्याने विचारले, त्यानंतर कोणता गुन्हा सर्वांत मोठा आहे? फर्माविले, आपल्या संततीची या भयाने हत्या करणे की ती तुझ्यासोबत खाईल. त्याने विचारले त्यानंतर कोणता? पैगंबरांनी फर्माविले, हे की तू आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी व्यभिचार करावा. मग पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी फर्माविले की या गोष्टींची पुष्टी या आयतीद्वारे होते. नंतर पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी याच आयतीचे पठण केले. (अलबुखारी, तफसीर सूरह अल बकरा, मुस्लिम किताबुल ईमान बाबु कौनिश-शिर्के अकबहुज जुनूब)

التفاسير: