Translation of the Meanings of the Noble Qur'an - Marathi translation - Muhammad Shafi Ansari

Al-Mu’minūn

external-link copy
1 : 23

قَدْ اَفْلَحَ الْمُؤْمِنُوْنَ ۟ۙ

१. निःसंशय, ईमान राखणाऱ्यांनी सफलता प्राप्त केली. info
التفاسير:

external-link copy
2 : 23

الَّذِیْنَ هُمْ فِیْ صَلَاتِهِمْ خٰشِعُوْنَ ۟ۙ

२. जे आपल्या नमाजमध्ये विनम्रता अंगिकारतात. info
التفاسير:

external-link copy
3 : 23

وَالَّذِیْنَ هُمْ عَنِ اللَّغْوِ مُعْرِضُوْنَ ۟ۙ

३. जे निरर्थक गोष्टींपासून तोंड फिरवतात. info
التفاسير:

external-link copy
4 : 23

وَالَّذِیْنَ هُمْ لِلزَّكٰوةِ فٰعِلُوْنَ ۟ۙ

४. जे जकात (धर्मदान) अदा करणारे आहेत. info
التفاسير:

external-link copy
5 : 23

وَالَّذِیْنَ هُمْ لِفُرُوْجِهِمْ حٰفِظُوْنَ ۟ۙ

५. जे अपल्या लज्जास्थानांचे (गुप्तांगांचे) संरक्षण करणारे आहेत. info
التفاسير:

external-link copy
6 : 23

اِلَّا عَلٰۤی اَزْوَاجِهِمْ اَوْ مَا مَلَكَتْ اَیْمَانُهُمْ فَاِنَّهُمْ غَیْرُ مَلُوْمِیْنَ ۟ۚ

६. आपल्या पत्न्या आणि स्वामित्वात असलेल्या दासींखेरीज. निःसंशय यांच्याबाबतीत त्यांच्यावर कसलाही दोष नाही. info
التفاسير:

external-link copy
7 : 23

فَمَنِ ابْتَغٰی وَرَآءَ ذٰلِكَ فَاُولٰٓىِٕكَ هُمُ الْعٰدُوْنَ ۟ۚ

७. मात्र याच्याखेरीज जो इतर शोधील तर तेच मर्यादेचे उल्लंघन करणारे आहेत. info
التفاسير:

external-link copy
8 : 23

وَالَّذِیْنَ هُمْ لِاَمٰنٰتِهِمْ وَعَهْدِهِمْ رٰعُوْنَ ۟ۙ

८. जे आपल्या अमानतीची आणि वायद्याची रक्षा करणारे आहेत. info
التفاسير:

external-link copy
9 : 23

وَالَّذِیْنَ هُمْ عَلٰی صَلَوٰتِهِمْ یُحَافِظُوْنَ ۟ۘ

९. जे आपल्या नामाजांचे संरक्षण करतात. info
التفاسير:

external-link copy
10 : 23

اُولٰٓىِٕكَ هُمُ الْوٰرِثُوْنَ ۟ۙ

१०. हेच लोक उत्तराधिकारी आहेत. info
التفاسير:

external-link copy
11 : 23

الَّذِیْنَ یَرِثُوْنَ الْفِرْدَوْسَ ؕ— هُمْ فِیْهَا خٰلِدُوْنَ ۟

११. जे फिर्दोस (जन्नतच्या सर्वोच्च दर्जा) चे वारस होतील, जिथे सदैव राहतील. info
التفاسير:

external-link copy
12 : 23

وَلَقَدْ خَلَقْنَا الْاِنْسَانَ مِنْ سُلٰلَةٍ مِّنْ طِیْنٍ ۟ۚ

१२. आणि निःसंशय आम्ही मानवाला खणखणणाऱ्या मातीच्या सत्वापासून निर्माण केले. info
التفاسير:

external-link copy
13 : 23

ثُمَّ جَعَلْنٰهُ نُطْفَةً فِیْ قَرَارٍ مَّكِیْنٍ ۪۟

१३. मग त्याला वीर्य बनवून सुरिक्षत स्थानी ठेवले. info
التفاسير:

external-link copy
14 : 23

ثُمَّ خَلَقْنَا النُّطْفَةَ عَلَقَةً فَخَلَقْنَا الْعَلَقَةَ مُضْغَةً فَخَلَقْنَا الْمُضْغَةَ عِظٰمًا فَكَسَوْنَا الْعِظٰمَ لَحْمًا ۗ— ثُمَّ اَنْشَاْنٰهُ خَلْقًا اٰخَرَ ؕ— فَتَبٰرَكَ اللّٰهُ اَحْسَنُ الْخٰلِقِیْنَ ۟ؕ

१४. मग वीर्याला आम्ही जमलेल्या रक्ताचे स्वरूप दिले, मग त्या रक्ताच्या गोळ्याला मांसाचा तुकडा बनिवले, मग मांसाच्या तुकड्यात हाडे बनिवली, मग हाडांवर मांस जढविले, मग एका दुसऱ्या स्वरूपात त्याला निर्माण केले. तेव्हा मोठा समृद्धशाली आहे तो अल्लाह जो सर्वोत्तम निर्मिती करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
15 : 23

ثُمَّ اِنَّكُمْ بَعْدَ ذٰلِكَ لَمَیِّتُوْنَ ۟ؕ

१५. यानंतर तुम्ही सर्वच्या सर्व निश्चित मरण पावणार आहात. info
التفاسير:

external-link copy
16 : 23

ثُمَّ اِنَّكُمْ یَوْمَ الْقِیٰمَةِ تُبْعَثُوْنَ ۟

१६. मग कयामतच्या दिवशी, अवश्य तुम्ही सर्व उठविले जाल. info
التفاسير:

external-link copy
17 : 23

وَلَقَدْ خَلَقْنَا فَوْقَكُمْ سَبْعَ طَرَآىِٕقَ ۖۗ— وَمَا كُنَّا عَنِ الْخَلْقِ غٰفِلِیْنَ ۟

१७. आणि आम्ही तुमच्यावर सात आकाश बनविले आहेत आणि आम्ही आपल्या निर्मितीपासून गाफील नाहीत. info
التفاسير: