Translation of the Meanings of the Noble Qur'an - Marathi translation - Muhammad Shafi Ansari

Page Number:close

external-link copy
77 : 19

اَفَرَءَیْتَ الَّذِیْ كَفَرَ بِاٰیٰتِنَا وَقَالَ لَاُوْتَیَنَّ مَالًا وَّوَلَدًا ۟ؕ

७७. काय तुम्ही त्यालाही पाहिले, ज्याने आमच्या आयतींशी कुप्र (इन्कार) केला आणि म्हणाला की मला तर धन आणि संतती अवश्य दिली जाईल. info
التفاسير:

external-link copy
78 : 19

اَطَّلَعَ الْغَیْبَ اَمِ اتَّخَذَ عِنْدَ الرَّحْمٰنِ عَهْدًا ۟ۙ

७८. काय तो अपरोक्ष ज्ञान राखतो किंवा अल्लाहकडून त्याने एखादे वचन घेतले आहे? info
التفاسير:

external-link copy
79 : 19

كَلَّا ؕ— سَنَكْتُبُ مَا یَقُوْلُ وَنَمُدُّ لَهٗ مِنَ الْعَذَابِ مَدًّا ۟ۙ

७९. मुळीच नाही हा जे काही बोलत आहे, ते आम्ही अवश्य लिहून घेऊ आणि त्यांच्यासाठी अज़ाब (शिक्षा-यातना) वाढवत जाऊ. info
التفاسير:

external-link copy
80 : 19

وَّنَرِثُهٗ مَا یَقُوْلُ وَیَاْتِیْنَا فَرْدًا ۟

८०. आणि हा ज्या वस्तूंबाबत बोलत आहे, त्या आम्ही त्याच्या पश्चात घेऊन टाकू आणि हा एकटाच आमच्या समोर हजर होईल. info
التفاسير:

external-link copy
81 : 19

وَاتَّخَذُوْا مِنْ دُوْنِ اللّٰهِ اٰلِهَةً لِّیَكُوْنُوْا لَهُمْ عِزًّا ۟ۙ

८१. त्यांनी अल्लाहखेरीज इतर देवता (उपास्ये) बनवून ठेवली आहेत की ते त्यांच्यासाठी सन्मानाचे कारण ठरोत. info
التفاسير:

external-link copy
82 : 19

كَلَّا ؕ— سَیَكْفُرُوْنَ بِعِبَادَتِهِمْ وَیَكُوْنُوْنَ عَلَیْهِمْ ضِدًّا ۟۠

८२. असे कदापि होणार नाही. ते तर यांच्या उपासनेचाच इन्कार करतील आणि उलट यांचे शत्रू बनतील. info
التفاسير:

external-link copy
83 : 19

اَلَمْ تَرَ اَنَّاۤ اَرْسَلْنَا الشَّیٰطِیْنَ عَلَی الْكٰفِرِیْنَ تَؤُزُّهُمْ اَزًّا ۟ۙ

८३. काय तुम्ही नाही पाहिले की आम्ही काफिरांजवळ सैतानांना पाठवितो जे त्यांना खूप प्रेरित करतात. info
التفاسير:

external-link copy
84 : 19

فَلَا تَعْجَلْ عَلَیْهِمْ ؕ— اِنَّمَا نَعُدُّ لَهُمْ عَدًّا ۟ۚ

८४. तुम्ही त्यांच्या बाबतीत घाई करू नका. आम्ही तर स्वतःच त्यांची कालगणना करीत आहोत. info
التفاسير:

external-link copy
85 : 19

یَوْمَ نَحْشُرُ الْمُتَّقِیْنَ اِلَی الرَّحْمٰنِ وَفْدًا ۟ۙ

८५. ज्या दिवशी आम्ही, अल्लाहचे भय राखून दुराचारापासून अलिप्त राहणाऱ्यांना, दयावान अल्लाहचा अतिथी बनवून एकत्र करू. info
التفاسير:

external-link copy
86 : 19

وَّنَسُوْقُ الْمُجْرِمِیْنَ اِلٰی جَهَنَّمَ وِرْدًا ۟ۘ

८६. आणि अपराधी लोकांना (अतिशय तहान लागलेल्या अवस्थेत) जहन्नमकडे हाकलत घेऊन जाऊ. info
التفاسير:

external-link copy
87 : 19

لَا یَمْلِكُوْنَ الشَّفَاعَةَ اِلَّا مَنِ اتَّخَذَ عِنْدَ الرَّحْمٰنِ عَهْدًا ۟ۘ

८७. कोणालाही शिफारस करण्याचा अधिकार नसेल, मात्र त्या लोकांखेरीज, ज्यांनी सर्वश्रेष्ठ अल्लाहकडून एखादे वचन घेऊन ठेवले आहे. info
التفاسير:

external-link copy
88 : 19

وَقَالُوا اتَّخَذَ الرَّحْمٰنُ وَلَدًا ۟ؕ

८८. आणि त्यांचे म्हणणे तर असे आहे की दयावान अल्लाहने देखील संतती करून ठेवली आहे. info
التفاسير:

external-link copy
89 : 19

لَقَدْ جِئْتُمْ شَیْـًٔا اِدًّا ۟ۙ

८९. निःसंशय तुम्ही मोठी (वाईट आणि) भयंकर गोष्ट आणली आहे. info
التفاسير:

external-link copy
90 : 19

تَكَادُ السَّمٰوٰتُ یَتَفَطَّرْنَ مِنْهُ وَتَنْشَقُّ الْاَرْضُ وَتَخِرُّ الْجِبَالُ هَدًّا ۟ۙ

९०. शक्य आहे की या कथनामुळे आकाश फाटून जाईल आणि धरती दुभंगून जाईल आणि पर्वताचे कण कण होतील. info
التفاسير:

external-link copy
91 : 19

اَنْ دَعَوْا لِلرَّحْمٰنِ وَلَدًا ۟ۚ

९१. की ते रहमान (अल्लाह) ची संतती साबीत करण्यास बसले आहेत. info
التفاسير:

external-link copy
92 : 19

وَمَا یَنْۢبَغِیْ لِلرَّحْمٰنِ اَنْ یَّتَّخِذَ وَلَدًا ۟ؕ

९२. आणि रहमान (अल्लाह) साठी हे योग्य नाही की त्याने संतती राखावी. info
التفاسير:

external-link copy
93 : 19

اِنْ كُلُّ مَنْ فِی السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ اِلَّاۤ اٰتِی الرَّحْمٰنِ عَبْدًا ۟ؕ

९३. आकाशांमध्ये आणि जमिनीवर जे काही आहे, सर्व अल्लाहचे दास बनूनच येणार आहेत. info
التفاسير:

external-link copy
94 : 19

لَقَدْ اَحْصٰىهُمْ وَعَدَّهُمْ عَدًّا ۟ؕ

९४. त्या सर्वांना त्याने घेरून ठेवले आहे आणि सर्वांची पूर्णतः गणनाही करून ठेवली आहे. info
التفاسير:

external-link copy
95 : 19

وَكُلُّهُمْ اٰتِیْهِ یَوْمَ الْقِیٰمَةِ فَرْدًا ۟

९५. हे सर्वच्या सर्व कयामतच्या दिवशी एकटे त्याच्यासमोर हजर होणार आहेत. info
التفاسير: