Translation of the Meanings of the Noble Qur'an - Marathi translation - Muhammad Shafi Ansari

external-link copy
25 : 14

تُؤْتِیْۤ اُكُلَهَا كُلَّ حِیْنٍ بِاِذْنِ رَبِّهَا ؕ— وَیَضْرِبُ اللّٰهُ الْاَمْثَالَ لِلنَّاسِ لَعَلَّهُمْ یَتَذَكَّرُوْنَ ۟

२५. जो आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाने प्रत्येक वेळी आपले फळ देतो१ आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह लोकांसमोर उदाहरण प्रस्तुत करतो यासाठी की त्यांनी बोध प्राप्त करावा. info

(१) याचा अर्थ असा की ईमानधारकांचे उदाहरण त्या झाडासारखे आहे जे उन्हाळा, हिवाळा अशा प्रत्येक त्रऋतुत फळ देते. अशा प्रकारे ईमानधारकांची सत्कर्मे रात्रंदिवस प्रत्येक क्षणी आकाशाकडे नेली जातात. पवित्र वचनाशी अभिप्रेत इस्लाम किंवा ‘ला इलाह इल्लल्लाह’ आणि पवित्र वृक्षाशी अभिप्रेत खजुरीचे झाड होय, जसे की हदीसद्वारे सिद्ध आहे. (सहीह बुखारी, किताबिल इल्म, बाबूल फहम फिल इल्म आणि सहीह मुस्लिम, किताबुल सिफतिल कियामा, बाब मिस्लुल मोमिन, मिस्लुल नख्लाः)

التفاسير: