Übersetzung der Bedeutungen von dem heiligen Quran - Marathi-Übersetzung - Muhammad Shafi Ansari

Nummer der Seite:close

external-link copy
45 : 27

وَلَقَدْ اَرْسَلْنَاۤ اِلٰی ثَمُوْدَ اَخَاهُمْ صٰلِحًا اَنِ اعْبُدُوا اللّٰهَ فَاِذَا هُمْ فَرِیْقٰنِ یَخْتَصِمُوْنَ ۟

४५. आणि निःसंशय, आम्ही ‘समूद’कडे त्यांचा भाऊ ‘स्वालेह’ला पाठविले (या संदेशासह) की तुम्ही सर्व अल्लाहची उपासना करा. तरीही ते दोन गट बनून आपसात भांडणतंटा करू लागले. info
التفاسير:

external-link copy
46 : 27

قَالَ یٰقَوْمِ لِمَ تَسْتَعْجِلُوْنَ بِالسَّیِّئَةِ قَبْلَ الْحَسَنَةِ ۚ— لَوْلَا تَسْتَغْفِرُوْنَ اللّٰهَ لَعَلَّكُمْ تُرْحَمُوْنَ ۟

४६. (पैगंबर स्वालेह) म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही भलेपणाच्या आदी वाईट गोष्टीची घाई का माजवित आहात. तुम्ही अल्लाहजवळ माफी का नाही मागत? यासाठी की तुमच्यावर दया केली जावी. info
التفاسير:

external-link copy
47 : 27

قَالُوا اطَّیَّرْنَا بِكَ وَبِمَنْ مَّعَكَ ؕ— قَالَ طٰٓىِٕرُكُمْ عِنْدَ اللّٰهِ بَلْ اَنْتُمْ قَوْمٌ تُفْتَنُوْنَ ۟

४७. (ते) म्हणाले की आम्ही तर तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना अपशकुनी समजतो (पैगंबरानी) उत्तर दिले, तुमचा अपशकून अल्लाहजवळ आहे. किंबहुना तुम्ही तर कसोटीत पडलेले लोक आहात. info
التفاسير:

external-link copy
48 : 27

وَكَانَ فِی الْمَدِیْنَةِ تِسْعَةُ رَهْطٍ یُّفْسِدُوْنَ فِی الْاَرْضِ وَلَا یُصْلِحُوْنَ ۟

४८. या शहरात नऊ (प्रमुख) माणसे होती, जे धरतीत उत्पात (फसाद) पसरवित होते आणि सुधारणेचे काम करीत नव्हते. info
التفاسير:

external-link copy
49 : 27

قَالُوْا تَقَاسَمُوْا بِاللّٰهِ لَنُبَیِّتَنَّهٗ وَاَهْلَهٗ ثُمَّ لَنَقُوْلَنَّ لِوَلِیِّهٖ مَا شَهِدْنَا مَهْلِكَ اَهْلِهٖ وَاِنَّا لَصٰدِقُوْنَ ۟

४९. त्यांनी आपसात अल्लाहची शपथ घेऊन प्रतिज्ञा केली की रात्रीतूनच ‘स्वालेह’ आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला चढवू आणि त्यांच्या वारसदाराला सांगू की आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या हत्येच्या वेळी हजर नव्हतो आणि आम्ही खरे बोलत आहोत. info
التفاسير:

external-link copy
50 : 27

وَمَكَرُوْا مَكْرًا وَّمَكَرْنَا مَكْرًا وَّهُمْ لَا یَشْعُرُوْنَ ۟

५०. आणि त्यांनी डाव खेळा आणि आम्ही देखील आणि ते त्यास समजतच नव्हते. info
التفاسير:

external-link copy
51 : 27

فَانْظُرْ كَیْفَ كَانَ عَاقِبَةُ مَكْرِهِمْ ۙ— اَنَّا دَمَّرْنٰهُمْ وَقَوْمَهُمْ اَجْمَعِیْنَ ۟

५१. आता पाहा, त्यांच्या कट-कारस्थानाचा काय परिणाम झाला? आम्ही त्यांना आणि त्यांच्या जनसमूहाला, सर्वांनाच नष्ट करून टाकले. info
التفاسير:

external-link copy
52 : 27

فَتِلْكَ بُیُوْتُهُمْ خَاوِیَةً بِمَا ظَلَمُوْا ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیَةً لِّقَوْمٍ یَّعْلَمُوْنَ ۟

५२. ही त्यांची घरे आहेत, जी त्यांच्या अत्याचारामुळे ओसाड पडली आहेत. जे लोक ज्ञान बाळगतात, त्यांच्यासाठी त्यात मोठी निशाणी आहे. info
التفاسير:

external-link copy
53 : 27

وَاَنْجَیْنَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَكَانُوْا یَتَّقُوْنَ ۟

५३. आणि आम्ही त्यांना, ज्यांनी ईमान राखले होते आणि जे सत्कर्म करीत होते, पूर्णपणे वाचविले. info
التفاسير:

external-link copy
54 : 27

وَلُوْطًا اِذْ قَالَ لِقَوْمِهٖۤ اَتَاْتُوْنَ الْفَاحِشَةَ وَاَنْتُمْ تُبْصِرُوْنَ ۟

५४. आणि लूतचा (उल्लेख करा) जेव्हा ते आपल्या जनसमूहाला म्हणाले, की जाणूनबुजूनही तुम्ही कुकर्म (पुरुष सहवास) करता? info
التفاسير:

external-link copy
55 : 27

اَىِٕنَّكُمْ لَتَاْتُوْنَ الرِّجَالَ شَهْوَةً مِّنْ دُوْنِ النِّسَآءِ ؕ— بَلْ اَنْتُمْ قَوْمٌ تَجْهَلُوْنَ ۟

५५. ही काय गोष्ट आहे? की तुम्ही स्त्रियांना सोडून पुरुषांजवळ कामवासनापूर्तीसाठी येता? खरी गोष्टी अशी की तुम्ही मोठे अज्ञान पूर्ण काम करीत आहात. info
التفاسير: