Übersetzung der Bedeutungen von dem heiligen Quran - Marathi-Übersetzung - Muhammad Shafi Ansari

Nummer der Seite:close

external-link copy
270 : 2

وَمَاۤ اَنْفَقْتُمْ مِّنْ نَّفَقَةٍ اَوْ نَذَرْتُمْ مِّنْ نَّذْرٍ فَاِنَّ اللّٰهَ یَعْلَمُهٗ ؕ— وَمَا لِلظّٰلِمِیْنَ مِنْ اَنْصَارٍ ۟

२७०. तुम्ही वाटेल तेवढा खर्च करा (किंवा दान-पुण्य करा) आणि जो काही नवस माना१ अल्लाह ते जाणतो. आणि अत्याचारींचा कोणी सहायक नाही. info

(१) मूळ शब्द ‘नज़र’ अर्थात नवस मानणे की माझे अमुक एक काम झाले किंवा दुःख दूर झाले तर मी अल्लाहच्या मार्गात एवढे दान करीन. असा नवस पूर्ण करणे आवश्यक आहे. जर एखाद्या अवज्ञा आणि अनुचित कामाचा नवस मानला असेल, तर तो पूर्ण करणे जरूरी नाही. नवसदेखील नमाज-रोजासारखी उपासना आहे. यास्तव अल्लाहशिवाय दुसऱ्याचा नवस मानणे शिर्क आहे. जसे आजच्या काळात प्रसिद्ध मजारींवर नवस आणि भेट-नजराने चढविण्याचे काम चालू आहे. अल्लाह आम्हाला या शिर्कपासून वाचवो.

التفاسير:

external-link copy
271 : 2

اِنْ تُبْدُوا الصَّدَقٰتِ فَنِعِمَّا هِیَ ۚ— وَاِنْ تُخْفُوْهَا وَتُؤْتُوْهَا الْفُقَرَآءَ فَهُوَ خَیْرٌ لَّكُمْ ؕ— وَیُكَفِّرُ عَنْكُمْ مِّنْ سَیِّاٰتِكُمْ ؕ— وَاللّٰهُ بِمَا تَعْمَلُوْنَ خَبِیْرٌ ۟

२७१. जर तुम्ही दान-पुण्य खुलेआमपणे कराल तर तेही चांगले आहे, आणि जर तुम्ही ते गुपचूपपणे गरीबांना द्याल तर हे तुमच्यासाठी सर्वांत अधिक चांगले आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाह तुमचे अपराध मिटवील आणि अल्लाहला तुमच्या समस्त कर्मांची खबर आहे. info
التفاسير:

external-link copy
272 : 2

لَیْسَ عَلَیْكَ هُدٰىهُمْ وَلٰكِنَّ اللّٰهَ یَهْدِیْ مَنْ یَّشَآءُ ؕ— وَمَا تُنْفِقُوْا مِنْ خَیْرٍ فَلِاَنْفُسِكُمْ ؕ— وَمَا تُنْفِقُوْنَ اِلَّا ابْتِغَآءَ وَجْهِ اللّٰهِ ؕ— وَمَا تُنْفِقُوْا مِنْ خَیْرٍ یُّوَفَّ اِلَیْكُمْ وَاَنْتُمْ لَا تُظْلَمُوْنَ ۟

२७२. त्यांना सन्मार्गावर आणणे तुमच्या अवाख्यातील गोष्ट नव्हे, किंबहुना अल्लाह ज्याला इच्छितो मार्गदर्शन करतो आणि तुम्ही जी चांगली वस्तू अल्लाहच्या मार्गात द्याल, त्याचा लाभ स्वतः प्राप्त कराल. तुम्ही केवळ सर्वश्रेष्ठ अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्याकरिता खर्च केला पाहिजे. तुम्ही जे काही धन खर्च कराल, त्याच्या पुरेपूर मोबदला तुम्हाला दिला जाईल आणि तुमचा हक्क मारला जाणार नाही. info
التفاسير:

external-link copy
273 : 2

لِلْفُقَرَآءِ الَّذِیْنَ اُحْصِرُوْا فِیْ سَبِیْلِ اللّٰهِ لَا یَسْتَطِیْعُوْنَ ضَرْبًا فِی الْاَرْضِ ؗ— یَحْسَبُهُمُ الْجَاهِلُ اَغْنِیَآءَ مِنَ التَّعَفُّفِ ۚ— تَعْرِفُهُمْ بِسِیْمٰىهُمْ ۚ— لَا یَسْـَٔلُوْنَ النَّاسَ اِلْحَافًا ؕ— وَمَا تُنْفِقُوْا مِنْ خَیْرٍ فَاِنَّ اللّٰهَ بِهٖ عَلِیْمٌ ۟۠

२७३. दानास पात्र केवळ ते गरीब आहेत, जे अल्लाहच्या मार्गात रोखले गेलेत, जे जमिनीवर फिरू शकत नाहीत. नादान लोक त्यांच्या न मागण्याने त्यांना श्रीमंत समजतात. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यांवरील लक्षणे पाहून त्यांना ओळखून घ्याल. ते लोकांकडून अगदी पाठीशी लागून भिक्षा मागत नाहीत. तुम्ही जे काही धन खर्च कराल, अल्लाह ते जाणणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
274 : 2

اَلَّذِیْنَ یُنْفِقُوْنَ اَمْوَالَهُمْ بِالَّیْلِ وَالنَّهَارِ سِرًّا وَّعَلَانِیَةً فَلَهُمْ اَجْرُهُمْ عِنْدَ رَبِّهِمْ ۚ— وَلَا خَوْفٌ عَلَیْهِمْ وَلَا هُمْ یَحْزَنُوْنَ ۟ؔ

२७४. जे लोक आपले धन रात्रं-दिवस गुपचूपपणे किंवा जाहीरपणे खर्च करतात, त्यांच्यासाठी त्यांच्या पालनकर्त्याजवळ मोबदला आहे, त्यांना ना कसले भय राहील आणि ना ते दुःखी होतील. info
التفاسير: