Prijevod značenja časnog Kur'ana - Prijevod na marathi jezik - Muhammed Šefi' Ensari

Fussilet

external-link copy
1 : 41

حٰمٓ ۟ۚ

१. हा. मीम. info
التفاسير:

external-link copy
2 : 41

تَنْزِیْلٌ مِّنَ الرَّحْمٰنِ الرَّحِیْمِ ۟ۚ

२. (हा ग्रंथ) मोठ्या कृपावान, मोठ्या दयावानतर्फे अवतरित झाला आहे. info
التفاسير:

external-link copy
3 : 41

كِتٰبٌ فُصِّلَتْ اٰیٰتُهٗ قُرْاٰنًا عَرَبِیًّا لِّقَوْمٍ یَّعْلَمُوْنَ ۟ۙ

३. (असा) ग्रंथ आहे, ज्याच्या आयतीं (सूत्रां) चा स्पष्ट तपशील दिला गेला आहे (अशा स्थितीत की) कुरआन अरबी भाषेत आहे, त्या लोकांसाठी जे जाणतात. info
التفاسير:

external-link copy
4 : 41

بَشِیْرًا وَّنَذِیْرًا ۚ— فَاَعْرَضَ اَكْثَرُهُمْ فَهُمْ لَا یَسْمَعُوْنَ ۟

४. शुभ समाचार ऐकविणारा आणि भय दाखविणारा आहे. तरीही त्यांच्यापैकी अधिकांश लोकांनी तोंड फिरविले आणि ते ऐकतही नाहीत. info
التفاسير:

external-link copy
5 : 41

وَقَالُوْا قُلُوْبُنَا فِیْۤ اَكِنَّةٍ مِّمَّا تَدْعُوْنَاۤ اِلَیْهِ وَفِیْۤ اٰذَانِنَا وَقْرٌ وَّمِنْ بَیْنِنَا وَبَیْنِكَ حِجَابٌ فَاعْمَلْ اِنَّنَا عٰمِلُوْنَ ۟

५. आणि ते म्हणाले, तुम्ही ज्या गोष्टीकडे आम्हाला बोलावित आहात, त्यापासून आमची हृदये पडद्यात आहेत. आमच्या कानात बधीरता आहे (किंवा काही ऐकायला येत नाही) आणि आमच्या व तुमच्या दरम्यान एक आड-पडदा आहे. तेव्हा तुम्ही आपले काम करत जा, आम्हीही निश्चित आपले काम करीत राहू. info
التفاسير:

external-link copy
6 : 41

قُلْ اِنَّمَاۤ اَنَا بَشَرٌ مِّثْلُكُمْ یُوْحٰۤی اِلَیَّ اَنَّمَاۤ اِلٰهُكُمْ اِلٰهٌ وَّاحِدٌ فَاسْتَقِیْمُوْۤا اِلَیْهِ وَاسْتَغْفِرُوْهُ ؕ— وَوَیْلٌ لِّلْمُشْرِكِیْنَ ۟ۙ

६. (तुम्ही) सांगा की मी तर तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे. माझ्यावर वहयी (प्रकाशना) केली जात आहे की तुम्हा सर्वांचा माबूद (उपास्य) केवळ एक अल्लाहच आहे, तेव्हा तुम्ही त्याच्याकडे ध्यान केंद्रित करा आणि त्याच्याकडे अपराधांची क्षमा मागा आणि त्या अनेक ईश्वरांच्या उपासकांकरिता सर्वनाश आहे. info
التفاسير:

external-link copy
7 : 41

الَّذِیْنَ لَا یُؤْتُوْنَ الزَّكٰوةَ وَهُمْ بِالْاٰخِرَةِ هُمْ كٰفِرُوْنَ ۟

७. जे जकात देत नाहीत आणि आखिरतचाही इन्कार करतात. info
التفاسير:

external-link copy
8 : 41

اِنَّ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ لَهُمْ اَجْرٌ غَیْرُ مَمْنُوْنٍ ۟۠

८. निःसंशय, ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले त्यांच्याकरिता असीम व अमर्याद मोबदला आहे. info
التفاسير:

external-link copy
9 : 41

قُلْ اَىِٕنَّكُمْ لَتَكْفُرُوْنَ بِالَّذِیْ خَلَقَ الْاَرْضَ فِیْ یَوْمَیْنِ وَتَجْعَلُوْنَ لَهٗۤ اَنْدَادًا ؕ— ذٰلِكَ رَبُّ الْعٰلَمِیْنَ ۟ۚ

९. (तुम्ही सांगा की, काय तुम्ही त्या (अल्लाह) चा इन्कार करता, आणि त्याचे सहभागी ठरविता, ज्याने दोन दिवसांत जमिनीला निर्माण केले. सर्व विश्वांचा स्वामी व पालनकर्ता तोच आहे. info
التفاسير:

external-link copy
10 : 41

وَجَعَلَ فِیْهَا رَوَاسِیَ مِنْ فَوْقِهَا وَبٰرَكَ فِیْهَا وَقَدَّرَ فِیْهَاۤ اَقْوَاتَهَا فِیْۤ اَرْبَعَةِ اَیَّامٍ ؕ— سَوَآءً لِّلسَّآىِٕلِیْنَ ۟

१०. आणि त्याने जमिनीत तिच्यावरूनच पर्वत रोवले आणि तिच्यात समृद्धी राखली आणि तिच्यात राहणाऱ्यांच्या आहारा (अन्न सामुग्री) चेही अनुमान तिच्यातच केले, केवळ चार दिवसांतच. विचारणा (किंवा याचना) करणाऱ्यांकरिता समानरित्या. info
التفاسير:

external-link copy
11 : 41

ثُمَّ اسْتَوٰۤی اِلَی السَّمَآءِ وَهِیَ دُخَانٌ فَقَالَ لَهَا وَلِلْاَرْضِ ائْتِیَا طَوْعًا اَوْ كَرْهًا ؕ— قَالَتَاۤ اَتَیْنَا طَآىِٕعِیْنَ ۟

११. मग आकाशाकडे उचावला जे धूरासारखे होते, तेव्हा त्याला आणि जमिनीला आदेश दिला की तुम्ही दोघे या इच्छेने किंवा अनिच्छेने दोघांना निवेदन केले की आम्ही राजीखुशीने हजर आहोत. info
التفاسير: