আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
29 : 48

مُحَمَّدٌ رَّسُوْلُ اللّٰهِ ؕ— وَالَّذِیْنَ مَعَهٗۤ اَشِدَّآءُ عَلَی الْكُفَّارِ رُحَمَآءُ بَیْنَهُمْ تَرٰىهُمْ رُكَّعًا سُجَّدًا یَّبْتَغُوْنَ فَضْلًا مِّنَ اللّٰهِ وَرِضْوَانًا ؗ— سِیْمَاهُمْ فِیْ وُجُوْهِهِمْ مِّنْ اَثَرِ السُّجُوْدِ ؕ— ذٰلِكَ مَثَلُهُمْ فِی التَّوْرٰىةِ ۛۖۚ— وَمَثَلُهُمْ فِی الْاِنْجِیْلِ ۛ۫ۚ— كَزَرْعٍ اَخْرَجَ شَطْاَهٗ فَاٰزَرَهٗ فَاسْتَغْلَظَ فَاسْتَوٰی عَلٰی سُوْقِهٖ یُعْجِبُ الزُّرَّاعَ لِیَغِیْظَ بِهِمُ الْكُفَّارَ ؕ— وَعَدَ اللّٰهُ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ مِنْهُمْ مَّغْفِرَةً وَّاَجْرًا عَظِیْمًا ۟۠

२९. मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) अल्लाहचे रसूल (पैगंबर) आहेत आणि जे लोक त्यांच्यासोबत आहेत, ते काफिरांवर कठोर आहेत. आपसात दयाशील आहेत. तुम्ही त्यांना पाहाल की रुकूअ व सजदे करीत आहेत. अल्लाहची कृपा व त्याच्या प्रसन्नतेची कामना करण्यात (मग्न) आहेत. त्यांचे निशाण त्याच्या चेहऱ्यांवर सजद्यांच्या प्रभावाने आहे. त्यांचा हाच गुणविशेष (उदाहरण) तौरातमध्ये आहे आणि त्यांचे उदाहरण इंजीलमध्ये आहे, त्या शेतीसारखे, जिने आपले अंकूर बाहेर काढले, मग त्याला मजबूती दिली आणि ते जाड झाले, मग आपल्या खोडावर सरळ उभे राहिले आणि शेतकऱ्यांना आनंदित करू लागले, यासाठी की त्यांच्यामुळे काफिरांना चिडवावे, आणि ईमान राखणाऱ्यांशी व नेक सदाचारी लोकांशी अल्लाहने माफीचा आणि फार मोठ्या मोबदल्याचा वायदा केला आहे. info
التفاسير: