আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
24 : 48

وَهُوَ الَّذِیْ كَفَّ اَیْدِیَهُمْ عَنْكُمْ وَاَیْدِیَكُمْ عَنْهُمْ بِبَطْنِ مَكَّةَ مِنْ بَعْدِ اَنْ اَظْفَرَكُمْ عَلَیْهِمْ ؕ— وَكَانَ اللّٰهُ بِمَا تَعْمَلُوْنَ بَصِیْرًا ۟

२४. तोच आहे, ज्याने खास मक्का येथे काफिरांच्या हातांना तुमच्यापासून आणि तुमच्या हातांना त्यांच्यापासून रोखले. यानंतर की त्याने तुम्हाला त्यांच्यावर विजयी केले, आणि तुम्ही जे काही करीत आहात अल्लाह ते सर्व पाहत आहे. info
التفاسير:

external-link copy
25 : 48

هُمُ الَّذِیْنَ كَفَرُوْا وَصَدُّوْكُمْ عَنِ الْمَسْجِدِ الْحَرَامِ وَالْهَدْیَ مَعْكُوْفًا اَنْ یَّبْلُغَ مَحِلَّهٗ ؕ— وَلَوْلَا رِجَالٌ مُّؤْمِنُوْنَ وَنِسَآءٌ مُّؤْمِنٰتٌ لَّمْ تَعْلَمُوْهُمْ اَنْ تَطَـُٔوْهُمْ فَتُصِیْبَكُمْ مِّنْهُمْ مَّعَرَّةٌ بِغَیْرِ عِلْمٍ ۚ— لِیُدْخِلَ اللّٰهُ فِیْ رَحْمَتِهٖ مَنْ یَّشَآءُ ۚ— لَوْ تَزَیَّلُوْا لَعَذَّبْنَا الَّذِیْنَ كَفَرُوْا مِنْهُمْ عَذَابًا اَلِیْمًا ۟

२५. हेच ते लोक होत, ज्यांनी कुप्र (इन्कार) केला आणि तुम्हाला मस्जिदेे हराम (काबागृहा) पासून रोखले आणि कुर्बानीसाठी थांबलेल्या जनावरांना त्याच्या ठिकाणापर्यंत पोहचण्यापासून (रोखले) आणि जर असे (अनेक) मुस्लिम पुरुष आणि (अनेक) मुस्लिम स्त्रिया नसत्या, ज्यांची तुम्हाला खबर नव्हती की तुम्ही त्यांना (अजाणतेपणी) चिरडून टाकाल, ज्याबद्दल त्यांच्यामुळे तुम्हालाही नकळत हानि पोहचली असती (तर तुम्हाला लढण्याची अनुमती दिली गेली असती, परंतु असे केले गेले नाही) यासाठी की अल्लाहने आपल्या दया कृपेत, ज्याला इच्छिल त्याला दाखल करावे, आणि जर ते वेगवेगळे राहिले असते, तर त्यांच्यात जे काफिर होते, आम्ही त्यांना दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) दिला असता. info
التفاسير:

external-link copy
26 : 48

اِذْ جَعَلَ الَّذِیْنَ كَفَرُوْا فِیْ قُلُوْبِهِمُ الْحَمِیَّةَ حَمِیَّةَ الْجَاهِلِیَّةِ فَاَنْزَلَ اللّٰهُ سَكِیْنَتَهٗ عَلٰی رَسُوْلِهٖ وَعَلَی الْمُؤْمِنِیْنَ وَاَلْزَمَهُمْ كَلِمَةَ التَّقْوٰی وَكَانُوْۤا اَحَقَّ بِهَا وَاَهْلَهَا ؕ— وَكَانَ اللّٰهُ بِكُلِّ شَیْءٍ عَلِیْمًا ۟۠

२६. जेव्हा त्या काफिरांनी आपल्या मनात पक्षपात भावनेला स्थान दिले, आणि पक्षपातही अडाणीपणाचा, तेव्हा अल्लाहने आपल्या पैगंबरावर आणि ईमान राखणाऱ्यांवर आपल्यातर्फे शांती अवतरित केली, आणि ईमान राखणाऱ्यांना ईशभया (तकवा) च्या गोष्टीवर दृढराखले१ आणि ते या गोष्टीस पात्र आणि जास्त हक्कदार होते आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीस चांगल्या प्रकारे जाणतो. info
التفاسير:

external-link copy
27 : 48

لَقَدْ صَدَقَ اللّٰهُ رَسُوْلَهُ الرُّءْیَا بِالْحَقِّ ۚ— لَتَدْخُلُنَّ الْمَسْجِدَ الْحَرَامَ اِنْ شَآءَ اللّٰهُ اٰمِنِیْنَ ۙ— مُحَلِّقِیْنَ رُءُوْسَكُمْ وَمُقَصِّرِیْنَ ۙ— لَا تَخَافُوْنَ ؕ— فَعَلِمَ مَا لَمْ تَعْلَمُوْا فَجَعَلَ مِنْ دُوْنِ ذٰلِكَ فَتْحًا قَرِیْبًا ۟

२७. वस्तुतः अल्लाहने आपल्या पैगंबराला, खरे स्वप्न दाखविले की जर अल्लाहने इच्छिले तर तुम्ही अवश्य शांती-सुरक्षापूर्वक मस्जिदेे हराममध्ये दाखल व्हाल, डोके मुंडवित आणि डोक्याचे केस कापवून घेत अगदी निर्भय होऊन. तो त्या गोष्टी जाणतो, ज्या तुम्ही जाणत नाहीत, तेव्हा त्याने तुम्हाला यापूर्वी एक निकटचा विजय प्रदान केला. info
التفاسير:

external-link copy
28 : 48

هُوَ الَّذِیْۤ اَرْسَلَ رَسُوْلَهٗ بِالْهُدٰی وَدِیْنِ الْحَقِّ لِیُظْهِرَهٗ عَلَی الدِّیْنِ كُلِّهٖ ؕ— وَكَفٰی بِاللّٰهِ شَهِیْدًا ۟ؕ

२८. तोच होय, ज्याने आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्य धर्मासह पाठविले, यासाठी की त्याला प्रत्येक धर्मावर वर्चस्वशाली करावे, आणि साक्ष देण्यासाठी अल्लाह पुरेसा आहे. info
التفاسير: