আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
15 : 29

فَاَنْجَیْنٰهُ وَاَصْحٰبَ السَّفِیْنَةِ وَجَعَلْنٰهَاۤ اٰیَةً لِّلْعٰلَمِیْنَ ۟

१५. मग आम्ही त्यांना आणि नौकावाल्यांना मुक्ती दिली, आणि आम्ही या घटनेला संपूर्ण जगाकरिता बोधचिन्ह बनविले. info
التفاسير:

external-link copy
16 : 29

وَاِبْرٰهِیْمَ اِذْ قَالَ لِقَوْمِهِ اعْبُدُوا اللّٰهَ وَاتَّقُوْهُ ؕ— ذٰلِكُمْ خَیْرٌ لَّكُمْ اِنْ كُنْتُمْ تَعْلَمُوْنَ ۟

१६. आणि इब्राहीम (अलै.) देखील आपल्या जनसमूहास म्हणाले की अल्लाहची उपासना करा आणि त्याचे भय बाळगून राहा, जर तुम्ही अक्कलवान असाल तर, हेच तुमच्यासाठी अधिक चांगले आहे. info
التفاسير:

external-link copy
17 : 29

اِنَّمَا تَعْبُدُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ اَوْثَانًا وَّتَخْلُقُوْنَ اِفْكًا ؕ— اِنَّ الَّذِیْنَ تَعْبُدُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ لَا یَمْلِكُوْنَ لَكُمْ رِزْقًا فَابْتَغُوْا عِنْدَ اللّٰهِ الرِّزْقَ وَاعْبُدُوْهُ وَاشْكُرُوْا لَهٗ ؕ— اِلَیْهِ تُرْجَعُوْنَ ۟

१७. तुम्ही तर अल्लाहला सोडून मूर्तीची पूजा करीत आहात, आणि खोट्या गोष्टी मनाने रचून घेता. (ऐका) तुम्ही अल्लाहऐवजी ज्यांची ज्यांची पूजा अर्चना करीत आहात, ते तर तुमच्या आजिविकेचे मालक नाहीत, तेव्हा तुम्ही अल्लाहकडेच रोजी (आजिविका) मागितली पाहिजे. आणि त्याचीच उपासना करा आणि त्याच्याशीच कृतज्ञशील राहा आणि त्याच्याचकडे तुम्ही परतविले जाल. info
التفاسير:

external-link copy
18 : 29

وَاِنْ تُكَذِّبُوْا فَقَدْ كَذَّبَ اُمَمٌ مِّنْ قَبْلِكُمْ ؕ— وَمَا عَلَی الرَّسُوْلِ اِلَّا الْبَلٰغُ الْمُبِیْنُ ۟

१८. आणि जर तुम्ही खोटे ठरवाल तर तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीही खोटे ठरविले आहे, आणि पैगंबराचे कर्तव्य तर केवळ स्पष्टरित्या पोहचवून देणेच आहे. info
التفاسير:

external-link copy
19 : 29

اَوَلَمْ یَرَوْا كَیْفَ یُبْدِئُ اللّٰهُ الْخَلْقَ ثُمَّ یُعِیْدُهٗ ؕ— اِنَّ ذٰلِكَ عَلَی اللّٰهِ یَسِیْرٌ ۟

१९. काय त्यांनी नाही पाहिले की अल्लाहने सृष्टी-निर्मितीची उत्पत्ती कशा प्रकारे केली, मग अल्लाह तिची पुनरावृत्ती करील. हे तर अल्लाहकरिता फार सोपे आहे. info
التفاسير:

external-link copy
20 : 29

قُلْ سِیْرُوْا فِی الْاَرْضِ فَانْظُرُوْا كَیْفَ بَدَاَ الْخَلْقَ ثُمَّ اللّٰهُ یُنْشِئُ النَّشْاَةَ الْاٰخِرَةَ ؕ— اِنَّ اللّٰهَ عَلٰى كُلِّ شَیْءٍ قَدِیْرٌ ۟ۚ

२०. सांगा, जमिनीवर हिंडून फिरून पाहा की कशा प्रकारे अल्लाहने सर्वांत प्रथम निर्मितीला उत्पन्न केले, मग अल्लाहच दुसरी नवी उत्पत्ती करेल. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो. info
التفاسير:

external-link copy
21 : 29

یُعَذِّبُ مَنْ یَّشَآءُ وَیَرْحَمُ مَنْ یَّشَآءُ ۚ— وَاِلَیْهِ تُقْلَبُوْنَ ۟

२१. तो ज्याला इच्छिल अज़ाब देईल आणि ज्यावर इच्छिल दया करील, सर्व त्याच्याचकडे परतविले जाल. info
التفاسير:

external-link copy
22 : 29

وَمَاۤ اَنْتُمْ بِمُعْجِزِیْنَ فِی الْاَرْضِ وَلَا فِی السَّمَآءِ ؗ— وَمَا لَكُمْ مِّنْ دُوْنِ اللّٰهِ مِنْ وَّلِیٍّ وَّلَا نَصِیْرٍ ۟۠

२२. तुम्ही ना जमिनीवर अल्लाहला विवश (लाचार) करू शकता, ना आकाशात, अल्लाहखेरीज तुमचा कोणी ना संरक्षक आहे ना सहाय्यक. info
التفاسير:

external-link copy
23 : 29

وَالَّذِیْنَ كَفَرُوْا بِاٰیٰتِ اللّٰهِ وَلِقَآىِٕهٖۤ اُولٰٓىِٕكَ یَىِٕسُوْا مِنْ رَّحْمَتِیْ وَاُولٰٓىِٕكَ لَهُمْ عَذَابٌ اَلِیْمٌ ۟

२३. आणि जे लोक अल्लाहच्या आयतींना आणि त्याच्या भेटीला खोटे ठरवितात त्यांनी माझ्या दया- कृपेची आस राखू नये आणि त्याच्याकरिता दुःखदायक अज़ाब (शिक्षा- यातना) आहे. info
التفاسير: